Skip to main content

विचार

बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 29/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल : ३१ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, नवीन आर्थिक वर्षाच्या सर्वांना मन:पूर्वक शुभेच्छा! या खेपेला युयुत्सुनेट चुकलं की बरोबर ठरलं हे ठरवणं मला अवघड जातंय. कारण मला ज्या पातळीपासून बाजार उलट फिरेल असं वाटत होते, ती पातळी झुगारून २३८६९ ला जाऊन उलट फिरलं (हा उलट फिरण्याचा भाग खरा ठरला कारण युयुत्सुनेटला तेव्हढेच म्ह० पुढची दिशा ओळखायला शिकवले आहे). पण रेंजच्या बाबतीत हुलकावणी दिली. आठवडा अखेरीस बंद होताना आठवड्याच्या ओपन जवळच बाजार बंद झाला आहे. माझ्यामते ही त्रुटी "क्षम्य" आहे कारण पातळीचा अंदाज माझा होता, युयुत्सुनेटचा नव्हता.

दोष व्हीआयपी सुरक्षा यंत्रणेचा: स्वर्गीय इंदिरा गांधी आणि छत्रपति संभाजी राजे

लेखक विवेकपटाईत यांनी मंगळवार, 25/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
देशात छावा चित्रपट गाजला. माझ्या एका मित्राने फोन वर मला विचारले, विवेक तू तर देशातील सर्वोच्च सुरक्षा अधिकार्‍यांच्या अखत्यारीत आणि एसपीजीत काम केले आहे. या विषयावर तुझे विचार काय आहे. मराठी इतिहासबाबत थोडे बहुत ही लिहले आणि ते जनतेला पटले नाही तर जन भावनांचा भडका उडू शकतो. बिना कुणाच्या भावना दुखविता यावर भाष्य करणे म्हणजे तारेवरची कसरत. तरी ही सुरक्षा यंत्रणेच्या दृष्टीकोणातून हा लेख लिहण्याचा प्रयत्न केला आहे. महाभारताच्या युद्धाच्या सुरवात होण्यापूर्वी दुर्योधन सर्व सेनापतींना उद्देश्यून म्हणतो, पितामह भीष्मच्या नेतृत्वात आपले सैन्य अजेय आहे. सर्वांनी पितामह भीष्माची रक्षा करावी.

बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 22/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
बाजाराचा कल: २४ मार्चचा आठवडा ==================== मंडळी, युयुत्सुनेटच्या भाकीतानुसार मार्केटने दमदार रिकव्हरी केली आहे. आता पुढे काय? मार्केट सध्या प्रतिरोध क्षेत्राजवळ असल्याने तेथपर्यंत (२३५५०) जायचा प्रयत्न करेल असा १ अंदाज आहे. पण दुसरा अंदाज आहे युयुत्सुनेटचा - आहे त्या पातळीपासून थोडे मागे फिरेल (महिना अखेर असल्याने) आणि परत २३५५० पर्यंत वर जाईल.  आकृती १ - निफ्टीचा साप्ताहिक आलेख. या आलेखात दोन तांबड्या रेघा हाय आणि लो ची सरासरी दाखवतात.

"माझी मदतनीस"च्या निमित्ताने

लेखक आजी यांनी शनिवार, 22/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मी मिपावर लिहिलेल्या "माझी मदतनीस" या लेखावर खूपच मस्त चर्चा रंगली. या लेखावर जवळपास पंचेचाळीस प्रतिसाद आले आणि अडीच हजार वाचने झाली. मी सहज सुचलं म्हणून , मनात हा विषय काही दिवस घोळत होता म्हणून, हा लेख लिहिला. त्यावर इतकी चर्चा झालेली पाहून मला आनंद झाला. या प्रतिसादांमध्ये काही डाव्या तर काही उजव्या विचारसरणीचे, तर काही मध्यममार्गी,तर काही तटस्थ मतप्रवाह होते. मी हिंदू आहे. हिंदू म्हणून जन्माला आले. हिंदू म्हणून लहानाची मोठी झाले. मला अर्थातच माझ्या धर्माचा अभिमान आहे. माझा धर्म मी बदलणार नाही.

प्रतिपश्चंद्र

लेखक विअर्ड विक्स यांनी शुक्रवार, 14/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी ! ऐतिहासिक मराठी पार्श्वभूमीवर हिंदी जाल दुनियेतील मालिका बघण्याचा मनसुबा असेल तर पुढील लेख वाचून आपणास एक पर्याय मिळू शकतो. " प्रतिपश्चंद्र " हि डॉ प्रकाश कोयंडे लिखित एक ऐतिहासिक रहस्य कादंबरी आहे. या कादंबरीवर आधारित " द सिक्रेट्स ऑफ शिलेदार " हि मालिका तप्ततारा जालदुनियेवर उपलब्ध आहे. "NATIONAL TREASURE MOVIE " पठडीतील हि मालिका आहे. हि मालिका आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केली आहे. मध्यवर्ती भूमिकेत राजीव खंडेलवाल आणि सई ताम्हणकर आहेत. जोडीला दिलीप प्रभावळकर ,आशिष विद्यार्थी आणि कानन अरुणाचलम आहेत. रहस्य कथा असल्यामुळे कथाविस्तार टाळतो.

