Skip to main content

प्रवास

सांदण दरी - एक प्रवास वेगळाच.

लेखक ५० फक्त यांनी गुरुवार, 17/03/2011 00:32 या दिवशी प्रकाशित केले.
भुमाता अजुन वाट पाहते आहे आपल्या लेकीची, तिच्यावर झालेला अक्षम्य अन्याय पाहिलाय तिनं, त्या कष्टांना दुर करुन त्या लाडाच्या लेकीला पुन्हा एकदा काळजाशी लावुन घेउन झोपवायचं आहे तिला. त्या पराक्रमी राजाच्या वंशाच्या दिव्यांना जोजवुन निजवताना तो प्रचंड पाळणा हलवुन हलवुन थकलेले हात आपल्या हातात घेउन काळजातुन वाहणा-या गार पाण्यात त्या हातांच्या जखमा थोड्या शांत करायच्या आहेत. या साठी त्या आईनं आपल्या काळजाची वाट उघडुन ठेवली आहे, आता फक्त वाट आहे ती लाडकी लेक येण्याची.

निसर्गवेड्यांसाठी नवी भेट - पुण्याचे पक्षीवैभव

लेखक प्रसन्न केसकर यांनी बुधवार, 16/03/2011 15:07 या दिवशी प्रकाशित केले.
एनआरसीओतर्फे `पुण्याचे पक्षीवैभव’ फील्ड गाईडचे प्रकाशन २० मार्च रोजी नॅचरल रिसोर्सेस कॉन्झर्वेटर्स ऑर्गनायझेशन (एनआरसीओ) या पुण्यातील संस्थेच्या वतीने जागतिक वनदिनाचे औचित्य साधून दिनांक २० मार्च रोजी वनाधिकारी व वन्यजीव तज्ञ श्री. प्रभाकर कुकडोलकर यांनी लिहिलेल्या `पुण्याचे पक्षीवैभव’ या पक्षीनिरीक्षकांसाठीच्या फील्ड गाईडचे प्रकाशन करण्यात येणार आहे.

कोसळत्या सरींचा राजमाची

लेखक जातीवंत भटका यांनी गुरुवार, 10/03/2011 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
कोसळत्या सरींचा राजमाची शनिवार रविवार राजमाची !!! म्हणताच ब-याच मंडळींची नावे आली होती पण त्यातले १३ मावळेच शब्दाला जागले होते त्यात मी, लकी प्रशांत, राहूल-वसुधा(दांपत्य), शितल जाधव, श्रीकांत, अभिजीत अशा जुन्या मंडळींसोबत विजया, अश्विनी, प्रसाद, महेश आणि शितल ( नावावर जाऊ नका हा मुलगा आहे ) अशी नवी मंडळीही होती. पहाटे ६.३० ची लोकल पकडून लोणावळा गाठायचे असे ठरविले होते.

धुक्यात हरवलेला तैलबैला

लेखक जातीवंत भटका यांनी सोमवार, 07/03/2011 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
धुक्यात हरवलेला तैलबैला
पावसाळ्यातला एकही विकएन्ड घरी बसायचे नाही असा विडाच उचलला असल्याने येत्या शनिवार-रविवार तैलबैल-घनगड असा बेत आखला होता. कमी जास्त होत होत अखेरीस ९ शिलेदार तयार झाले. आमच्या कुठल्या ट्रेकमधे व्यत्यय आला नाही, असे झाले तर शपथ !! ५ जुलैच्या भारत बंदचा वचपा आमच्या कंपनीने शनिवारी "वर्कींग" ठेऊन काढला होता.

जिजामाता उद्यानात (राणी बाग) फेरफटका

लेखक योगेश२४ यांनी रविवार, 06/03/2011 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
जिजामाता उद्यान प्राणीसंग्रहालयात मारलेला एक फेरफटका. जे काहि उरले सुरले प्राणी/पक्षी आहेत ते आत्ताच पाहुन घेणे योग्य नंतर कदाचित फक्त रिकामे पिंजरे बघायला मिळतील.

५० फक्त

लेखक ५० फक्त यांनी शुक्रवार, 04/03/2011 11:53 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या आठवड्यात मी माझं मिपावरचं नाव बदललं charshad चं ५० फक्त केलं. त्या संदर्भात मला विचारलेले प्रश्न १. हे का केलं ? - ब-याच दिवसापासुन होतं मनात हा बदल करायचा पण १३ फेब्रु. च्या कट्ट्यात श्री. निलकांत यांच्याबरोबर चर्चा केल्यावर यावर अंमल झाला. २. हेच का ? - आता हा दिर्घ उत्तरी प्रश्न आहे. नाही वर्ल्ड कप चालु झाला म्हणुन नाही, पण याला थोडा क्रिकेटचा संदर्भ आहे. ४ वर्षापुर्वी पर्यंत क्रिकेटचे दोनच प्रकार होते १. कसोटी आणि २.

गोपे घाट आणि शिवथर घळ

लेखक केदार बर्वे यांनी शुक्रवार, 04/03/2011 08:21 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व भटक्यांना नमस्कार, पुणे आणि परिसरातील जवळ जवळ बहुतेक किल्ले बघून झाल्या मुळे २ दिवसात छोटा असा कुठला ट्रेक करता येईल असा विचार करत होतो, मध्यंतरी आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक वाचनात आले होते आणि त्यामुळे जुन्या घाट वाटांची पुस्तकी माहिती झाली होती, त्यातलाच एक घाट म्हणजे गोपे घाट. गोपे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक करायचा असे ठरवले, २०१० च्या पावसाळ्यातच उपांडे घाट आणि शिवथर घळ असा ट्रेक एका खासगी संस्थे बरोबर केल्याने थोडी माहिती होती तरी पण गुगल च्या मदतीने नकाशा नजरे खालून घातला, आनंद पाळंदे यांचे चढाई आणि उतराई हे पुस्तक मदतीला होतेच पण पाळंदे यांनी हे