Skip to main content

मौजमजा

नुतन वर्षाभिनंदन (काही नववर्ष अवतरणे)

लेखक ऋषिकेश यांनी मंगळवार, 01/01/2008 या दिवशी प्रकाशित केले.

नवीन वर्षा संबंधी काही अवतरणे वाचनात आली त्यांचे मुक्त भाषांतरः

"तारुण्य म्हणजे नव्यावर्षाच्या स्वागतासाठी रात्रभर जागणे, आणि प्रौढत्व म्हणजे रात्रभर जागे राहावे लागणे"

"एक हितदर्शी (ऑप्टिमिस्ट) नवीन वर्षाची रात्र पुढील वर्षाचं स्वागत करण्यासाठी जागतो आणि अहितदर्शी (पेसिमिस्ट) जुने वर्ष गेल्याची खात्री करायला"

"अनेकजण नवीन वर्षाची आतुरतेने वाट पाहत असतात... त्यांना जुन्या सवयी नव्याने चालू करायच्या असतात ना!"

गाण्यांशी निगडीत आठवणी

लेखक देवदत्त यांनी सोमवार, 31/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
आपण दिवसभरात भरपूर गाणी ऐकत असतो. गुणगुणत असतो, गात असतो. बहुतेकांना तर सर्व गाणी तोंडपाठ असतात. पण ह्यातील अधिकाधिक गाणी फक्त आवडली म्हणून आपण लक्षात ठेवतो, गात असतो. तरीही काही वेळा असे होते की एखादे गाणे ऐकताना आपल्या आसपास/स्वत:सोबत काही घडत असेल तर त्यामुळे पुढे कधीही ते गाणे ऐकले की त्या गाण्याच्या वेळचा प्रसंग आठवतो. अशाच प्रकारची काही गाणी माझ्या आठवणीतील... ख्वाब हो तुम या कोई हकीकत.. किशोर कुमार ने गायलेले हे गाणे. मला नक्की आठवत नाही हे गाणे मी कधी पाहिले होते ते. एवढे आठवते की कोणत्या तरी समारंभात हे गाणे आहे.

"तारे जमिन पें" :- वेगवेगळ्या दिग्दर्शकांच्या नजतेतून .... [ आमिर ईज बेस्ट !!!]

लेखक छोटा डॉन यांनी शुक्रवार, 28/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
"तारे जमिन पें" पाहिला की नाही? मला माहित आहे तिकिटे मिळत नाहीत ,तरिपण एकदा थेटरवर चक्कर टाकाच आणि बाहेर पडणार्‍या प्रेक्षकांकडे निट पहा. नेहमीसारखा गोंधळ, दंगा करत बाहेर पडणारा प्रेक्षकवर्ग आज असा शांत का दिसतो आहे. काही जण एकदम स्तब्ध दिसत आहेत, काहिजण एकदम हरवल्यासारखे चालत आहेत, काहिंच्या चेहर्‍यावर विचारांचे काहूर माजले आहे. काय झाले नक्की थेटरात? कशामुळे सर्वजण असे वागत आहेत?

काही "दारोळ्या"

लेखक छोटा डॉन यांनी बुधवार, 26/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपावच्या वाचकांसाठी काही "दारोळ्या ..............." प्रत्येक तळीराम पिताना सांगतॊ मी दारू सॊडणार आहे दारू म्हणते़ तुझा संकल्प मीच ऊद्या मॊडणार आहे *************************************** दारूडे बेहॊष हॊईन कॊसळतात तेव्हा कींकाळी फॊडत नाहीत याचा अर्थ असा नाही की त्यांची हाडे मॊडत नाहीत *************************************** माझ्या हसण्यावर जाऊ नका माझ्या रूसण्यावर जाऊ नका एकदा प्यायला बसलॊ की माझ्या असण्यावर जाऊ नका *************************************** मी आहेच जरा असा एकटा एकटा राहणारा कुणीही पिताना दिसला॰॰॰ की आशेने पहाणारा *************************************** घराभॊवती कु

नवा चित्रपट "दस कहानियाँ :- सिनेमा जगताची पण २०-२० !!!

