Skip to main content

प्रवास

आमंत्रण - सोमवार संध्याकाळी खादाडिचं

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 11/02/2011 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार लोकहो, गेल्या महिन्यात मिपाकरांची सहल यशस्वि झाल्यापासुन सगळ्यांनी एकत्र जेवायला जावं असा विचार मनात होता, मागच्या सोमवारी मला श्री. स्पा यांच्या पंगतीचा लाभ झालाच होता तसंच श्री. वल्लींबरोबर ही खादाडी चर्चा चालुच होती,म्हणुन खालील प्रमाणे कार्यक्रम ठरवलेला आहे त्याचं हे खुलं आमंत्रण. कार्यक्रम फक्त जेवणाचा आहे, - हॉटेल पंचवटी (गुजराथी थाळी) , भांडारकर रोड, पुणे. दिनांक - १४ फेब्रुवारी २०११. वेळ - संध्याकाळी ०७.१५. जे येणार असतील, त्यांनी नुसतं इथे प्रतिसादात हो म्हणुन चालणार नाही, नंतर व्यनिने कळवावे अगदी मोबाईल नंबर सहित.

फ्लाईट ९

लेखक निनाद यांनी शुक्रवार, 11/02/2011 08:28 या दिवशी प्रकाशित केले.
फ्लाईट ९ १९८२ सालचा २४ जूनचा दिवस. ब्रिटिश एयरवेजचे फ्लाईट ९ लंडन च्या हीथ्रो विमानतळावरून निघाले होते. ही फ्लाईट मुंबई, चेन्नई, कौलालम्पूर, पर्थ अशा मार्गे मेलबर्नला जायची होती. हे एक बोईंगचे ७४७ जातीचे विमान होते. चार इंजिने असलेले हे भले मोठे विमान ब्रिटिश एयरवेजच्या ताफ्यात अनेक वर्षांपासून होते. फ्लाईट उत्तमरित्या चालली होती. विमान निरनिराळ्या ठिकाणी थांबत प्रवासी उतरवत घेत होते. आता विमानाने भारतीय उपखंड जवळपास सोडला होता. आता भारतीय समुद्रावरून मलेशिया इंडोनेशिया या मार्गावरून मार्गक्रमण सुरू झाले.

आत्मविश्वास

लेखक असुर यांनी गुरुवार, 10/02/2011 07:23 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग आहे एका शनिवारी मी लंडनहून गावी परतत होतो तेव्हाचा. लंडनहून घरी परतताना मी नेहेमी रात्री १०:१४ ची ट्रेन पकडायचा प्रयत्न करतो, कारण या गाडीला अजिबात गर्दी नसते. तुरळक प्याशिंजर लोक आपले इथंतिथं सांडलेले असतात. आणि मोजून चार ष्टापात गाडी आमच्या ठेसनात पोहोचतेदेखील. अशी अजिबात गर्दी नसलेली गाडी पकडली की मलासुद्धा फोनाफोनी करायला आणि मोकळ्या आवाजात गप्पा हाणायला बरं पडतं! त्या दिवशीसुद्धा माझा डबा ऑलमोस्ट मोकळाच होता, अगदीच बोटावर मोजण्याइतकी डोकी होती, दाराजवळची एक मोक्याची जागा पकडून मी बसून घेतलं, सगळं कसं मस्त जमून आलं होतं.

जय गणराज

लेखक ashvinibapat यांनी सोमवार, 07/02/2011 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
आज माघ चतुर्थी, श्री गणेशाचा जन्मदिवस. त्यानिमित्त महाराष्ट्रात सर्वत्र माघी गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होतो. पुणे नासिक महामार्गावरील मंचर पासून अवघ्या २.५ कि.मी. अंतरावर असणारे आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग हे गाव निसर्गसंपन्न डोंगररांगांच्या कुशीत वसले आहे.

मोराची चिंचोळी व रांजणखळगे.

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/02/2011 00:20 या दिवशी प्रकाशित केले.
सहल - मोराची चिंचोळी व रांजणखळगे. मित्रहो, अचानक ठरवुन देशस्थात ब-याच गोष्टी नीट होतात हे बाबांचं वाक्य सिद्ध करण्यासाठीच की काय दोन दिवसात हि सहल ठरवली आणि यशस्वी केली. या बद्दल आम्ही सर्व प्रथम आमचे मित्र कि जे श्री. राजशेखर व श्री. अभिजित यांचे अनेक आभार. तर या सहलीचा रिपोर्ट खालीलप्रमाणे सादर आहे.