Skip to main content

समाज

न बदलणारं 'पंगतीतलं पान'

लेखक महासंग्राम यांनी सोमवार, 28/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.

आपल्या गावगाड्यात जात नावाची व्यवस्था अगदी पाचर मारल्यासारखी फिट्ट बसली आहे. कितीही हाकला म्हंटलं तर जात नाही ती जात असं तिचं वर्णन केलं जातं. आपण सगळे जण कळत नकळतपणे का होईना या जातिव्यवस्थाचे पाईक आहोत. भारताच्या कुठल्याही खेड्यात गेलं तर हे वास्तव सहजपणे दिसून येतं. शहरात थेट नसला तर वेगवेगळ्या पद्धतीने जातीभेद दिसतोच. कधी तो रहाण्याच्या बाबतीत असतो, तर कधी खाण्यापिण्याच्या बाबतीत.

जमतारा (की जामतारा) पॅटर्न : कॅशबॅकच्या नावाखाली लुटीचा नविन प्रकार

लेखक सॅनफ्लॉवर्स यांनी मंगळवार, 22/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
(बरेच वर्ष मिसळपावचा सभासद आहे पण लिहिण्याचा योग आज आला. काही शुद्धलेखण्याच्या चुका असतील तर जरून सांगा. मी हे लेखन गूगल इनपुट टूल वापरून केलेलं आहे जे मला खूपच सोपं वाटत. पण नंतर गमभन टंकलिपी वापरुन पाहिली, तीपण सोपी आहे वापरायला, त्यामुळे यानंतरच लेखन तेच वापरुन करेन. ) आजचा (18 सप्टेंबर 2020) माझा वैयक्तिक अनुभव आहे. मला अज्ञात क्रमांकावरून फोन आला की तो मुंबईतील फोनपे मुख्य कार्यालयातून कॉल करीत आहे आणि मला काही फोनपे कॅशबॅक मिळाली आहे पण त्यासाठी त्याला माझ्याकडून काही माहिती हवी आहे. भाषा खूप सभ्य होती परंतु इंग्रजी खूपच खराब होती.

माधव रिसबूड : एक कठोर फलज्योतिष चिकित्सक

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी गुरुवार, 10/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
प्रस्तावना - काही दिवसांपुर्वी अंनिस वार्तापत्राच्या वेबसाईटचा लोकार्पण सोहळा संपन्न झाला अन माधव रिसबूडांची तीव्रतेने आठवण झाली. माधव रिसबूड 2003 मधे निवर्तले. त्यांच्यावर कै. माधव रिसबूड: एक कठोर फलज्योतिष चिकित्सक असा लेख अंनिस वार्तापत्र दिवाळी अंकासाठी त्यावेळी लिहिला होता. अंनिस वार्तापत्रात रिसबूडांनी फलज्योतिषचिकित्सेवर अनेक लेख लिहिले होते. अंनिसची अनेक ठिकाणी वकीली केली होती. त्यावेळी गाजलेल्या नाडीग्रंथ प्रकरणात तर ते अगदी हिरिरीने लेख लिहित.

ज्याचे करावे भले..

लेखक आजी यांनी बुधवार, 09/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मी आजवर अनेकजणांना आर्थिक आणि इतरही मदत केली आहे. मला बऱ्याच वेळा यश आले पण जास्त वेळा वाईट अनुभव आले. त्यातले नमुन्यादाखल अगदी थोडे किस्से सांगावेसे वाटतात. माझ्या घरच्या प्रत्येक कामवालीचे मी बॅंकेत खाते काढून दिले. त्यांच्या पगाराची काही रक्कम त्यांच्या अनुमतीने त्यांच्या खात्यात जमा केली. बचतीची सवय व्हावी हा उद्देश. माझ्या एकुलत्या एक मुलाला सोबत म्हणून कायम एखादा गरजू मुलगा किंवा मुलगी घरी सांभाळली. तिला/त्याला शाळेत घातलं. कपडालत्ता, वह्या पुस्तकं, फी याची काळजी घेतली. मुलींच्या लग्नासाठी खर्चात मदत केली. भांडीकुंडी दिली. इतर कितीतरी मुलांचे क्लासेसचे पैसे भरले.

