Skip to main content

विनोद

अभियांत्रिकीचे दिवस- भाग १

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 26/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
इसवी सन: २००६-०७ आता ह्यात मुख्यतः 'महाराजा'च्या टेरेसवर सुरुवात केलेल्या चतकोर बीअरपासून पुढे खंबे पालथे घालण्यापर्यंत सुसाट वेगानं झालेल्या प्रवासाबद्दलच लिहावं लागेल. आणि तो विषय हार्ड होईल.. म्हणून ते नको. तर अभियांत्रिकीच्या दिवसांबद्दल लिहायचं तर लेक्चर्स, प्रॅक्टिकल्स सोडून बाकीच्या गोष्टींबद्दलच लिहावं लागतं. हे असं होतंच म्हणजे.

रेसीपी ऑफ ग्लास ट्रेसिंग ऊर्फ GT

लेखक पाटिल यांनी शुक्रवार, 26/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
हे भगवन्, ह्या एवढ्या सगळ्या शीट्सची नुसती नावं ऐकूनच माझे टाके आणि गात्रं ढिली व्हायला लागली आहेत...आता मी कसं करावं भगवन् ?? हे अर्जुना sss थांब.. असा भ्रमित होऊ नकोस..! आता तू तयार आहेस..

मच्छरवाणी- एक गुप्त वार्ता (एका मच्छरप्रमुखाचे भाषण)

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 13/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
अंत्यत थोडया कालावधीत समाजात दूरवर पसरण्याची कला, तसेच समाजातील अस्वच्छ दुर्लक्षित परिसरात विशेष ठाण मांडून मोठमोठाल्या इस्पितळातील डॉक्टर लोकांस आपल्याविषयी दखल घेण्यास भाग पाडणा-या, नाजूक दिसूनही आपल्या ताकदीचे भान करुन देणा-या, हलक्या आणि उडत्या चालीचे म्हणून हीनवलेले जाणा-या आपल्या ‘मच्छर’ या कीटकजमातीस, त्यांच्या सामाजिक बांधिलकीविषयी आणि एकूणच त्यांच्या सदयस्थितीविषयी चावा संघटनेचा प्रमुख या नात्याने हा पत्रिकाप्रंपच मांडतो आहे. आजूबाजूला वाढणा-या मच्छर या आत्मक्लेशास उत्तम संधी असून मनुष्यास स्वतःस चारचौघात नकळत थोबाडीत मारुन घेण्यास मदत करतात.

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाऊन

लेखक कुमार जावडेकर यांनी शुक्रवार, 12/06/2020 या दिवशी प्रकाशित केले.
बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली! चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली. चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले.

कोविड-19 माझी डायरी

लेखक एक_वात्रट यांनी गुरुवार, 28/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
07 मार्च एस. पी. कॉलेजमधे एकत्र शिकलेले आम्ही मित्र आज (ब-याच दिवसांनी) भेटतो. प्रभात रस्त्यावरच्या एका हॉटेलात बसून आम्ही रात्रीचं जेवण घेतो, नंतर सुजाता मस्तानीत मस्तानी हाणतो. (आंबा मस्तानीला तोड नाही!) ब-याच गप्पा होतात, पण मला आठवतं तसं करोनाव्हायरसचा विषय निघत नाही. 13 मार्च आज आम्ही जेवायला बाहेर जायचं ठरवतो. मॉडर्न कॅफे हे आमचं आवडतं हॉटेल आहे. तिथलं व्हेज कटलेट आणि उपवासाची कचोरी आम्हाला विशेष आवडतात. भरपेट जेवण करायचा कुणाचाच मूड नसतो (आणि तसंही त्या पंजाबी जेवणाला आम्ही जाम कंटाळलोय) तेव्हा मॉडर्न कॅफेवर पटकन एकमत होतं. आज हॉटेलात गर्दी नेहेमीपेक्षा कमी दिसते.

नसती आफत !!!

लेखक Sanjay Uwach यांनी मंगळवार, 12/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
( कृपया वाचकानी लेखाच्या तांत्रीक बाबी कडे न पहाता, निव्वळ एक काल्पनिक विनोदी किस्सा म्हणून हा लेख वाचावा ही विंनती आहे. ) नसती आफत !!! आबाने अपल्या वयाची आता सत्तर वर्षे पूर्ण केली होती . जन्मभर शेतात काम केले ,एकुलत्या एक मुलाचे शिक्षण करून त्यालाही मोठ्या शहरात नोकरीला लावले . घरात म्हणाल तर आताही दोनच माणसे, एक आबा अन दुसरी त्याची पासष्ठ वर्षे पार केलेली बायको बयाक्का . वृद्धत्वा मुळे व त्यातच त्याला असणारी आनेक व्यसना मुळे, आबाला मधुमेय व उच्चरक्तदाबाचा त्रास अनेक वर्षा पासून होत होता,. आज तर कहरच झाला ,आबा एकदम चक्करच येऊन पडला .

