धरलं तर चावतय ...
दोनदा चिरपरिचीत बेल वाजली आणि मी ओळखलं सुलु आली आहे. हसत हसत दरवाजा उघडला. सुलुच होती. पण नेहेमीसारखी हसरी आणि खळकर मूड्मधे नव्हती. आज जरा फुगा होता.
मी विचारलं "काय ग? अशी काय दिसते आहेस?"
"पाणी दे मग सगळं सांगते." - सुलु
मी फ्रीजमधलं थंड पाणी दिलं.
सुलु नी घटाघटा प्याल आणि पहीलं वाक्य बोलली ते हे की " शुचि कधी तुला अनुभव आहे का गं धरलं तर चावतय अन सोडलं तर पळतय चा?"
मी हसायला लागले "अगं झालं तरी काय? परवापर्यंत तर बरी होतीस."
मला हसताना पाहून सुलुचा पारा अधिकच वर गेला पण तशी ती बॅलन्स्ड आहे , ताबा ठेवून म्हणाली - "शुचि असं बघ तुला एखादी व्यक्ती अतिशय आवडते, म्हणजे खूप म्हणजे फार आवडते.
मिसळपाव