आमची पहिली गाडी
आमची पहिली गाडी
झालं असं की घराचे सगळे पैसे देऊन झाले आणि हप्ते पण सुरू झाले. काही दिवसांनी हातात थोडे पैसे खुळखुळायला लागले. तोपर्यंत घरात दोनाचे चार मेंबर्स झाले होते आणि जबाबदार पालकांप्रमाणे स्कूटरवरून दोन मुलांना घेऊन जाणे किती धोक्याचे आहे वगैरे विचार आपोआप डोक्यात यायला लागले. मग मी आणि माझा नवरा याच्या तार्किक शेवटाकडे पोचलो, ते म्हणजे आपल्याला एक चारचाकी गाडी घ्यायला पाहिजे. संन्याशाच्या लग्नाला शेंडीपासून तयारी. नवरा लगेच ड्रायव्हिंग शिकायला ड्रायव्हिंग स्कूलमधे जायला लागला. ड्रायव्हिंगच्या बाबतीत माझा आधीपासूनच आनंद! एक बारीकशी सनी होती तीही तोपर्यंत गंजून जाऊन विकून झाली होती.
मिसळपाव
