Skip to main content

कला

खिद्रापूर चा कोपेश्वर मंदिर ( माहिति सोबत )

लेखक शाहिर यांनी सोमवार, 27/06/2011 17:01 या दिवशी प्रकाशित केले.
खिद्रापूर : कृष्णा नदी तीरावर वसलेले सुंदर पण भग्न मंदीर .. या मे महिन्या मध्ये भेटीचा योग आला ..११ व्या शतकाच्या सुरुवातीला हे मंदीर शिलाहार राजा ( गन्दारादित्या , विजयादित्य आणि भोज २ रा ) कडून बांधण्यात आले .. पौराणिक कथा : देवी सती हि भगवान शिवाची पत्नी होती ..तिचे वडील राजा दक्ष यास भगवान शिव जावई म्हणून पसंत नव्हते .. दक्ष राजाने एकदा मोठा यज्ञ केला आणि शिव -सती ला बोलावले नाही ..सती ने याबद्दल राजा ला जाब विचारला असता त्याने शिवा चा अपमान केला ..ते सहन ना होऊन सती ने यज्ञा मध्ये उडी घेतली .. हे कळताच भगवान शिव क्रोधीत झाले ..आणि दक्ष राजा चा वध केला .. आणि कृष्णा तीरावर येऊन बसले ..तिथे भगवान विष्णू नी येऊन त्यांचा राग शांत केला .. म्हणून या मंदिरा ला "कोप + ईश्वर " कोपेश्वर म्हणतात .. विशेष म्हणजे या मंदिरा मध्ये नंदी नाही .. स्थापत्य : पूर्ण मंदिर ९६ हत्ती च्या पाठीवर कोरले आहे ..१०८ खांब आहेत तसेच कळसावर शिवलीलामृत कोरले आहे .. संपूर्ण मंदिर भर महाभारत आणि रामायणा मधले प्रसंग कोरले आहेत ..तसेच स्वर्ग मंडप ,यज्ञ मंडप (होमा चा धूर जाण्या साठी छत मध्ये उघडा गोल ठेवला आहे ) ..आणि गर्भ गृह आहे .. औरंगजेबा चा सरदार खैदर खान याने या मंदिरा ची तोड फोड केल्याचा ऐकण्यात आले .. आज हि हे मंदिर आपल्या प्राचीन वैभवाच्या खुणा जपत उभे आहे

तुका जातो वैकुंठाला

लेखक यकु यांनी शनिवार, 25/06/2011 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
न कळत्या वयात प्रभातचा संत तुकाराम पाहिला होता - खूप रडलोही होतो. अगदी काल-पर्वा युट्य़ूबवर संत तुकाराम चित्रपटातील दोन क्लिप्स पुन्हा एकदा पाहाण्यात आल्या. त्या उतरवूनदेखील घेतल्या. या चित्रपटातील तुकोबाची भूमिका विष्णुपंत पागनिसांची (पु.लं. च्या हंड्रेड पर्सेंट पेस्तनकाका मधली पेस्तनकांकाची "अरे साला काय ऎक्टिंग, तुला सांगतो साला ओरिजिनल तुकारामबी असा नसेल, ते विस्नुपंत आता वैकुंटमदी असेल, सिटिंग नेक्स्ट टू दी गॉड..." ही दाद आठवते का?). विष्णुपंत पागनीसांनी केलेल्या तुकारामाच्या या भूमिकेने त्या काळात अवघ्या महाराष्ट्राला वेड लावले होते.

रेडी ? नो रेडी ssSSsss ...

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 21/06/2011 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
वाँटेड आणि दबंगच्या मसाला धमाक्यानंतर सलमानकडून रेडी मध्ये देखील थोड्याफार तशाच धुमाकुळाची अपेक्षा होती.

फोटोग्राफी

लेखक nishant यांनी रविवार, 19/06/2011 03:37 या दिवशी प्रकाशित केले.
मी रात्री काढलेले काही फोटो १. Kosice मधील एक संध्याकाळ jhj २. St. Elizabeth Cathedral कडे जाणारा रस्ता jkhk ३. St.

स्टॅनली का डब्बा

लेखक मस्त कलंदर यांनी बुधवार, 15/06/2011 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस पाहायचा पाहायचा म्हणून हा पिक्चर पाहायचा राहूनच गेला होता. अलग वेळ देणं होत नसेल तर मी सिनेमे दहा-पंधरा मिनिटांच्या तुकड्यांत बघते. माझ्या या तंत्राला चांगले सिनेमे मात्र दाद देत नाहीत. ते एकाच बैठकीत कधी पाहायला भाग पाडतात हे कळतही नाही. बर्‍याच दिवसांनी असा पिक्चर पाहण्याचा योग आला. डिस्क्लेमर: लेखावरून बरीचशी कथा कळतेय. ज्यांना असा रसभंग व्हायला नकोय त्यांनी इथंच थांबावं.

विक्रम आणि वेताळः अभिव्यक्तिस्वातंत्र्य आणि समभाव

लेखक नगरीनिरंजन यांनी सोमवार, 13/06/2011 17:49 या दिवशी प्रकाशित केले.
विक्रमाने आपला हट्ट सोडला नाही. पुन्हा चालत ज्या झाडावर ते प्रेत लटकत होते तिथे तो गेला आणि झाडावरून प्रेत काढून ते खांद्यावर घेत तो चालू लागला. दहा-बारा पावले चालला नसेल तोच प्रेतात बसलेला वेताळ खदाखदा हसू लागला. त्याकडे पूर्ण दुर्लक्ष करून निग्रहाने विक्रम चालत राहिला. कसंबसं आपलं हसू आवरत वेताळ विक्रमाला म्हणाला, "विक्रमा, मला तुझं अत्यंतिक कौतुक वाटतं. ज्याचा आपल्याला यत्किंचितही फायदा नाही अशा गोष्टीत उठाठेव करण्याचा तुझा हा दुर्दम्य उत्साह खरोखरच कौतुकास पात्र आहे. आणि याचे कौतुक म्हणून तुला त्याबद्दल काहीतरी पारितोषिकही दिलेच पाहिजे.