Skip to main content

संस्कृती

आपल्या प्रथा आपण कशासाठी विसरायच्या?

लेखक योगप्रभू यांनी सोमवार, 21/03/2011 17:20 या दिवशी प्रकाशित केले.
परवा होळी झाली आणि काल धुळवड. रस्त्यावर सगळेजण रंग खेळत होते. दिवसभर प्रसारमाध्यमांनी 'होली है' टाईप बातम्यांचा आणि नाचगाण्यांचा मारा चालवला होता. आम्ही राहतो तिथेही शेजारच्या इमारतीमधील मराठी लोक मस्त रंग खेळत होते. एकाने विचारले, 'काय रंग नाही खेळायचा का?' त्यावर मी म्हटले, ' मराठी समाजात त्यासाठी रंगपंचमीचा दिवस राखून ठेवला आहे. आम्ही होळीला रंग खेळत नाही. ती प्रथा उत्तरेकडची आहे. त्यांना करु देत त्यांच्या पद्धतीप्रमाणे. ' त्यावर त्याने माझ्याकडे 'काय मूर्ख आहे?' अशा नजरेने पाहिले आणि विचारले, 'रंगपंचमीला काही सुटी नाही.

भोग

लेखक मृत्युन्जय यांनी शनिवार, 19/03/2011 10:55 या दिवशी प्रकाशित केले.
या जन्माची पापं या जन्मातच फेडायला लागतात म्हणे. आयुष्याचे भोग प्रत्येकाने भोगायलाच पाहिजेत असाही एक प्रवाद आहे. पण मी आयुष्यात अशी कुठली पापं केली आहेत की माझे भोग संपता संपत नाहीत हे कळेना झालय. नाही मी काही 'तसला' विचार मांडत नाही आहे किंवा माझी गार्‍हाणी गाण्याचा पण माझा विचार नाही. पण माझी दु:खभरी दास्तां ऐकुन तुमच्या डोळ्यात पण पाणी येइल. अजुन काही नाही तुमच्या कडुन फक्त थोड्या सहानुभुतीची अपेक्षा आहे. मी सुरुवातीलाच मोकळेपणाने कबूल करु इच्छितो की माझ्या आयुष्यात हे जे काय घडले आहे न पेक्षा जे काही नेहेमीच घडते त्यात अंशतः चुक माझीच आहे. पण पुर्णपणे मी स्वत:ला दोष देउ इच्छित नाही.

पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- २)

लेखक चिंतामणी यांनी बुधवार, 16/03/2011 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
पुर्वांचल - उपेक्षीत आणि अपिरीचीत भाग. (भाग- १) दुसरे कोकण...पण अशांत! आसामात मोरीगावातल्या मिंटुरंजन डेका या मित्राच्या घरी जाण्याचा योग काही वर्षांपूवीर् आला. मुख्यत: बांबूचा वापर केलेलं दुमजली घर. गंमत म्हणून घराच्या वरच्या मजल्यावर गेलो. तिथे बरीचशी अडगळ व एक छोटेखानी बोट दिसली. ब्रह्मापुत्रा सहा किलोमीटर अंतरावर असताना घरात ही नौका कशाला, असा प्रश्न मला पडला. मित्रानं त्याचं उत्तर दिलं. पावसाळ्यात पूर आला की ब्रह्मापुत्रा नदी सैरभैर होते. तळमजला पाण्याखाली जातो, मग मुक्काम पहिल्या मजल्यावर.

हुताशनी ( शिमगा )

लेखक स्वप्निल रत्नाकर भायदे. यांनी मंगळवार, 15/03/2011 19:57 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय. साधारण पणे फल्गुन शुक्ल पंचमी पासून पौर्णिमेपर्यत हा उत्सव स्थळ कालपरत्वे थोड्या फार फरकाने भारतात सर्वत्र साजरा करण्यात येतो.अशा उत्सवात सामिल होऊन व आपल्या मनावरचा भार हलका करीत व प्रसन्न मनाने आपल्या कर्तव्यकर्मा कडे नव्या उत्साहाने वळूया व हा सण योग्य मर्यादा सांभाळून आनंदाने साजरा करूया. हिंदू पंचागा प्रमाणे फाल्गुन हा वर्षाचा शेवटचा महिना या महिन्यामधील मुख्य एकच सण शिमगा होय.

ब्लेड रनर – चित्रपटात रंगसंगतीचा प्रभावी वापर

लेखक चिंतातुर जंतू यांनी शुक्रवार, 11/03/2011 18:46 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी इंद्रराज पवार यांनी चित्रपटातल्या रंगसंगतीविषयी दोन लेख लिहिले होते. (पहा: ‘चित्रपटातील "तानापिहिनिपाजा"’ आणि ‘अनेक भावनांचे प्रतीक : लाल रंग’) ते वाचताना अमेरिकन चित्रपटांमध्ये खूप प्रभावी पद्धतीनं रंगांचा वापर केला आहे असे चित्रपट आठवण्याचा प्रयत्न केला असता पटकन आठवलेला एक चित्रपट म्हणजे ब्लेड रनर.