Skip to main content

विरंगुळा

खिडकीतुन पाहताना...

लेखक मदनबाण यांनी सोमवार, 16/04/2012 18:05 या दिवशी प्रकाशित केले.
काय हाय मंडळी मला कधी कधी लयं म्हणजी लयं कंटाळा येतुया... मग करायचं तरी काय ? मस्त पैकी खिडकी समोर उभ राह्याचं, अन् बाहेरच्या जगात डोकवुनशान पाहायाच... कसं ? तर ते असं... १) खार धावताना टिपली...काय बरं खाण्याचं या निस्पर्ण वॄक्षावर मिळत असेल तिला ? २)हल्ली म्हणे पिंडाला शिवण्यासाठी पण कावळा दिसत नाही !

सोफिया

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 16/04/2012 16:27 या दिवशी प्रकाशित केले.
सोफिया ! मोझंबीकमधील मापूटो नावाच्या गावात एका इस्पितळासमोर, पंधरा एक वर्षापूर्वी एक छोटी मुलगी एका गंजलेल्या चाकाच्या खुर्चीत हताशपणे बसलेली होती. तिला दोन्ही पाय नव्हते आणि तिचे वय असेल अंदाजे १० एक. माझे लक्ष तिच्याकडे गेले आणि का कोणास ठावूक मला तिच्याशी बोलावेसे वाटले म्हणून मी बोलले. तिच्या अस्फूटशा आवाजात मला तिने तिचे नाव सांगितले तो प्रसंग मला अजून लख्खपणे आठवतोय. ती म्हणाली “सोफिया” आज अनेक वर्षानंतर आम्ही चांगल्या आणि अत्यंत जवळच्या मैत्रिणी आहोत.

!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!!

लेखक बटाटा चिवडा यांनी रविवार, 15/04/2012 08:00 या दिवशी प्रकाशित केले.
!!!! ....हे अस्स्सचं का होतं....!!!! हे नेहमी अस्स्सचं का होतं जे ठरवलंय, नेमकं त्याच्या उलटं घडतं.. भूक लागते जोरदार, तेव्हा नसतो जेवायला वेळ परीक्षा असली की चालू होतो लोड -शेडिंग चा खेळ.. Important फोन करायचा असेल तर मिळत नाही Range 1000/- चे सुट्टे करायला गेलो तर कोणी देत नाही Change.... दोन मराठी माणसे भेटली तरी बोलतात मात्र 'हिंदी' Email Account काढायची Process का असते खूपच 'Lengthy'.... 5 रु .

विव्हळून ..

लेखक तिमा यांनी शनिवार, 14/04/2012 12:59 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा: गविंना सलाम करुन (कारण विडंबन पाडणे हे नेहमीच सोपे असते) उघड्या कानांतून एक विव्हळणारा सूर घुसला कोणा नवगायकाचा हायब्रीड, आंग्लाळलेला नंबर असणार डोक्यात तीव्र झिणझिण्या, आन मनांत गांवरान शिव्या आल्या संस्कारांचे चाप काढून, त्या मनसोक्त खुल्या आवाजात दिल्या. पुन्हा पुन्हा कानात घुसणारे ते अभिजात संगीताचे विडंबन कोण सालं सुरेल केकाटताय बाप मेल्यावाणी भो .... नवीन पिढीची चव नासवून टाकतात भ्रष्ट नकलेच्या सडलेल्या मेंदूंचे ........ नांव विचारलं, तर तो आमचा आवडता 'शंकर' होता मग मी, गपगुमान कानांत बोळे घालून चालू लागलो!

अशात काय पाह्यलंत???

लेखक यकु यांनी शुक्रवार, 13/04/2012 15:32 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला नेहमी येता जाता कसलीतरी दृश्‍ये दिसतात आणि त्यातून काहीतरी मनात उमटतं. असल्या दृश्‍श्यांना, असल्या क्षणात घडून गेलेल्या किश्श्यांना नेहमीच काही विशेष अर्थ असतोच असे नाही. बस्स काहीतरी चटकन होऊन जातं आणि आपण तेवढ्‍यापुरतं आश्चर्य वाटून गप्प बसतो. त्याबद्दल कुठे बोलावं एवढं महत्त्व कदाचित त्या दृश्‍याला किंवा सहज घडून गेलेल्या किश्शाला कदाचित असत नाही. पण असली दृश्‍ये सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येत असतील हे नक्की. ती इथे कृपया सगळ्यांनी द्यावीत. ही दृश्‍ये बिनमहत्त्वाची असली तरी ती खरी असावीत, काल्पनिक नकोत.

नांदा सौख्य भरे (संवाद)

लेखक जागु यांनी गुरुवार, 12/04/2012 20:58 या दिवशी प्रकाशित केले.
१) अनंत (लाजून चुर होऊन तोंड ओंजळीने झाकल बाई) २) शिरिष (काबाडकष्ट करुन केस पिकले आता)

वस्स्स्सकन् !!

लेखक यकु यांनी गुरुवार, 12/04/2012 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
लेखाखालच्या प्रतिसादातून वस्स्सकन् कुणीतरी अंगावर आले.. कुणीतरी चार डोक्यांनी विचार करणारा हेडटाईट असणार.. डोळ्यात चरचरीत अंगार आणि मनात झगझगीत शब्द आले.. वावराच्या नियमांनी चाप लावलेत म्हणून ते किबोर्डावरच खळखळ झाले आणि पुसले गेले. पुन्हा पुन्हा डोक्यात जाणारा वसवसता प्रतिसाद कोण साला घुसतोय नसत्या जंगलात.. उडतोय खालीपाली कुठच्या कुठे ** चा.. साध्‍या लेख, कवितावर अगदी शष्‍प पदार्थावर हॅलोजनच्या प्रकाशासारखी अक्कल टाकून शायनिंग मारतात... व्यंकट बुद्धीची पैदास ** ची... प्रोफाइल उघडून नीट पाहिलं तर तो स्वत:च मालकांपैकी एक होता.. मग मी गपगुमान खाली मान घालून लॉग आऊट केलं आणि चालू पडलो..

काळ कोठडी (भाग ३)

लेखक हर्षद आनंदी यांनी गुरुवार, 12/04/2012 15:38 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ त्याच्या अंगाची आग आग होत होती.. पण तो हतबल होता.... केवळ वाट बघणेच त्याच्या हातात होते.. आणि तो वाट बघत राहिला.. .. ... उषा गेली त्याला खूप वेळ झाला, वाट बघता बघता राहुलला झोप कधी लागली समजलेच नाही. अचानक जाग आली त्याला, डोके जसे बधीर झाले होते.. काळामिट्ट अंधार.. तो जोरात ओरडला, पण आवाज घशातच अडकला. चाचपडत, अदमास घेत त्याने पाण्याचे भांडे शोधायचा प्रयत्न केला..ठ्न्न.. जोरात भांडे खाली पडले, रिकाम्या खोलीत आवाज जास्तच घुमला.