कथा एअरकंडिशनिंगची ः एका अनुभवाचा सारांश

लेखक केदार पाटणकर यांनी मंगळवार, 08/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मी एका ठिकाणी ग्रंथालय व माहिती केंद्रात काम करीत होतो. तेथे असलेल्या वातानुकूलन यंत्र बिघडलेले होते. थोड्या दुरुस्तीनंतर ते यंत्र पुन्हा सुरु होत असे व पुन्हा पहिले पाढे पंचावन्न. नव्या यंत्राची निकड होती. नवीन यंत्र घ्यावे किंवा केंद्राची पूर्ण खोलीच वातानुकूलित करावी असे दोन पर्याय समोर येत होते. मनुष्यबळ विकास विभागाचे प्रमुख माझे साहेब होते. त्यांना आपण म्हणू या. त्यांच्यासमोर विषय मांडला. त्यांनी तो वीज व ऊर्जा विभागाच्या प्रमुखांना पाठवला. या प्रमुखांनी सांगितले की, संपूर्ण जागा वातानुकूलित करणे खर्चिक आहे. त्यापेक्षा आकाराने लहान असलेला एक हॉल बांधू.

अचूम् आणि समुद्र (भाग २)

लेखक डॅनी ओशन यांनी मंगळवार, 08/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
अचुम् आणि समुद्र (भाग १) मी प्रवासाला निघालो तेव्हापासून फक्त काही क्षण झालेले. या काही क्षणातच काही तास लोटल्याचा मला भास होत होता. स्मृतींचा सततचा कलरव मला अस्वस्थ करत होता. एका क्षणातच मी शेकडो स्मृतींच्या गप्पाचा साक्षी होत होतो. स्मृती आणि माझ्यासाठी ११८ प्रभूंनी खास एक जहाज दिले होते. अर्थातच मला आणि स्मृतींना जहाजाची गरज नाही. आणी हे जहाज सुद्धा एक स्मृतीच. मी स्वतःच सम्पूर्ण सागर असल्यामुळे मी (आणि स्मृती) ह्यावर कोणत्याही हालचाली शिवाय अतिशय वेगाने अंतर कापू शकतो. पण स्मृती सवयींच्या गुलाम आहेत. नावेमध्ये, तेही आपापल्या जागी बसल्या नसतील तर स्मृती अस्वस्थ होतात हे मला लगेच लक्षात आले. आणि अस्वस्थ स्मृतिंचा गोंधळ नेहमी पेक्षा कैक पटीने जास्त असे. मी एकशेअठरांनी सांगितलेला मंत्र पुन्हा बडबडला: “अचुमा तू तर पहिला पीडित, शक्ती तुजला दिधली असे, शक्तीसोबत येई तुजवर जबाबदारी ही मोठी असे. ज्ञानचक्षूच्या मनोर्याखाली दुग्धाचा समुद्र असे, तेथे सत्वर जाउनी अचुमा थांबवी समराचे फासे.” मला अजूनही काही अर्थ लागत नव्हता. कोणती शक्ती मज दिधली आहे ? पश्चिमेच्या किनार्यावर सर्वसाक्षी ज्ञानचक्षू आहे इतके तर मी जाणुन होतो. तिथे ज्ञानचक्षूशी लढण्यासाठी अनेक सैन्य कूच करत. ज्ञानचक्षूने सर्वज्ञानी असण्याचा दावा केल्यावर अनेक रथी महारथी खवळत. "असशील बुवा. चांगले आहे." असे म्हणणे काही मोजक्यांनाच जमे. ज्यांना हे जमे ते आपापल्या साधनेत व्यस्त राहात. यासोबत ज्ञानचक्षू सुद्धा सतत आपल्या सर्वसाक्षी डोळ्यांनी सर्व काही पाहत असे आणि त्याच्यावर ऊच्चारल्या गेलेल्या अज्ञात शापवाणीने मिश्फुश्फुसक्फुस पार्भदभ्ध्बाबमधे घडणार्या एक अन् एक गोष्टीवर करडी नजर ठेवे. हे न करणे त्याच्या अवाक्याबाहेरचे होते. त्याची भव्यता ही अतिषय जुन्या कातीव पांढर्याशुभ्र खडकावर जरी बनली असली, तरी वर्षानुवर्षे त्याने केवळ इतरांकडेच आपल्या प्रखर ऊजेडात पाहीले होते. आपले प्रतिबिंब त्याने कित्येक युगांपूर्वी एका किनार्यावरच्या महाकाय लाटेच्या भिंतीत पाहिले होते, तेव्हा आपल्या चमकत्या कायेवर तो भलताच खुश झाला होता. युगानयुगे तो केवळ इतरांची स्थित्यंतरे पाहात आला. स्वतः कडे नजर वळवणे त्याला कधीही जमणार नव्हतेच. त्यामुळे इतरांना त्याच्या ठिकाणी जो अजस्त्र काळवंडलेला मनोरा दिसायचा तो त्याला कधीही दिसणार नव्हता. कारण अशा लाटा काही रोज येत नसतात. त्यामुळे त्याच्याकडे पलिते घेऊन धावणार्यांबद्दल प्रत्येक वेळेस त्याला आश्चर्यच वाटे, कारण त्याच्या मनात अजूनही तो चमचमता शुभ्र मनोराच होता. असो.

