वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी
श्रवणी लोभ उपजेल तेथे
विवेक केंचा असेल तेथे.
बैसली दुराशेची भुते
तया अधोगती.
समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.
मिसळपाव
सिंहगडावर जाताना या ठिकाणी एखाद्या कुठल्यातरी ट्रेकरने शिवरायांच्या मूर्तीसमोर ग्लुकोजच्या गोळ्या नैवेद्य दाखवावा तशा ठेवल्या होत्या.
कल्पना तशी गमतीशीर आहे, पण छान आहे.
त्यावरून मला काही वर्षांपूर्वीचा एक प्रसंग आठवला.
स्वातंत्र्यप्राप्तीच्या अगोदर भारतीय उपखंडात उभारल्या गेलेल्या शेवटच्या काही राजवाड्यांपैकी जोधपूरचा उमेद भवन राजवाडा आहे. स्वातंत्र्योत्तर काळात सगळी संस्थानं भारतीय संघराज्यात विलीन झाल्यामुळं पुढच्या काळात भारतातच नाही, तर संपूर्ण उपखंडात नवीन राजवाडे उभारले गेले नाहीत.