Skip to main content

राहणी

सेन्टी मेन्टी : जखम आणि खपली

लेखक मन यांनी शनिवार, 23/03/2013 01:19 या दिवशी प्रकाशित केले.
काहीतरी भस्सकन खुपतं. जखम होते. कधी वरवरची तर कधी खोल खोल रुतलेली. कधी साधसच खरचटत्;कधी बाहेरचं काहीतरी खोल आत रुतून बसतं. कधी आपलाच एखादा भाग हिसकटून, उचकटून बाहेर निघतो ना, तेव्हाची जखम तर जीवघेणी असते. जखम कसली, तेवढ्या प्रमाणात आलेला त्या भागाचा मृत्यूच की तो. तेव्हा ठणकतं; खुपतं; दुखतं. पण तरीही show goes on ह्या उक्तीप्रमाणे आहे तिथून आहे तशीच जमेल तितकी जखम हळूहळू भरुन यायला लागते. फार मोठ्ठा भाग गेला असेल तर शरीर तो संपूर्ण भाग पुन्हा बनवूही शकत नाही कित्येकदा. पण जगताना त्याचीही सवय करुन घ्यावी लागते; खरं तर सवय होउन जाते. वेदनेचा आणि तीव्र दु:खाचा तो क्षण मागे सरु लागतो.

जिकड खोबर, तिकड चांऽऽगभल!!!

लेखक साऊ यांनी बुधवार, 20/03/2013 04:41 या दिवशी प्रकाशित केले.
आता सांगायच म्हणजे फारा वर्षापुर्वीची गोष्ट. आता किती वर्षापुर्वीची म्हणता? तर बघा त्या सिद्दी जौहरनं ते वेढा घातला होता किनी पन्हाळ्याला तेंव्हाची. तेंव्हाची म्हणा किंवा त्या आधीचीही असेल, पण मला आपली वाटते; तेंव्हाची, म्हणुन तेंव्हाची!! तर तेंव्हा काय झाल तर सारा मुलुख लुटला गनिमांनी. बायाबापड्या बाटवल्या. मंदिरं तोडली. देवादिकांच्या मुर्ती फोडल्या. उभी पिकं कापुन न्हेली हत्ती घोड्यांना चारायला. जित्रापंच्या जित्रापं पळवली कापुन खायला. असा वणवा पसरावा तशी पसरली त्यांची फौज दख्खनावर. कुठं कुठं आसरा र्‍हायला नाही. माणसं सैरावैरा पळाली रानोमाळ. शिवाजी राजा सुद्धा संकटात पडला.

फोडणी, पिठलं आणि भजी

लेखक नाना चेंगट यांनी शनिवार, 16/03/2013 14:58 या दिवशी प्रकाशित केले.
कधी कधी संध्याकाळ झाली की भुक लागते. दुपारचं जेवण झालेलं असतं पण काहीतरी खावं असं मनापासुन वाटतं. काहीतई थोडा नाश्ता केला की बरं वाटतं. जास्त खाल्लं तर रात्रीच जेवण जात नाही अन मग भल्या पहाटे पोटात कावळे काव काव करतात. संध्याकाळी काय खावं हा मोठा प्रश्न असतो. आजकाल बाहेर जावून खाणं काही परवडत नाही. ज्यांना परवडतं त्यांनी खावं. तब्येतीला पण झेपत नाही. बाहेरचं खाऊ नका डागतर कानी कपाळी ओरडून सांगतो आणि माझ्यादेखत मदतनीसाला जरा वडापाव घेउन ये रे दोन चार नाना बर्‍याच दिवसांनी आलाय तर खाउ दोघे जण असं सांगतो. त्याच्या समोर काही बोलणं हा गुन्हा असतो.

एकत्र कुटुंब ....जबाबदारी कोणाची?

लेखक लिलि काळे यांनी शनिवार, 09/03/2013 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
आजकाल मुलांचा आपल्या पत्नीकडे बघण्याचा द्रुष्टिकोन खूपच चांगला झाला आहे. आणि बरेचसे तरुण आपल्या बायकोला समानतेने आणि सन्मानाने वागवताना दिसतात. पण सासरच्या बाकिच्या लोकांच्या वागण्यात एवढा फरक अजून पडलेला नाही दिसत. फक्त मुलाच्या घरच्यांनीच मुलाला वाढवताना कष्ट घेतले असतात का? आजकाल खूप जणांची पसंती लग्न झाल्यावर स्वतंत्र राहण्यासाठी असते, पण ह्यासाठी फक्त मुलींनाच दोषी ठरवले जाते हे बघून खूप दुख होते.मुलींचा असा विचार होत असेल तर त्याला काय गोष्टी जबाबदार आहेत हे पण पाहिले पाहिजे. अनेक सासवा माझी सून म्हणजे माझी मुलगीच असा चार लोकांसमोर दिखावा करण्यासाठी बोलतात.

असेही...

लेखक स्पंदना यांनी मंगळवार, 26/02/2013 05:50 या दिवशी प्रकाशित केले.
शनिवार सकाळ! मुलांच्या क्लासेसची वेळ! मी न्याहरीसाठी बटाटेवडे करायला घेतलेले. त्यामुळे माझी सकाळ सोलणे, तळणे अन घोळण्यात आकंठ बुडालेली. "माझी बॅग"," माझे शुज?"," वॉटर बॉटल", अश्या आरोळ्या क्षणाक्षणाच्या अंतराने इंटेन्स होत होत्या. आम्ही दोघे किल्ला लढवण्यात गुंग. अन बघता बघता हे तिघेही बाहेर पडले. मी अजुनही वडे तळत असल्याने ते बाहेर पडल्याचे समजलेच नाही. पण मग घरातली किलबील ( हो! अस म्हणाव लागत. कितीही कलकलाट अन शब्दाशब्दाला वाद फुटत असला तरी मुल जे काही करतात त्याला किलबील अन किती गोऽऽड! असच म्हणायच असत.) बंद झाल्याच जाणवल.

