प्रवास
शिवराज्याभिषेक सोहळा ६ जून २०११
रायगडावर ६ जून रोजी हजारो शिवभक्तांच्या उपस्थितीत श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराजांचा ३३८ वा राज्याभिषेक सोहळा मोठ्या दिमाखात पार पडला.जबरदस्त पावसात आणि धुक्यात सोमवारी पहाटे मुख्य सोहळ्याला सुरुवात झाली.
मंत्रोच्चार आणि संस्काराबरोबर कुलदेवतेला स्मरून शिवरायांच्या सुवर्णमूर्तीवर श्रीमंत युवराज संभाजीराजे छत्रपती यांच्या हस्ते राज्याभिषेक संपन्न झाला.यावेळी महाराजांच्या जयजयकाराने सारा आसमंत दणाणून गेला होता.
पोवाडे, ललकारी,तुतारी च्या आवाजाने वातावरण भारुन गेलं होतं.
यावेळी नितीन देसाई यांनी पुढील वर्षी सोहळा आणखी दिमाखदार आणि भव्य होणार असल्याचा सांगितलं....तसंच रायगड,राजगड आणि सिंधुदुर्ग
छोट्याशा बेटावरची केंदशासित नगरी --- दमण ..
दमणला जाण्याचा योग अचानक येईल असे वाटले नव्हते.आमच्या पर्यटनस्थळांच्या यादीत दमणचा क्रमांक उशिरा होता.परंतु २८ आणि २९ मे २०११ ला मी व माझी पत्नी वर्षा दमणची पर्यटन यात्रा करून आलो.२८ तारखेला सकाळी १० वा वापी रेल्वेस्थानकावर पोहचलो आणि टँक्सी स्टँड्वर दमण....दमण....असा ओरडा कानावर पडला.वापी ते दमण शेअर टँक्सी सर्व्हिस आहे .त्यांमुळे दमणला जाण्याची काळजी नव्हती. रेल्वेस्थानकाच्या जवळच कचोरी खाल्ली आणि थेट टँक्सीत बसलो.वापीत उन्हाळा जाणवत होता परंतु दमणला त्या तुलनेत जरा बरे वाटत होते.
मुंबई क्विझ...१..
मुंबईशी आपल्या सर्वांचा संबंध कधी ना कधी येतोच. मुंबईत राहात नसलो तरी.
आणि त्यातल्या त्यात मुंबईत राहणार्यांचा तर अर्थात रोजच.
पण, मजसहित सर्वच मुंबईत राहणार्या माणसाची थोड्याफार फरकाने कुत्र्याने चावा घेतल्यासारखी धावपळीची लाईफस्टाईल असते. अशा लाईफमधे अक्षरशः मानेच्या वर नजर उचलून आजूबाजूला बघणेही कधीकधी जमत नाही.
एक छोटीशी फोटो क्विझ सुरु करु धजावतोय. मुंबईतील ठिकाणे ओळखा.
सध्या चारच प्रतिमा टाकतोय. अगदी साध्या कॅमेर्याने काढलेल्या आहेत. फोटोग्राफीचे कौशल्य म्हणून अजिबात पाहू नये ही विनंती.
ओळखण्याचा प्रयत्न कराल?
१.
मिसळपाव