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 20/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
या चित्रपटाच्या प्रदर्शानानंतर चित्रपटस्रुष्टी सुध्धा नव्या साचात बदलत आहे याची जाणीव होते. याच्या आधी "डरना मना है, सलामे इश्क" यासारख्या चित्रपटातून हे प्रयत्न झाले पण प्रत्येक कधेचा कही ना काही धागा शेवटी एकत्र आला. पण "दस कहानियाँ " हा एकदम वेगळा अनूभव आहे. दहा वेगवेगळ्या कथा, एकाचा दुसरीशी काहीही संमंध नाही हे वेगळेपण. माझा नजरेने घेतलेला आस्वाद ....... *** मॅट्रोमोनी **** एका कंपनीच्या अति कार्यमग्न असणार्‍या "वाईस प्रेसिडेंटच्या" पत्नीची ही कथा. एकटेपणाला कंटाळलेली ही पत्नी मग स्वताच वेगळा मार्ग शोधते. अर्थातच पतीला अंधारात ठेवून.

बालचित्रवाणी, संस्कार, गोट्या आणि असेच काही

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 18/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
मुलामुलांचीऽऽऽ मजेमजेचीऽऽऽ बालचित्रवाणी फुले पाखरे आनंदाने , आनंदाऽऽनेऽऽ फुले पाखरे आनंदाने गाती गंमत गाऽणीऽ बालचित्रवाणीऽऽ , बालचित्रवाणी तात्यांचा लेख वाचून मी ही जुन्या काळात रमलो आणि आठवण आली ती बालचित्रवाणीची. त्यातल्या गाण्यांची, छोट्या छोट्या कार्यक्रमांची. अगदी पाण्याचे उपयोग, फळे-भाज्या यांतील जीवनस्त्त्वे यांची उजळणी करणारे छोटे छोटे प्रसंग ते दात स्वच्छ ठेवण्याबाबत दाखवली जाणारी "शीऽऽऽ, दात किती किडलेत हिचे' ही ओळ आठवून देणारी छोट्या मुलीची आणि सोबत तिच्या बाहुलीची प्रतिमा; अशी असंख्य क्षणचित्रं डोळ्यासमोर तरळली. त्याचसोबत 'किलबिल किलबिल पक्षी बोलती....

मला आनंद का झाला?

लेखक धोंडोपंत यांनी रविवार, 16/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, "सुख पाहता जवांपाडे, दु:ख पर्वताएवढे" ही सर्वसाधारण माणसाची परिस्थिती आहे. आपण आनंदच हरवत चाललो आहोत. अनेक लहानसहान आनंदाच्या गोष्टी सभोवताली घडत असतात. पण तो आनंद आपल्याला समजत नाही. तेवढया जाणीवा आपल्याकडे नसतात. त्यासाठी तुम्हाला झालेला आनंद केवळ एका वाक्यात इथे लिहीत जा. इथे सह्या, आपला(.....) ही विशेषणे, मोठे परिच्छेद वगैरे लिहू नयेत. केवळ एका वाक्यात मला आनंद का झाला हे लिहावे.

दारू एके दारू... :)

लेखक विसोबा खेचर यांनी गुरुवार, 13/12/2007 या दिवशी प्रकाशित केले.
दारुचा पाढा! दारू एके दारू, बैठक झाली सुरू दारू दुणे ग्लास, मजा येई खास! दारू त्रिकं वाईन, वाटे कसे फाईन! दारू चोक बियर, टाका पुढचा गियर! दारू पंचे रम, विसरून जाऊ ग़म दारू सक ब्रँडी, आणा चिकन अंडी दारू साते व्हिस्की, कॉकटेल करता रिस्की दारू आठे बेवडा, आणा शेवचिवडा दारू नवं कन्ट्री, मारा परत एन्ट्री दारू दाहे प्याला, स्वर्गसुखी न्हाला! :) एका पुढे ढकलेल्या ईपत्रातून ही कविता मिळाली. कुणा डॉ मधुकर त्रिंबक घारपुरे नावाच्या माणसाने केलेली आहे. आपला, (ग्लेनफिडिच प्रेमी) तात्या.