काकडेच्या खुन्याची कथा.
काकडेच्या खुन्याची कथा.
तो एक धंदेवाईक खुनी होता. माफक फी आकारून खून करण्यात तो माहीर होता. खून करायचे तंत्र त्याने अभ्यास करून विकसित केले होते. बळीच्या सामाजिक प्रतिष्ठे प्रमाणे तो फी आकारत असे. राजकारणातील प्रसिद्ध व्यक्ति असेल तर जास्त धोका कारण पोलीस मग गुन्हेगाराला पकडण्याचे काम कसोशीने करतात. मग फी पण तशीच. बिल्डर घेतलेले कर्ज परत करायला काच कूच करू लागला की मग फायनान्सरने तरी काय करावे. कर्ज माफ करायला लागले तर धंदा कसा होणार. छातीवर दगड ठेऊन त्याला बोलावणे पाठवावे लागते.
मिसळपाव
मी रेल्वेत चढलो. पुण्यासारख्या ठिकाणी एकच प्लॅटफॉर्म कसा असेल? पण इथे तर एकच प्लॅटफॉर्म दिसतोय. असो. जनरलच्या डब्यात एक चांगलं असतं, कमी पैशात जाता येतं, बुकिंग वगैरेची झंझट नाही. जवळपासच्या गावात उतरणारेच जनरलच्या डब्यात चढतात. जनरलच्या डब्यात असते तशी भरपूर गर्दी ह्या डब्यातही होती. रेल्वे हडपसरला थांबली. हडपसरला रेल्वे स्टेशन आहे? हे माहित नव्हतं. बरेच लोक चढले, काही उतरले, डबा गच्च भरला होता. एक मुलगा दिसला, माझा भाचा शिवम सारखा, तेवढंच वय असावं १९-२०. त्याने लाल फुल टी-शर्ट आणि जीन्स घातली होती.