Skip to main content

चित्रपट

मल्याळम सिनेमाशी माझी ओळख

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 02/05/2021 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे.

मुंबई सागा: काल, कथा आणि कलेचे मातृभगिनी एकत्रीकरण

लेखक सुरिया यांनी बुधवार, 28/04/2021 या दिवशी प्रकाशित केले.
डॉन लोकांना मुंबईचे प्रेम अफाट. कींबहुना डॉन फक्त मुंबईवरच राज करतात, ऐकलात का कधी चैन्नैचा डॉनाण्णा कींवा कोलकात्याच्या डोनबाबू? भाई किंवा डॉन शोभतो मुंबईतच. मग अशा ह्या मुंबैतल्या बॉलीवुडाला मुंबैच्या गँगस्टरांचे प्रेम जरा जास्तच. कसा का असेना, काही का करेना आणि कसा का मरेना, पिक्चरमध्ये त्याला हिरो बनवणे म्हणजे गल्ल्याची फुल्ल वसूली.

लाल इश्क

लेखक फारएन्ड यांनी सोमवार, 15/03/2021 या दिवशी प्रकाशित केले.
"तू त्याच्या प्रवासातली चुकलेली पाउलवाट आहेस. आणि मी त्याचं फायनल डेस्टिनेशन आहे. ...आणि तरीही तुम्ही माझ्याकडे आलात. पाउलवाटेची भीती वाटली, की प्रवाशावरचा विश्वास उडाला?" या संवादावर जाऊ नका. ही वैचारिक प्रेमकथा नाही. ही मर्डर मिस्टरी आहे पण साहित्यिक वाली. म्हणजे लोक नॉर्मल बोलत असताना मधेच कधी एकदम साहित्यिक वाक्ये पॉपकॉर्नसारखी फट्कन फुटतील सांगता येत नाही. त्यामुळे एखादे पुस्तक वाचत असताना मधेच व्हॉट्सअ‍ॅप बघितल्यासारखे वाटते. दुसरे म्हणजे यातील सस्पेन्स फक्त खून कोणी केला याबद्दल नाही. खून कोणी केला याबद्दल सस्पेन्स कोणीही दाखवतात.

Ford vs Ferrari हा सिनेमा जरूर बघा ...

लेखक मुक्त विहारि यांनी बुधवार, 17/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
मी रोज रात्री, एक तरी सिनेमा बघतोच...पण कधी कधी चांगला चित्रपट मिळाला नाही तर, Avengers जिंदाबाद... मी Captain Marvel बघत होतो, तितक्यात मुलगा म्हणाला, की हा सिनेमा किती वेळा बघणार? कालच मी, Ford vs Ferrari बघीतला.जबरा पिक्चर आहे.मुलांना, Tenet, Inception,.वगैरे सिनेमे आवडतात.आम्ही कुणीच, खानावळीत जेवत नाही. मुलांची आवड माहिती असल्याने, लगेच सिनेमा बघीतला.संवाद हिंदीतून असल्याने, सिनेमा समजायला पण सोपा गेला. Fordच्या गाड्यांची मागणी घटत असल्याने,मागणी वाढवायची असेल तर, फोर्डने गाड्यांच्या शर्यतीत उतरावे, असा सल्ला, ली आयकोका देतो.

चित्रपट: The Truman Show

लेखक लई भारी यांनी रविवार, 07/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी प्राईम वर ब्राउज करत असताना हा चित्रपट दिसला. नेहमीप्रमाणे जरा रेटिंग वर नजर टाकून बघायला घेतला. कथेतले रहस्य पहिल्याच फ्रेम मध्ये प्रेक्षकांना कळून जाते आणि उरलेला चित्रपट, हे रहस्य मुख्य पात्राला कळते का यासंदर्भात आहे.  जिम कॅरी ने साकारलेला ट्रुमन म्हणजे एका टीव्ही शो मधले पात्र आहे. पण धक्कादायक गोष्ट म्हणजे त्याला माहीतच नाही आहे की आपल्या भोवती जे जग आहे ते सर्व scripted आहे. त्याच्या भोवती एक बेट तयार केलं आहे जे खर तर एक मोठ्ठा dome आहे.

काही अविस्मरणीय डायलाॅग ....

