Skip to main content

राहती जागा

एन्टरप्रेन्युअर

लेखक अरुण मनोहर यांनी रविवार, 31/07/2016 06:50 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी डायरी लिहिणे बंद केले होते. निसर्गाच्या सोहळ्यात रमलो होतो. उन्हाळ्याची भट्टी पावसाच्या धारांनी थंड झाली. एक उत्साही शिरशिरी सगळीकडे पसरली. मातीचा सुगंध भरभरून आत साठविल्यावर उन्हाळी घामट चिडचिडीचा विसर पडला. ह्या वर्षी पावसाने देखील हात आखडता न घेता, भरभरून जीवनदान केले. जुन्या कवितेत म्हटल्याप्रमाणे “आनंदीआनंद गडे जिकडे तिकडे चोहीकडे” भरून वाहत होता. पावसाने पंधरा एक दिवस सृष्टीची भरभरून ओटी भरल्यानंतर काही दिवसांचा विश्राम घेतला. झाडाझाडांवर गपचिप बसलेले पक्षी किलबिल करीत स्वच्छंद विहार करू लागले. पाण्याने तुंबलेली बिळे सोडून किडे आणि इतर जीव नवा आसरा शोधू लागले.

कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख

लेखक खेडूत यांनी मंगळवार, 19/07/2016 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
कम्युनिटी (समूह) रेडिओची ओळख बालपणीच रेडिओशी संपर्क आला - रेडिओ हेच मनोरंजन आणि माहितीचे साधन असल्यामुळे खूप रेडिओ ऐकत असे. गाण्यांसाठी बिनाका गीतमाला अन विविध भारती, तर क्रिकेटवेडापायी सुशील दोशी यांचे धावते वर्णन वेळी अवेळी तासनतास ऐकले असेल. पुढे इलेक्ट्रॉनिक्स शिकतांना स्वतःचा इवलासा प्रक्षेपक तयार केला होता. पण फक्त प्रयोगच. गुरुजींनी तो प्रयोगाव्यतिरिक्त वापरणे बेकायदेशीर असल्याचे सांगितले होते. त्यामुळे त्याच्यातला उत्साह मावळला होता. पण रेडिओ नेहेमीच जवळचा सोबती राहिला. आजही दूरचित्रवाणीपेक्षा विविध भारती किंवा इंटरनेट रेडिओ जास्त ऐकतो.

लंडन कट्टा - सालाबादप्रमाणे यंदाही होणार!

लेखक आदूबाळ यांनी शुक्रवार, 10/06/2016 17:57 या दिवशी प्रकाशित केले.
गेली दोन वर्षं लंडनमध्ये मिपाकरांचा वासंतिक कट्टा होतो आहे, पण त्याचे वृत्तांत आणि फोटो कुठेही लीक होऊ न देण्याची पुरेपूर काळजी घेतली गेली. ;) पण यंदा न्यूयॉर्क आणि रत्नागिरी या जगातल्या आघाडीच्या शहरांमध्ये मिपाकट्टे करायचं घाटत असल्याने तमाम (ग्रेटर) लंडनवासी मिपाकरांच्या हृदयांत कालवाकालव झाली. तसंच ज्येष्ठ आणि तरूण मिपाकर विजुभाऊ यांचं नुकतंच राणीच्या देशात आगमन झालं असल्याने कट्टा करायच्या बेताला पाठबळ मिळालं.

जुनी वास्तु...

लेखक अज्ञात यांनी मंगळवार, 10/05/2016 13:24 या दिवशी प्रकाशित केले.
॥ श्री ॥ Akshi जुनी वास्तु... भाग १ असा प्रकार की जेव्हा असते तेव्हा किम्मत नसते, आता खुप आठवण येते... पण टिकवुन ठेवल्ये... आहे मनात अजुन! आज तुम्हाला पण घेऊन जातो... भावे यांचे आक्षी गावातील एक कौलारु ८०-८५वर्ष जूने घर, पुरुषोत्तम जनार्दन भावे नावाची पाटी... मोरपीशी रंगाचा दुहेरी दरवाजा... त्या दरवाजाच्या उजव्या डाव्या बाजूला शंकरपाळी लाकडी फळ्या...

