Skip to main content

विज्ञान

जलतज्ञ माधव आत्माराम चितळे

लेखक नरेंद्र गोळे यांनी गुरुवार, 22/03/2012 11:38 या दिवशी प्रकाशित केले.

आज २२-०३-२०१२. आंतरराष्ट्रीय जलविषयक जागृती दिन. त्यानिमित्ताने भारतातील विख्यात जलतज्ञ माधव आत्माराम चितळे यांच्या कार्याची आपण थोडक्यात ओळख करून घेऊ या.

नक्षत्रं आणि राशी

लेखक असुर यांनी मंगळवार, 13/03/2012 06:10 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, नक्षत्रं आणि राशी, असं नाव वाचून साधारण जो ग्रह होणं शक्य आहे, तसा राशीचक्राचा इथे संबंध नक्कीच आहे, पण थोडा वेगळ्या अर्थाने. एखादा खगोलावरचा लेख अल्पमती साथ देते तसा लिहावा हा प्रयत्न आहे. अगदीच कुणाला आवडलाच लेख, आणि चार दोन लोकांचा इंटरेस्ट वाढलाच खगोलशास्त्रात, तर आम्ही स्वतःला धन्युधन्यु समजून घ्यावे ही अल्पशी अपेक्षा. बाकी ज्योतिष या विभागाकडे वळायचा माझा अजून तरी धीर होत नाही बुवा. 'faith is a gift I'm yet to receive' असं कुठेतरी, कोणीसं, काहीसं म्हणून गेलं ना; तसं माझं या ज्योतिषाबाबत झालंय.

‘प्रेमाला’ जाऊन भांडे लपविणे...

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 06/03/2012 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुरुषानं कसं सडेतोड असावं. मुळूमुळू करणं हा इतरांचा प्रांत. धडाकेबाजपणा हा पुरुषाचा मूळ गुणधर्म. तो त्यानं जपला पाहिजे अन् योग्यवेळी व्यक्त केलाही पाहिजे. मनात कुढत बसणे त्याचा पिंड नाहीच. जे वाटते, जे आवडते, जे पटते ते बोलून मोकळे होणे हाच खरा पुरुषार्थ. तसेच जे मनाविरुद्ध घडते, जे आवडले नाही अन् ज्यात आपले इप्सित साध्य होत नाही त्याचा प्रतिकार करणे, बिनतोडपणे त्याचा जाहीर लिलाव करणे व त्या विरुध्द आवाज उठविणे हाच पुरुषाचा धर्म असतो. असो. इतकं सगळं लिहिण्याचं कारण म्हणजे काही पुरुष ताकाला जातात खरे पण भांडं लपविण्याचा प्रयत्न करतात. परंतु समोरची पार्टी महाचाणाक्ष असते.

मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा.

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 29/02/2012 17:38 या दिवशी प्रकाशित केले.
मला डिजिटल क्यामेरा विकत घ्यायचा आहे. कृपया आपले मत सांगा. दोन ऑप्शन आहेत १ . Sony Cybershot DSC-H70 Point & Shoot . ( किंमत ९८०० ) २. Nikon Coolpix L120 Point & Shoot ( किंमत १३,५३२ ) या दोन्ही पैकी कोणता घ्यावा? फोटोग्राफी करणारे जे कोणी मीपा आहेत आणि ज्यांना खरच काही फोटोग्राफी बद्दल कळत त्यांनी कृपया सल्ला द्यावा. किमती मधील फरक सांगू नये .. :) खूप कन्फ्युज राव..... सल्याची नितांत गरज !!!

मेमरी कार्ड वापरता ? .......हे माहित आहे का?

लेखक कोल्हापुरवाले यांनी बुधवार, 15/02/2012 17:44 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पैकी असे बरेच लोक आहेत जे मेमोरी कार्ड वापरतात. आज काल बर्याच प्रमाणात ओंनलाइन शॉपिंग केलं जात. बऱ्याच वेब साईट्स वर कमी किमती मध्ये अशी उत्पादने विकली जातात. जेव्हा आपण कार्ड विकत घेत असतो तेव्हा फक्त "किमंत" हा निकष लावला जातो. पण बर्याच लोकांना हे कदाचित माहित नसाव कि जे कार्ड आपण वापरतो त्याचे बरेच प्रकार असतात. मेमरी कार्ड चे वेगवेगळे क्लास असतात तुम्हाला असा जाणवलं आहे का तुम्ही घेतलेलं नाव कोर कार्ड खूप स्लो आहे.? फोटो काढला तरी सेव व्हायला खूप वेळ लागतो? या सगळ्याला १ गोष्ट जबाबदार असते ती म्हणजे मेमोरी कार्ड चा क्लास. आता म्हणाल त्याचा आणखी कसला क्लास ?

२०१२... अजून काय???

लेखक सुहास झेले यांनी बुधवार, 25/01/2012 17:25 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी ऑफिसमध्ये पोचलो आणि नेहमीप्रमाणे ईमेल चेक करत बसलो. कामाचा प्रचंड कंटाळा आला होता (तो नेहमीच येतो म्हणा ;)). एक नियम नेहमी पाळतो, क्लायंटचे ईमेल सगळ्यात शेवटी चेक करतो. साले एक से एक मनहूस असतात, कारण त्यात नेहमीच एकच चर्चा असते टार्गेट्स..टार्गेट्स आणि टार्गेट्स. म्यानेजरचा पहिला ईमेल बघितला, त्याला हाय प्रायोरीटी असं मार्क केलं होतं. ***ATTENTION*** म्हटलं झालं, काही तरी नवीन जबाबदारी दिली असणार. रागातच तो ईमेल उघडला आणि त्यात सूर्याचे काही फोटो दिले होते.

पाहुणे येती मुंबईला

लेखक सुधांशुनूलकर यांनी शनिवार, 21/01/2012 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
|| श्री गुरवे नम: ||
दिवाळीची धामधूम संपली, डिसेंबर महिना सुरु होऊन मुंबईत हळूहळू थंडी जाणवायला लागली, की मुंबईतल्या पक्षीप्रेमींची एकमेकांकडे चौकशी सुरु होते : आले का रे ? अजून का नाही आले ? केव्हा येणार ? आले, की मला नक्की सांग... BNHSमधे फोन करून बघूया... शेवटी ते येतात. हजारोंच्या संख्येने. एखाद्या दैनिकात बातमीसह त्यांचं छायाचित्र (लोकासत्ता, बुधवार, दि.