Skip to main content

मौजमजा

एक खट्याळ त्रिवेणी

लेखक लिखाळ यांनी शुक्रवार, 15/05/2009 17:07 या दिवशी प्रकाशित केले.
त्रिवेणीचा प्रयत्न करत आहे.. कशी वाटली जरूर सांगा :)
साबणसुखाच्या गुदगुल्यांनी खळखळले हास्य अन् रोमांचत्वचेवर फुलला प्रणय, खळबळ टबात. छ्या ! मॅटिनीचे चित्रपट म्हणजे कॉलेजकुमारांना नुसता त्रास !
-- लिखाळ.
Taxonomy upgrade extras

अंत... भाग-२

लेखक दशानन यांनी बुधवार, 13/05/2009 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
मागील भाग १ ******************************** तीने हसून फोन कट केला, ह्याला कुठे घेऊन जाऊ हा विचार करत मी कधी रिंकीचा विचार करु लागलो कळालेच नाही, समोरुन ट्रकचा येणार प्रखर ज्योत माझ्या डोळ्यावर पडल्यावर मी अचानक ब्रेक मारले व गाडी एका बाजूला कलंडत आहे असे वाटले .... व गाडी कश्यावर तरी जोरात आदळली..... स्टेरिंग व्हिलवर डोके जोरात आपटले व गाडी एक चक्कर घेउन बाजूच्या डिव्हाडरला धडकली...एअर बॅग एकदम फुलली व माझ्या तोंडासमोर आली..

बालकवी

लेखक प्रा.डॉ.दिलीप बिरुटे यांनी बुधवार, 13/05/2009 13:11 या दिवशी प्रकाशित केले.

मराठी कविता म्हटले की, बालकवीशिवाय पुढे जाता येणार नाही. बालकवींची कविता वाचून मन वेडावून जाते. त्र्यंबक बापूजी ठोमरे उर्फ बालकवी यांचे बालपण खेड्यात गेलेले. वडिलांची नौकरीनिमित होणार्‍या बदलीमुळे त्यांना वेगवेगळ्या गावात जाता आले. निसर्गाच्या सहवासातच त्यांचे शिक्षण पूर्ण झाले. लहानपणीच पाने फुले गोळा करण्याचा नाद त्यांना निसर्ग विषयक लेखनाकडे असे ओढत गेला. गावाच्या बाहेर जाऊन सूर्यास्त निरखत राहणे, नदीला निरखत बसणे. असे निसर्गात रममाण होण्याची ऊर्मी बालकविंना लहानपणापासून होती. आणि कवितांच्या आद्याक्षरावर कवितांच्या भेंड्या अडल्या की, स्वतःच एखाद्या कवितेची निर्मिती करायचे.

अंत...

लेखक दशानन यांनी सोमवार, 11/05/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
आज दिनांक --/--/२००९ काही दिवसापासून गायब असलेले श्रींमत कपडे व्यापारी अजय ठाकूर ह्याचे शव जयपुर एक्स प्रेस हायवेच्या जवळ कुजलेल्या अवस्थेत मिळाले.

पुरावा काय?

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी शुक्रवार, 08/05/2009 12:17 या दिवशी प्रकाशित केले.
काल संध्याकाळी फिरता फिरता चौपाटीवर गेलो. (मुळामुठेच्या काठाला आजकाल चौपाटी म्हणायची फॅशन आहे पुण्यात) सहज लक्ष गेले आणी एक परिचीत चेहरा दिसला, जवळ गेलो आणी पाहिले तर काय आमच्या अनेक बेरकी मिपा मित्रांपैकी एक मित्र स्वत:शीच बडबड करत बसला होता. "पण तुला सांगितला कोणी होता शहाणपणा ? चांगले खरडा खरडी खेळत होतास, विडंबन करत होतास... हे भलतेच शहाणपण कुठुन सुचले तुला?" मी हळुच त्याच्या खांद्यावर हात ठेवला त्या बरोब्बर तो दचकला. "नाना अरे मी आहे परा" मी म्हणालो. "मिपावाले दिसलेकीच भिती वाटायला लागलीये आता मला." नाना मामला गंभीर आहे हे ओळखुन आम्ही नानाला घेउन बळेबळेच पाणवठ्यावर दाखल झालो.

