Skip to main content

औषधी पाककृती

(why is there nothing rather than something ???????)

लेखक मुक्त विहारि यांनी शुक्रवार, 30/06/2017 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
डिस्क्लेमर : सध्या आम्हाला फावला वेळ भरपूर असल्याने आणि ...... आणि....... आणि......... आणि........हा लेख टाकला आहे.आमच्या लेखात कुठलेही वैचारिक धन नसल्याने, विचारवंतांनी ह्या धाग्याकडे दुर्लक्ष करावे, टवाळांनी, टवाळांसाठी काढलेला हा टवाळ धागा आहे.

(ही पहा पाडली गजल)

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 16/05/2017 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आता लक्षात ठेउन वेगळ्या धाग्यावर कविता पाडणे आले पेरणा सांगायलाच पाहिजे का? ही पहा पाडली गजल, ही पहा पाडली गजल, मी ही वेड्यासारखी दाद त्यांनी द्यावी ज्यांना, मी दाद देतो सारखी, उंच डोंगर, श्रावणसरी, यावरी काही लिहू, शब्द येती ना समोरी, डिक्षनरीही बारकी, कोप-यावरती जिन्याच्या, पिंक कोणी टाकली, रंगते टाईल इथली, पान ठेल्यासारखी, हो!

तहान लाडू

लेखक मितान यांनी शुक्रवार, 14/04/2017 18:51 या दिवशी प्रकाशित केले.
तर अस्सं झालं.. पोरासोरांना लागल्या सुट्ट्या. पण त्यायच्या मायबापांना सुट्या नाहीत. मग आली सगळी गावाकडे आज्जी आज्जी करत ! मला म्हातारीला पोरं भवताली असली की काय काय करायचा उल्हास येतो. पोरांना पण तेवढाच बदल. इथं आमच्या खेड्यात ऊन उदंड! पांढर्‍या मातीचा फुफाटाच फुफाटा ! पण गंगेचं पाणी पण वाहातं असतं एवढं मात्र सुख. सकाळी सडा झाला की पोरांना उठवायचं. आणि तोंड वाजवत एकेकाचं आवरून घ्यायचं. लिंबाखालची आंथरुणं गोळा करा रे,दातं घासा रे, दूध प्या रे आणि मग गंगेला आंघोळीला हकलायला जावं तर पोरं माझ्यापुढं १०० पावलं उड्या मारत ! दशमी चटणी ची न्याहारी झाली जातात देवळात हुंदडायला.