मात्र ११८ च्या बुद्धिबळ पटात माझा काय भाग आहे याचा मला अंदाज आला आहे. नाविकांमधला सततचा कलह सोडवण्याचे काम माझ्या नाजूक (आणि अस्तित्वात नसलेल्या) मानेवर येउन पडले आहे. पुन्हा अचुम् ची कथा घडायला नको, हे अचुम् नाही तर कोण पाहणार ? मी माझे लांबलेले तास/दिवस याचा विचार करण्यात घालवत असे. यामधून स्मृतींच्या गडबडीपासून आराम मिळे. बराच विचार करुन मला न आवडणार्या निष्कर्षापर्यंत मी पोहोचलो : मला स्मृतींचा कलरव ऐकावा लागेल. त्यासाठीच तर मला त्यांची सोबत दिली आहे ! नाविकांच्याच या स्मृती, नाविकांचा स्वभाव समजण्यासाठी मला कितीही पीडा झाली तरी या स्मृतींशी मी ओळख करुन घेतलीच पाहीजे ! हे जाणून मी माझे (नसलेले) डोळे बंद केले, आणि स्मृतींच्या गुंतागुंतीत स्वतःला झोकून दिले:

झाड आहे साक्षीला

लेखक लेखनवाला यांनी शनिवार, 05/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
अख्खी फॅमिली राहायची विठठलवाडीला पार तिकडे ठाण्याच्या पण पुढे आणि रामनाथचा जॉब मुबंईला सांताक्रूझला, रोजचा ट्रेनचा प्रवास होता, अजून बरीच वर्ष बाकी होती रिटायर व्हायला. बक्कळ कमाई रोजची. कामावरुन सुटल्यावर खिश्यात नुसती नोटांची बंडल….आणि त्यांचा चुरळा ठरलेला, कारण तो ट्राफिक हवालदार होता. मागच्या कित्येक वर्षापासून तिथल्या त्या पी. एन. वाळवे रस्त्यावर ठरलेली डयुटी होती, सगळे वाटे ठरलेलें असायचे, अगदी वरच्यापासून खालच्यापर्यंत.

टंकबोली

लेखक प्रकाश घाटपांडे यांनी मंगळवार, 01/09/2020 या दिवशी प्रकाशित केले.
बोली ही कुठल्याही संभाषणात संवादात आपण वास्तव जगात वापरतो.आपण त्याला वैखरी वाणी असेही म्हणतो. ही बोली वापरताना आपण नकळत अजून एक संवादाच माध्यम वापरत असतो ते म्हणजे देहबोली. ही देहबोली आपल्या बोलीत मिसळून गेलेली असते. या देहबोली व बोली यांच्या समुच्चयातून आपल्या भावना प्रकट होत असतात. आपल्या बोलीतून व्यक्त होणारे भावना, विचार यांचे आपल्याला अभिप्रेत असलेले प्रकटीकरण झाल्यानंतर समोरच्याला झालेले त्याचे आकलन यात ताळमेळ नसेल तर गैरसमज तयार होतात. हा ताळमेळ तपासायचा कसा? आपण तो प्रतिसादातून तपासायचा प्रयत्न करतो. म्हणजे पुन्हा आकलन हा मुद्दा अपरिहार्य.