छायागीत १ - तु मेरे सामने है, तेरी जुल्फें है खुली, तेरा आंचल है ढला…
रफी आणि मदनमोहनने हिन्दी चित्रपट संगीतात जी क्लासिक गाणी दिली त्यापैकी एक महत्वाचे गाणे म्हणजे “तु मेरे सामने है”. गुरुदत्त म्हटलं की “प्यासा”, “चौदहवी का चांद”, “साहब बीवी और गुलाम” किंवा “कागज के फूल” आठवणार्यांना “सुहागन” आठवणार नाही कदाचित. मात्र अस्सल संगीतप्रेमीच्या नजरेतुन (कानातुन?) हे गाणे सुटणे अशक्य. मदनमोहन मुळातच गायकाची प्रकृती, गाण्याची पार्श्वभुमी या सार्या गोष्टी पाहुन गाणे देणारा संगीतकार.
मिसळपाव