सायनचा बसस्टॉप, तो आणि ती........भागः२
कथेचा पहिला भाग येथे वाचता येईल
त्या हव्याहव्याश्या वाटणाऱ्या चिडवाचिडवीतून सुटका करून घेत ती साहेबांकडे वळली तसे........
पुढे........
या चिडवाचिडवीमुळे साहेबांना फार काही सांगावेच लागले नाही. साडेचार होऊन गेलेच होते. त्यांनी हसत परवानगी दिली तसे पटकन प्रसाधन गृहात जाऊन तोंड धुऊन हलकासा पावडरचा हात फिरवून फ्रेश होऊन शमाने पाचला ऑफिस सोडले. चांगला दीड तास आहे अजून..... सहज पोचून जाऊ आपण. अभी तसा शहाणा आहे. नेहमी वेळेवरच येतो. असे बसस्टॉपवर एकट्या मुलीने वाट पाहत उभे राहणे म्हणजे किती दिव्य आहे.........
मिसळपाव

आम्रपालीचा जन्म कोठे झाला, तिचे माता-पिता कोण हे कायम गूढच राहिले. वैशाली नगरीच्या राजप्रासादात ती एका आम्रतरूपाशी ठेवलेली सापडली म्हणून तिचे नाव आम्रपाली!
इ.स.पूर्व ५०० चा तो काळ! त्या कालात ही अनाथ कन्या जसजशी मोठी होऊ लागली तसतशी तिच्या अप्रतिम सौंदर्याची, लालित्य, कौशल्य व मोहकतेची ख्याती चारही दिशांना पसरू लागली.