बागेसंदर्भात सल्ला हवा आहे

लेखक स्वामी संकेतानंद यांनी बुधवार, 20/04/2016 15:04 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडे म्हणजे विदर्भात एक 50ft×96ft एक प्लॉट घेतलाय. आजूबाजूला सध्या तरी उघडे माळ आहे. या प्लॉटवर आईबाबांना विरंगुळा म्हणून आणि त्यांची नातवंडे गावाकडे आली की त्यांच्यासाठी नवल आणि बदल म्हणून एक छोटीशी बाग उभी करायचे योजिले आहे. गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर ईशान्य कोनावर बोर घेतली. पाणी भरपूर आहे. वीज जोडणी आणि सबमर्सिबल पंप ही दोन्ही महत्वाची कामे झाली आहेत. माळ असल्याने पक्के कुंपण उभारणीचे काम सध्या सुरु आहे. एक 12×12 ची पूर्वाभिमुख खोली, संडासबाथरूम एक कोपऱ्यात असेल. ईशान्येलाच बोअरशेजारी गेट असेल. बाग नेमकी कशी असावी यावर घरी सध्या भरपूर काथ्या कुटला जात आहे.

घोस्टहंटर - पायरेट ऑफ़ अरेबिया ४

लेखक DEADPOOL यांनी शनिवार, 09/04/2016 18:49 या दिवशी प्रकाशित केले.
वाचकहो घोस्टहंटरला झालेल्या अक्षम्य दिरंगाईबद्दल मी माफी मागतो. भ्रमणध्वनि वर टंकण करत असल्याने मालिकेस उशीर झाला. पुढील भाग लवकर येतील याची खात्री बाळगावी! १. तर मंडळी रोला अजूनही समजत नव्हते की पायरेटचा अंत कसा करावा, कारण पायरेट कोणत्याही शस्त्र अथवा अस्त्र याने घायाळ होत नव्हता. शैतानाच्या दूताकडून त्याला ही जहाज मिळाली होती.त्या जहाजाच्या प्रत्येक भागावर त्याची हुकुमत चालू होती. जहाजाची प्रत्येक दोरी म्हणजे एक साप होतात. असे अनेक प्रकारचे साप तिथे होते. रो कंटाळून त्याच्या ऑफीसमध्ये बसला होता.

काळ असा.......

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 01/04/2016 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
[अरबी साहित्यातील निजार कब्बानी या नामवंत सिरीयन कवीच्या काही कवितांचा स्वैर अनुवाद! त्यातील ‘ A Lesson in Drawing!’ या कवितेचा अनुवाद मिपाकरांसाठी! बाकी माहिती Google वर आहेच!] माझ्या मुलाने माझ्यासमोर रंगांचा बॉक्स ठेवला, म्हणाला, ‘बाबा, पक्ष्याचे चित्र काढा ना!’ मी करड्या रंगात ब्रश बुडवला, गज आणि कुलूपांनी बंदिस्त असा एक चौकोन काढला. त्याने आश्चर्याने डोळे विस्फारले, ‘............. पण बाबा, हा तर तुरुंग आहे!

मिसळपावचे मारेकरी - ... ... ...

लेखक नीलमोहर यांनी गुरुवार, 25/02/2016 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
अधूनमधून 'मिसळपाव.कॉम' वरती काही लोकांचा धाग्यांचा तुफानी मारा पहायला मिळत असतो. असे लिहीणार्‍यांना 'वायझेड माझा' ने मिसळपावचे शिलेदार म्हणून वाखाणले होते. थोडेसे त्याविषयी आणि त्यासारख्याच लेखकांविषयी लिहावे म्हटले. तर आज सगळ्या भारतात आणि विश्वात जिथे जिथे मराठी लोक राहतात, मिसळपाव वाचतात त्यांना ... ... .. ही नावे (प्रत्येकाने आपापल्या अनुभव आणि माहितीनुसार नावे घालून गाळलेल्या जागा भरून घ्याव्यात) बरीच कुप्रसिध्द असल्यामुळे परिचयाची असतील. मागे वाचलेल्या एका लेखानुसार या सगळ्यांनी लिहिलेले सगळेच्या सगळे धागे हे इंटरनेशनल ट्यारपी-गेनर आहेत, ... ची १७०६०+ वाचने, ... ची १८८८१+ वाचने, ...

स्वयंपाक चौथर्‍यावर नवर्‍यांना प्रवेश द्यावा काय ?

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी रविवार, 31/01/2016 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
पे रणा अबाबा!!!: नवर्‍यांना महिलाअंतःपुर अर्थात स्वयंपाकचौथर्‍यावर प्रवेश द्यावा का नाही? हा मुद्दा सध्या चांगलाच गाजतो आहे. अखिल अंतर्जालात(आणि जगात!) या विषयी काथ्याकूट न येणे ही काहिशी आश्चर्याची (आणि तितकीच खेदजन्य) बाब आहे. ( पुर्वीचं जग राहीलं नाही...!) सदरील प्रकरणावर चर्चा करण्यासाठी हा काथ्याकूट ! यासंदर्भात "कचकून लाथा ब्रिगेड" हे नाव चर्चेत येत आहे . या संघटनेविषयी कुठेच्च जास्त माहिती मिळाली नाही.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.