मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

संस्कृती

पयला पयला प्यार

ब्रिटिश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
बा लय खुश व्हता. खारीतली २५ गुंठ रोडटच जमीन ईकलीवती. तीस लाख आलते. मंगलवारी माजा १७ वा वाडदीवस. 'मिथन्या हिकड ये. हे झे तुज्या वाडदीवसाचे ' बा न बलीवल आन पाच हजार काडून दिल्लं मी सुसाटलो ९३२२ १७ ३३ १४ सूर्‍याला मोबाइल लावला. सूरेश म्हात्रे. माजा लंगोटीयार . ईतका लंगोटी क खारीन ऊतराचा आसल न माज्याकड लंगोटी नसल त त्याची लंगोटी घालाचू. 'सूर्‍या , संद्याकाली भेट, आरजंट हाय.' सूर्‍या आला 'क रं बाला क बोल्तोस? 'आर बान मोप पैशे दिल्लन वाडदीवसाला. आपन बलीशेट कड बसू बीयर पीवाला.' 'तूजा वाडदीवस हाय ? वाडदीवस हाय ? मंग बलीशेटकड कनाला बसाचा ? आपन पनवेलला जावाचा.

लक्ष्मीपूजन

सनातन ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
आश्‍विन अमावास्या या दिवशी लक्ष्मीपूजन केले जाते. सामान्यत: अमावास्या हा अशुभ दिवस म्हणून सांगितला आहे; पण त्याला अपवाद या अमावास्येचा आहे. हा दिवस शुभ मानला आहे; पण तो सर्व कामांना नाही; म्हणून या दिवसाला शुभ म्हणण्यापेक्षा आनंदी दिवस म्हणणे योग्य ठरते. या दिवशी श्रीविष्णूने लक्ष्मीसह सर्व देवांना बळीच्या कारागृहातून मुक्‍त केले आणि त्यानंतर ते सर्व देव क्षीरसागरात जाऊन झोपले, अशी कथा आहे. आज आपण लक्ष्मीपूजनासंदर्भात माहिती पाहूया. १.

दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा

mina ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
सर्व मिपापरिवारास माझ्याकडून दिपावलीच्या हार्दीक शुभेच्छा...
मांगल्याची आस दे कल्याणाचा ध्यास दे दिव्या दिव्या माझ्या घरी मन भर प्रकाश दे, मुक्त मोकळा श्वास दे , आनंदाची रास दे, स्वप्नासाटी माथ्यावरती झळझळते आकाश दे.. दिपावलीच्या खुप खुप शुभेच्छा.!!

मराठीपणा

अरुण मनोहर ·
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

मराठीपणा

अरुण मनोहर ·
सध्या मिपामधे दोन विषयांवर भरपूर चर्चा वाचायला मिळाली आहे. पहिला विषय- राज ठाकरे ह्यांनी धसास लावलेला, मराठी प्रदेशात मराठी माणसांना नोकरी मिळण्यास प्राधान्य हवे हा. दुसरा शुद्ध, अशुद्ध भाषेचा. ह्या दोन्ही विषयांना जोडणारी एक बातमी इ सकाळवर वाचली. कर्नाटकात, मराठीपळ्या आणि कोननकल्ल गावात १७९७ सालापासून स्थायीक झालेली मराठी कुटूंबे. २०० वर्षे जुना बाज असलेली भाषा तिथे अजूनही वापरली जाते. मराठीपळ्यात १००% मराठी लोकसंख्या आहे.

