बेटाचा शोध. (विचित्रविश्वात भागो.)
बेटाचा शोध.
(विचित्रविश्वात भागो.)
आधीचा भाग इथे आहे. https://www.misalpav.com/node/52012
आम्ही फाईनडर प्रॉपरला राहायला येऊन जवळपास एक महिना झाला होता. आमचे बऱ्यापैकी बस्तान बसले होते. बायकोची इच्छा होती काही काम करावे, म्हणजे घरखर्चाला हातभार लागेल आणि बरा टाईमपासही होईल. ती तिची मनो कामना पूर्ण झाली. घरा पासून जवळ एक शिशुविहार होता. तिथे तिला काम मिळाले. काम अगदी सोप्पं(?) होतं. दोन ते पाच वर्षांच्या मुलांना त्यांच्या आया तिथे सोडून जायच्या. त्या पण नोकरी करणाऱ्याच होत्या. काय करणार. त्याना पण त्यात मजा वाटायची अशातला भाग नव्हता.
मिसळपाव