फाssट्टकन !!!

लेखक बोलघेवडा यांनी शनिवार, 02/05/2020 या दिवशी प्रकाशित केले.
"हॅलो...अगंss सग्गssळ्या सोसायटीत बभ्रा झालाय. कुणाला म्हणून तोंड दाखवायची सोय ठेवलेली नाही ह्यांनी आता." . . "पण असं केलं तरी काय जावईबापुंनी...म्हणते मी???". . "अग्ग..सत्तत नजर ठेऊन असायचे त्या शेजारच्या चीचुंद्रीवर..सवितावर!! . आता त्या सटवेला...सासरचेही नाहीत अन् नवराही परगावी!! म्हणजे ह्यांना रान मोकळं!! . बरं, कुठं होतात म्हणून विचारलं तर कावरे बावरे व्हायचे नुसते!! मी काय दिलं नसतं करून?? . काssयबाई...मेला आचरट प्रकार!!..

मठ

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी शनिवार, 11/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
ना गुणी गुणीनं वेत्ति गुणी गुणिषु मत्सरी । गुणीच गुणरागीच विरलः सरलो जन: ॥ अर्थ- गुण नसलेल्याला गुणी माणसाची परिक्षा होत नाही, जो स्वत: गुणी आहे तो दुसर्‍या गुणी माणसाचा मत्सर करतो. स्वत: गुणी असुनही दुसर्‍याच्या गुणावर प्रेम करणारा सरळ मनाचा माणूस विरळाच असतो. एकदा सामाजिक, मानसिक आरोग्य क्षेत्रात काम करणार्‍या कार्यकर्तीस भेटायला गेलो. बोलता बोलता स्त्रीवादाचा विषय निघाला. मी मिळून सार्‍या जणींच कौतुक केल. विद्या बाळ, गीताली व इतर अशा या क्षेत्रात काम करणार्‍या लोकांविषयी आदर व्यक्त केला. बाई मनातून खवळल्या पण मोठ्या संयमाने पण तुच्छतेने मी त्यांच्यापैकी नाही असे निक्षून सांगितले.

गोव्याहून पत्र

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 10/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
अ.प्र. जोशी चिमुलवाडा, गाव सावरगाव गोवा प्रति, सर्व वाचकांस २ -४ -२०२० विषय: थेट चिमुलवाड्यावरून कित्ती तरी दिवस सरकाराग्रहास्तव घरीच असल्याने आणि एन तेन प्रकारेन सगळ्याच बाजूंनी कोरोना कम कोविड नाईन्टीन आणि इतर बातम्या ऐकून वाचून एवढा वीट आला आहे कि "चिमुलवाडा आणि कोरोना" असे शीर्षक खोडून तुम्ही वाचलेत तसे पत्र छापले आहे. चिमुलवाड्यावरील लोकडोवनचे ३ दिवस झाले आहेत. तर, वाड्यावरील जनतेच्या एकूण स्तिथीचा आढावा ह्या लेखातून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. बाकी ह्या महामारीमुळे नाही म्हटले तरी असे एक मरगळीचे वातावरण तयार झालेले आहे.

सामना

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी शुक्रवार, 10/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मे महिन्याचे अखेरचे दिवस. शनिवारची रात्र. ९:३० वाजून गेले असावे. बाहेर बारीक पाऊस लागलेला, त्यामुळे नेहमीपेक्षा जास्तच सामसूम. रस्ते सगळे ओलेकच्च झालेले. कुठच्या तरी सरकारी योजनेखाला लावलेल्या खांबावरील दिव्यांचा अंधुक उजेड चिमुलवाड्यावरच्या पायवाटेवर पडला होता. त्या उजेडात पावसाची बारीक भुरभुर देखील चांगली ठसठशीत वाटत होती. धुपकरांच्या सालात चिमुलवाड्यावरील सगळ्या पुरुष मंडळींचा अड्डा बसला होता. टीव्हीवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया असा सामना रंगला होता. ऑस्ट्रेलिया वाल्यानी आधी फलंदाजी करून २० षटकांत २१८ धावा कुठल्या होत्या. भारताची फलंदाजी व्हायची होती.