लेखक मुक्त विहारि यांनी शनिवार, 06/02/2021 या दिवशी प्रकाशित केले.
हिंदी आणि मराठी, सिनेमे बघत असतांना, काही डायलाॅग, आयुष्यभर साथ देतात....तसे, हे डायलाॅग, असतात एक ते दोन वाक्यांचेच, पण, जबरदस्त परिणाम करतात .... लोहा, लोहे को काटता है. सिक्के और आदमी में, यहीं तो फर्क है. सोन्या, तुम जानती हो की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है, मैं जानता हूं के ये रिव्हाॅल्व्हर खाली है, लेकिन, पुलिस नहीं जानती हैं की, ये रिव्हाॅल्व्हर खाली है .. डाॅन को पकडने की कोशीश तो, ग्यारह मुलकों की पुलीस कर रहीं है. डाॅन को पकडना मुश्किल ही नहीं तो, नामुनकीन काम हैं कुत्ते, कमीने, मैं तेरा

मराठी रेडिओ

लेखक निमिष ध. यांनी सोमवार, 18/01/2021 या दिवशी प्रकाशित केले.
माझी बायडी दररोज मराठी रेडिओ ऐकत असते. तिने नुकतेच एक पेज बनवले आहे ज्यावर महाराष्ट्रातील सर्व रेडिओ स्टेशन्सच्या लिंक्स आहेत. याचा उपयोग करून अगदी आरामात कुठेही रेडिओ ऐकता येतो. बाकी माहिती खाली तिच्याच शब्दांत वाचा: रूपा धारप देशात असताना घरी कायम रेडिओ चालू असायचा. अगदी लहान असल्यापासून तो आयुष्याचा अविभाज्य भागच झाला होता. त्यातही मराठी गाण्यांचे कार्यक्रम अगदी लक्षात ठेवून ऐकले जायचे. पुणे एफ.एम. वर संध्याकाळी ५.३० वाजता लागणारा सांजधारा हा विशेष आवडता. अमेरिकेत आल्यावर बर्‍याच गोष्टी मिस करायला लागले त्यात देशातला आणि त्याहीपेक्षा मराठी रेडिओ ही एक गोष्ट होती.

मिया आणि व्हाईट लायन --प्राण्यांच्या प्रेमात भारावलेली मुलगी

लेखक Bhakti यांनी रविवार, 20/12/2020 या दिवशी प्रकाशित केले.
मिया आणि व्हाईट लायन(२०१८) तोत्त्तोसारखीच मिया ही एक चिमुकली आहे.आईवडिलांबरोबर दक्षिण आफ्रीकाला ते वास्तव्यास येतात.त्यांच्या जंगली प्राण्यांचा एक फार्म असतो .तेव्हा १० वर्षांच्या मियाचा आणि छोट्याशा चार्ली या नष्ट होत चाललेल्या पांढऱ्या सिंहाची मैत्री होती.ती इतकी घट्ट असते की मिया त्याच्याशिवाय चार्ली मियाशिवाय वेगळे राहूच शकत नाही. मियाला जेव्हा शाळेत दूर टाकतात,तेव्हा ती त्याला इतकी मिस करते की थेथून पळून पुन्हा फार्मवर येते.चार्लीतर खूप दिवसांनी तिच्या हातूनच धुध पितो...इतक खास नात असत त्यांच.चार्लीमुळे मिअयाच्या वडिलांचा प्राण्यांची सफारी व्यवसाय तेजीत असतो.पण चार्ली या बंदिस्त वातावरणा

सुब्रमण्यपुरम् - एक थरारपट!

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 25/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या साऊथचे सिनेमे या WhatsApp समुहात लिहिलेला एक लेख मिपाकरांसाठी ---------------------------------------------------------- सिनेमाचं नाव आहे सुब्रमण्यपुरम् (Subramaniapuram) सुब्रमण्यपुरम् हा २००८ चा तमिळ सिनेमा आहे. लेखक , दिग्दर्शक , निर्माता - शशिकुमार कलाकार - जाई संपत , स्वाति , शशिकुमार संगीत - जेम्स वसंतन् हा एक अॅक्शन कम थरारपट आहे.तमिळनाडूच्या मदुराई शहरातल्या सुब्रमण्यपुरम् भागात सिनेमाची कथा घडते. सिनेमा सुरु झाल्यावर पहिल्याच दृश्यात आपल्याला दिसतं की तुरुंगातून एक गुन्हेगार शिक्षेचा काळ संपल्याने बाहेर पडतो आहे.तो बाहेर पडताच तुरुंगाच्या आवारातच एक व्यक्

मी पाहिलेला एक चांगला मराठी चित्रपट

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी बुधवार, 11/11/2020 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मित्रानो. डिस्क्लेमरः मी कन्नड भाषिक असून मराठी लिहिणे शिकण्याचा प्रयत्न करीत आहे. चूक झाला तर क्रुपया करेक्ट करा. मी जेव्हा ठाण्यात होता (म्हण्जे २००६ मध्ये) मी मराठी भाषेचा एक ऐतिहासिक चित्रपट पाहिलो. त्याचा नाव होता 'संत तुकाराम'. १९३६ मध्ये निर्माण झालेला चित्रपट. हा चित्रपटात मला आवडलेला गोष्टि खाली लिस्ट करतो. १. हे ऐतिहासिक चित्रपट असूनही, ह्या चित्रपटात, अतिनैज नटन आहे. २. हा चित्रपट मला महाराष्ट्रीय संस्कृतिचा झांकी दिला. दिस इस आल अय आम एबल टु रैट इन मराठी नव. धन्यवाद