सहल.. अशीही..!

लेखक शाल्मली यांनी गुरुवार, 07/05/2009 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
उन्हाळ्याची चाहूल लागल्यापासूनच आता यावर्षी ऍमस्टरडॅमच्या ट्युलिप गार्डनला जायचेच जायचे असे ठरवले होते. ह्या दिवशी जायचं का त्या दिवशी.. आत्ता ती शेतं ट्युलिपनी बहरली असतील का? का अजून अवकाश आहे.. असं करता करता इथल्या ट्रॅवल एजन्सीनी २-३ तारखा काढून दिल्या. आमच्या गावापासून ऍमस्टरडॅमला एका दिवसात जाऊन येता येतं. सकाळी पहाटे निघून रात्री उशीरापर्यंत परत. या टूर मध्ये काऊकेनहोफमधलं भलंमोठ्ठ ट्युलिप गार्डन आणि शिवाय ऍमस्टरडॅम शहर असं दोन्ही होतं. पण यातली एकही टूर वीकांताला नव्हती. :( मग रजा टाकता येईल का? जमेल का?

(प्रश्न)

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी बुधवार, 06/05/2009 14:08 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा एक लेख असा की, थकुन जाते विश्‍व एक काथ्याकुट असा की, कुरतडे उंदीर शर्ट एक प्रवास वर्णन असे की, काळ्या पाण्याची नवी शिक्षा एक कौल असा की, जंत कावीळ एन्फ्लुएंझा एक छंद असा की, जणू आटावे रक्त एक कवीता अशी की, अश्रूच वाही फक्त एक संपादकीय असा की, तो विभागच बंद व्हावा एक पाकृ अशी की, 'परा'चा कावळा व्हावा.
Taxonomy upgrade extras

मुखवटा

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 05/05/2009 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मिपाकर मित्राला तुम्ही आता चांगलेच ओळखायला लागला आहात. आज सकाळी बघतो तर आमचा हा सुहृद अतीशय संतापलेल्या अवस्थेत हातात पेपर नाईफ घेउन संगणकाच्या पडद्याकडे बघत होता. आम्ही :- मैत्रेया काय झाले ? असा संतापलेला का आहेस ? मित्र :- @#$#@$ २३$@#%#$@#$^ आम्ही :- अरे हो हो काय झाले काय तुला एकदम ? असा एकदम का लाखोली वाहात आहेस ? मित्र :- हे बघ हे बघ ... साला त्या 'गावाबाहेरच्या संस्थळावर' कुणा दुसर्‍याने माझ्या नावाशी साधर्म्य असलेले नाव घेउन कोणा तिसर्‍यालाच शिव्या दिल्या आहेत $@#$@#$@#$ आम्ही :- =)) =)) काय सांगतो काय ?

गल्लीत नुसता गोंधळ.. दिल्लीत मुजरा नाहीच.

लेखक देवदत्त यांनी शनिवार, 02/05/2009 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
गेले २ आठवडे 'गल्लीत गोंधळ.. दिल्लीत मुजरा' ह्या चित्रपटाच्या जाहिराती पाहत होतो. काल हा सिनेमा प्रदर्शित झाला. आज वेळ जमून आल्याने हा सिनेमा पहावयाचे ठरविले. आज सकाळी फोनवरून सिनेमाचे तिकीट काढून ठेवले. वाटले आज शनिवार आहे, त्यात नवीन हिंदी चित्रपट आले नाहीत. म्हणून गर्दी असायची. (मराठी सिनेमाला गर्दी असते हे आता मान्य करण्यासारखे आहे.) तिकीटखिडकीवर जाता जाता पाहिले ४ पैकी ३ पडद्यांवर मराठी चित्रपट आहेत.