हॅहॅहॅ ... वाटंच पहात होतो .. कोण परिक्षण टाकतंय म्हणून !!!
चीन मध्ये एक "मोठे जहाज" बनवायला सुरुवात होते.
=)) एक जहाज आहे काय ? बहुदा मी २०१३ पाहिला असावा :) त्यात ३ मेगाशिप्स होत्या !!!
आणि हो .. हॅ मुव्हीतले स्पेशल इफेक्ट्स टोट्टल हॉलिवुडी असले तरी .. कथा मात्र बॉलीवुडी आहे ;) अँड्रियन त्याचं प्रतिक !! आख्ख्या मुव्हीत फक्त अंडी घालत असतो ... शेवटी मात्र एक स्पिच देतो ... बास आणखी क्काही करत नाही !!! आणि उगा लै म्हत्वाचं काम करण्याचा आव आणतो :)
चित्रपटात आवडलेले सिन्स :
१. सगळे प्रलयकारी .. विध्वंसक .. विनाशक सिन्स एक से एक आहेत.
२. विमानातून जेंव्हा जॅक्सन आणि बाकी लोक कार ने लँड करतात तो सिन
३. त्याच विमानाने जेंव्हा ते टेक ऑफ करतात तेंव्हा दोन बिल्डींग मधून अगदी वाचतात तो सिन.
चित्रपटातले आवडते ड्वायलॉग्स :
१. विमानातून जेंव्हा कारने लँड करायचं असतं ,तेंव्हा हिरो ला नवी कोरी बेंटली चावी ने स्टार्ट होत नाही तेंव्हा मोटू रशियन (का कोण तो) त्याच्या जाड्या भसाड्या आवाजात "इंजीन ..स्टार्ट" म्हणतो !!
२. मोटू रशियनची गर्लफ्रेंड(व्हाट टू नेम यार .. रहायची ह्याच्याबरोबर .. न प्रेम त्याच्या डायवर बरोबर) जेंव्हा त्याला मिडल फिंगर दाखवते.
३. हा डॉयलॉग आपल्याला सगळ्यात जास्त आवडला. पप्पा जॅक्सन आपल्या पोरांना घेऊन एका अभयारण्यात जातो.. जाताना पोरांना तिथल्या आठवणी सांगताना म्हणतो.. जेंव्हा मी आणि तुमची मम्मी इथे आलेलो तेंव्हा इथे एक तळं असायचं ... तेंव्हा प्रसंगावधान राखुन त्याचं अतिचोंबडं पोरगं त्याला सुनवतं .."क् मॉन ,,, जॅक्सन .. वी डोन्ट वान्टू नो व्हेयर यू अॅन मॉन हॅड सेक्स " ... =)) प्रचंड हसलो होतो....
इन शॉर्ट ... मुव्ही पहायचा तर ... बिग स्क्रिन वर !!! अल्टिमेट मुव्ही !!
आवडत्या स्त्री बरोबर पहाण्यास अनुकुल !! :) स्क्रिनवरचे रोमांचकारी अनुभव हृदयाला भिडतात !!
-- (बुगाटी प्रेमी) टारझन बेंटली
माया सभ्यतेनुसार आपण आपली पृथ्वी कशी नष्ट होणार हे आपल्या हयातीत बघणार आहोत.त्यामुळे मला तर २१ डिंसेंबर २०१२ चीच ऊत्सुकता लागुन राहिली आहे.
पिक्चर मात्र नक्की बघु, तेही थेटरात जावुनच बघु.
वेताळ
स्पेशल इफेक्ट्स जबरदस्त आहेत. एक आपत्तीपट म्हणून टायटॅनिक, जुरासिक पार्क वगैरेच्या लेव्हल चा (कथानक, नाट्य वगैरे मधे) नसला तरी नक्कीच बघण्यासारखा आहे. फक्त प्रत्येक वेळेस मोठा विध्वंस यांच्या पाच्-दहा फूट मागे चेस करत असतो ते जरा विनोदी वाटले.
खरंच असं झालं (माया संस्कृतीच्या आकडेमोडीनुसार) तर कित्ती कित्ती मज्जा येईल! मी नरकात पेढे वाटीन या पापी जगाला नष्ट केल्याबद्दल)
हर शख्सको अपना बनाके देख लिया
मिलेंगे ना किसीसे ये दिलमें ठानी है|
कालच पाहिला.
स्पेशल इफेक्ट्स चांगले आहेत पण तद्दन गल्लाभरु चित्रपट वाटला.
फारएन्ड म्हणाला तोच विचर मनात आला होता, साला प्रत्येक वेळी याची कार/बस/विमान मोठ्या विध्वंसाला हरवते.
एक बदल जाणवला अमेरिकेचा आम्हीच सर्वज्ञ हा समज दुर झालेला जाणवतो, अमेरिके बाहेरही जग आहे आणि तिथे रहाणार्या लोकांनाही थोडी फार अक्कल,ज्ञान आहे हे हॉलिवुडकारांना जाणवायला लागल आहे ;).
पुर्वी मला नेहमी प्रश्न पडायचा की सगळे विध्वंस/प्रलय, एलियन्स, गॉडझिअला/डयनॉसॉर्/किंगकॉंग बिचार्या अमेरिच्याच मागे का लगलेत बर. पण हा चित्रपट पाहुन हा समज दुर झाला ;)
प्रतिक्रिया
हॅहॅहॅ ...
असो आपण सर्व भाग्यवान आहोत.
भारत आणि
मलाही आवडला
हॅहॅहॅ
खरंच!!
थोडे
कालच