दिवाळी

स्वाती दिनेश ·
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
उटण्यांचा सुवास,बंबाचा धूर फराळाची ताटं,दारावरची तोरणं आधणाचं पाणी,फोडलेली चिरांटी फटाक्यांचे आवाज,मातीचे किल्ले किल्ल्यांवरचं पोपटी,कोवळं जंगल नवे कोरे शिवाजीमहाराज ! नवे जुने मावळे, त्यातच मोटारी आणि बोगद्यातून डोकावणार्‍या आगगाड्या सुद्धा... सारवलेलं अंगण,अंगणातलं तुळशीवृंदावन, समोर रेखलेली रंगीत रांगोळी,पणत्यांची आरास , दारात झुलणारे आकाशदिवे, आणि नव्या कोर्‍या परकर पोलक्यातली मी... पणत्यात तेवणार्‍या मंद वाती राहिल्यात सात

कहाणी एका जिद्दीची.....

विकी शिरपूरकर ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
खान्‍देशातील जळगाव जिल्‍ह्याच्‍या पूर्वेकडे वसलेले सुमारे 50 हजार लोकसंख्‍येचे तालुक्‍याचे गाव अमळनेर. अवघ्‍या महाराष्‍ट्राची मायमाऊली म्‍हणून ओळखल्‍या जाणा-या मातृहृदयी साने गुरूजींची कर्मभूमी आणि वारकरी संप्रदायाची पताका डौलाने फडकावणा-या संत सखाराम महाराजांची अध्‍यात्‍मनगरी. स्‍वातंत्र्य आंदोलकांची आणि अध्‍यात्मिक वृत्तीच्‍या लोकांची दीर्घकालीन परंपरा जशी या शहरात रूजली तशीच या गोष्‍टींपासून शेकडो मैल दूर असलेली किंबहुना समाजाचा अविभाज्‍य भाग असूनही गावकुसाबाहेर राहिलेली आणखी एक संस्‍कृती येथील 'बोरी' नदीच्‍या किना-यावर रूजली आणि वाढलीही.

कंदिल बनविणे: एक आनंददायी कला

ऋषिकेश ·
लेखनविषय:
लेखनप्रकार
दिवाळी हा सर्वार्थाने घरातल्या प्रत्येकाचा सण. दिवाळी आली की वेगवेगळ्या आघाड्यांवर सगळं घर तयारीला लागतं. एकीकडे घराची साफसफाई, रंगरंगोटी चालु असते. तर दुसरीकडे फराळाचे मस्त पदार्थ चालू असतात. लहानांना सुट्ट्या असतात. पुर्वी किल्लेही बनवले जात. एकत्र कुटंबांमधे तर आपेष्ट जमलेले असतात. मनसोक्त हास्य विनोदात आठवडा कसा जातो ते कळतही नाहि. आज दिवाळीचा पहिला दिवस. वसुबारस! आमच्या घरी आज दिव्यांची रोषणाई आणि कंदिल लागतो. त्यामुळे गेला विकांत कंदिल बनविण्यासाठी राखून ठेवला होता. अजूनहि मी कंदिल घरीच बनवतो. दर तीन वर्षांनी तर कंदिलाचा सांगाडाहि नवा बनतो.

भाजे लेणी

झकासराव ·
लेखनप्रकार
मध्यतंरी भाजे येथे जाण झाल. भाजे लेणी हे बौद्ध लेणी आहेत. अख्ख्या डोंगर पोखरुन ही लेणी बनवली आहेत. अशी अनेक लेणी सापडतात. कार्ला , शिवनेरी परिसरात अशी लेणी आहेत. ही लेणी तेव्हाच्या बौद्ध भिक्षुंच्या रहिवासासाठी असायचीत. (म्हणे) भाजे हे ठिकाण पुण्यापासुन सुमारे ६० ते ८० किमी अंतरावर आहे. जर पुण्याहुन लोकलने जात असाल तर मळवली स्टेशन वर उतरुन चालत १० मिनटाच्या अंतरावर आहेत. स्टेशनवर उतरल की लोहगड आणि विसापुरच दर्शन होतच. तिथेच जवळच ही लेणी आहेत. विसापुर आणि लोहगड हे मात्र जास्त अंतरावर आहेत. जर जुन्या मुंबई पुणे रोड ने गेल की कार्ला (एकवीरा माता) इकडे जाण्यासाठी एक चौक लागतो.