जंटलमन्स गेम - २ - विझी, लाला आणि सीके
भारतात आणि भारतीय उपखंडात क्रिकेटचा खेळ आणला तो ईस्ट इंडीया कंपनीच्या गोर्या इंग्रज साहेबांनी!
भारतीय उपखंडात खेळल्या गेलेल्या क्रिकेटचा पहिला संदर्भ सापडतो तो ईस्ट इंडीया कंपनीच्याच एका रिपोर्टमध्ये. १७३७ मधल्या या रिपोर्टात बडोद्याजवळ कॅम्बे इथे १७२१ पासून इंग्रज अधिकारी क्रिकेट खेळत असल्याचा स्पष्टं उल्लेख आढळतो. पुढे १७८२ मध्ये कलकत्ता फुटबॉल आणि क्रिकेट क्लबची स्थापना झाली. काही वर्षांनीच मद्रासलाही क्रिकेट खेळलं गेल्याचा उल्लेख आढळतो.
मिसळपाव