चित्रपट परिचय : दी झोया फॅक्टर
माझ्या मते लगान चित्रपटापासून बॉलीवूडमध्ये एक नवे पर्व निर्माण झाले. या पुर्वी प्रेमकथा, प्रेम त्रिकोण , गुन्हेगारी, लॉस्ट अॅन्ड फाउन्ड ई मोजक्याच विषयांत अडकलेला व्यावसायिक चित्रपट अनेक विषयांना स्पर्श करु लागला. लगान प्रमाणेच काही चित्रपटांचा विषय एखादा खेळ होता.
दी झोया फॅक्टर हा पण क्रिकेटवर बेतलेला चित्रपट आहे. क्रिकेट या खेळात खूपशी अनिश्चितता आहे. त्यामुळे गुणवत्तेबरोबरच "नशिबाची साथ" मिळणेही गरजेचे असे क्रिकेट रसिकांना व खेळाडुंना वाटू शकणे खूप स्वाभाविक आहे. तर या आत्मविश्वास विरुद्ध "नशिबाची साथ" या संघर्षावर हा चित्रपट बेतलेला आहे.
मिसळपाव