त्रागा धागा... वैताग.....

लेखक मन यांनी मंगळवार, 19/02/2013 12:31 या दिवशी प्रकाशित केले.
हा धागा मी का लिहितोय ? कटकट करुन फार थकलोय. चिडचिड करायचाही स्टॅमिना संपलाय. अगदि लहान लहान गोष्टींत चिडचिड करायची पूर्वीपासून सवय. एक बस सुटली ऑफिसची नि ५ मिनिटं वाट पहावी लागली, कर चिडचिड. बॉसनं येताना सगळ्यांना शेकहँड केलं गुड मॉर्निंग म्हणत, मला सोडलं, कर चिडचिड. तिचं नाव ठाउक नाही, पण रोज येउन ओळखीची स्माइल देते, आज एकदम अनोळखी चेहरा करुन चाल्ली गेली, कर चिडचिड. पक्यानं आज पुन्हा फुकटात चहा पिला माझ्याकडून नि पुन्हा वर निर्ढावल्यासारखा फुक्टात सुट्टा मारुन गेला; बोंबल त्याच्या नावानं.(तरी त्याला स्वतःहून बोलावून चहा पाजायचं सोडू नकोस.

Valentine Day

लेखक NiluMP यांनी रविवार, 10/02/2013 15:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रांनो, Valentine Day येउ घातला आहे. काही संस्कृती रक्षक आता पासून आपल्या बाहया सरसावून बसले असतील तर काहींना शहाणपण आल आहे एवढी मोठी युवासशक्तीची व्होटबॅंक आपल्या हातून जाणार म्हटल्यावर शहाणपण येणारच हो अर्थात व्होटबॅंक हे राजकारण्याच पहिल प्रेम असत नाही का. असो प्रेम व्यक्त करण्यास बहुतेकजण घाबरत असतात यात मार पडेल, अपमान होइल ही भावना कमी तर नकार मिळाला तर ही अपराधाची भावनाच जास्त असते.

जावई बसले अडून

लेखक अधिराज यांनी मंगळवार, 05/02/2013 18:10 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या शेजारच्या पावटे काकूंना त्यांच्या पोरीच्या म्हंजे स्वर्णीच्या लग्नाबद्दलचा लेख मुकपीठ मध्ये छापून आणायचा होता. त्यांच्या मते हे लग्न आगळेवेगळे आणि अभिनव पद्धतीने झालेले होते.शेजारधर्म पाळण्यात कसूर नगं म्हणून त्यांच्याकडून तिच्या लग्नाची बैजवार माहिती घेऊन लेख लिहून काढला. म्हटलं छापायला देण्यापूर्वी एकदा सगळ्यांच्या डोळ्याखालून सरकवावा. आन् कोणी अजुन काही चांगलं शीर्षक सुचवतय का ते बघावं. कारण ह्या बाबत मिपाकरांनी खटासि खट यांना त्यांच्या मुतपीठाच्या लेखासाठी केलेल्या मदतीचा अनुभव जमेला व्हता. तेव्हा शांत चित्ताने आपण हा लेख वाचावा अशी नम्र इनंती करुन माझे भाषण संपिवतो.

मस्कत कट्टा - दोघांचाच पण दिलखुलास..

लेखक अर्धवट यांनी सोमवार, 21/01/2013 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, कामानिमित्ताने कुठे कुठे फिरणं होत असतं हे तुम्हाला माहिती आहेच, असाच उडतउडत इकडे मस्कतमधे आठवडाभर येउन पडलो, एक दिवस इकडे जरा स्थिरस्थावर होण्यात गेला, मग नेहेमीप्रमाणे इथे पहायला काय आहे, फिरायला काही आहे का वगैरे शोध चालू झाला, फेसबूकावर ज्योतीतैशी गप्पा मारता मारता, तिने सांगीतले आपले मिपाकर प्रभाकर पेठकरकाका तिकडेच असतात, जमलं तर भेट.

दगड्या !

लेखक तर्री यांनी बुधवार, 09/01/2013 00:41 या दिवशी प्रकाशित केले.
कवडा हया पक्ष्याचा संदर्भ आज खूप वर्षांनी आला आणि भूतकाळात घेवून गेला. मी ८ वीत असताना तुकाराम ( उर्फ तुक्या दुसरे उपनाम दग्ड्या ) हा एक काळाकभीन्न व मजबूत गडी आमच्या वर्गात दाखल झाला. मिसरूड फुटलेला हा पोरगा बाप्या शोभत असे. त्याच्या गावात ७ वी पर्यन्त शाळा होती आणि म्हणून सुमारे दहा की.मी. वरून चालत तुक्या आमच्या गावातील शाळेत येत असे.घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची. तो त्याची आई आणि इतर ३ भावंडे . घरात कमावणारे कोणी नाही. वडील त्याच्या लहानपणीच वारले होते.बहुतेक हे कुटुंब १ वेळच जेवायचे.