वैश्विक संस्कार
- डॉ. सुधीर रा. देवरे
संस्कार म्हणजे काय? संस्कार हे सापेक्ष असतात का? संस्कार हे सुसंस्कारच असतात का? खरं तर संस्कार या शब्दातच सु म्हणजे चांगली असलेली संज्ञा गृहीत धरलेली आहे. तरीही संस्कारात सुसंस्कार आणि कुसंस्कार अशी वर्गवारी हेतूत: केली जाते. संस्कार हे कृत्रिम असतात का नैसर्गिक? निसर्गाला अनुसरून असणारे संस्कार कोणते आणि निसर्गाच्या विरूध्द असणारे संस्कार कोणते? निसर्गाच्या विरूध्द जाणार्या संस्कारांना संस्कार म्हणता येईल का? संस्कारांनी माणसाचा देवमाणूस होतो का? होत असेल तर संस्कारांनीच माणसाचा राक्षस होऊ शकतो का? या प्रश्नाचे उत्तर ‘होतातच’ असे येते.
मिसळपाव