माझी मदतनीस..

लेखक आजी यांनी सोमवार, 10/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मी माझ्या घरी काम करणाऱ्या बाईला कधीच, कामवाली, मोलकरीण, धुणीभांडीवाली, झाडूपोछावाली असं म्हणत नाही. मी त्यांच्या तोंडावर त्यांना त्यांच्या नावाने हाक मारते आणि त्यांच्या मागे त्यांचा उल्लेख माझी मदतनीस, माझी साहाय्यक, माझी असिस्टंट असा करते. माझा मुलगा, सून, नातू हेही त्यांना ताई किंवा बाई, काकू, मावशी अशी त्यांच्या वयाकडे बघून हाक मारतात. त्यांना अहो जाहो करतात. माझ्या एक सांसारिक बाई म्हणून असलेल्या आयुष्यात अनेक मदतनीस आल्या. माझ्या घरी त्या अनेक वर्षे टिकायच्या. माझी बदली होईपर्यंत त्या माझं काम सोडायच्या नाहीत. घरी मी, माझे मिस्टर, मुलगा, सासू सासरे होते.

राजकुमार, बुटका आणि राक्षस: नवी कहाणी

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 05/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुनी भारतीय नीति कथा - राजकुमाराने बुटक्याच्या मदतीने राक्षसाला ठार मारले. राजकुमारला राजकुमारी मिळाली. युद्धात बुटक्याचे हात पाय तुटले. बुटक्याच्या नशीबी भीक मागण्याची पाळी आली. आजच्या कथेत फरक एवढाच राजकुमार स्वत: युद्धात उतरला नाही. त्याने बुटक्याला युद्धासाठी अस्त्र-शस्त्र दिले. राक्षस तर मेला नाही पण बुटका युद्धात जबर जखमी झाला. एवढेच नव्हे तर राक्षसाने बुटक्याचे अर्धे राज्य ही गिळंकृत केले. आता राजकुमाराला अस्त्र-शस्त्रांच्या मोबदल्यात बुटक्याचे उरलेले अर्धे राज्य पाहिजे.

बाजाराचा कल: ३ मार्चचा आठवडा

लेखक युयुत्सु यांनी शनिवार, 01/03/2025 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, ज्यांना २२१०० या पातळीचे डोहाळे लागले होते, त्यांच्या नवसाला मार्केट अखेर पावले! मला पण युयुत्सुनेट एकदा तरी चुकले याचे ’समाधान’ आहे (भाकीते १००% बरोबर ठरायला लागली तर काहीतरी गडबड आहे हे नक्की). बाय-द-वे - युयुत्सुनेटची ट्रेनिंग-डेटा वरची अचूकता आता जबरदस्त आहे आणि १० भाकीतांना फक्त ~३ मिनिटे इतका वेळ लागतो. त्यामुळे इथून पुढे युयुत्सुनेट चांगली कामगिरी करेल अशी आशा करूया... पुढे काय? क्लेमास्पेस डायाग्रॅम्वर निफ्टी वर जायची शक्यता १००% दाखवत आहे.

हे जीवन सुंदर आहे...मराठी भाषा गौरव दिन.

लेखक कर्नलतपस्वी यांनी गुरुवार, 27/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
"फुलांच्या त्या धुंद रंगोत्सवात चांदणीएवढे दिसणारे निळे फूल, शालीनपणे उमलले. त्याच्या तरल नाजूक वासाने वाऱ्याचे मन मोहरले.काळ्या पंखांवर लाल ठिपके असलेले एक फुलपाखरू इतर फुलांना सोडून त्याच्याकडे आले व त्यावर स्थिरावले. थोड्या अवकाशाने त्याचा गंध पाझरला,रंग कोमेजला आणि अंग आकसून फूल जमिनीवर गळाले. "हे तुझं आयुष्य! क्षणाचा रंग, क्षणाचं जीवन!" तेथून उडून जाताना फुलपाखरू म्हणाले. झळाळणाऱ्या आभाळाखाली वाऱ्याच्या लहरीवर ते आर्त स्मृतीप्रमाणे तरंगू लागले. आनंद चाखायला खाली फुलांचा गालीचा, उडायला वर स्फटिकाप्रमाणे आभाळ ! तोच निळ्या रंगाचा लाल चोचीचा एक पक्षी आला.

फ्लॅट खरेदी ,शाप कि वरदान ( खास करुन नोकरी वाल्या लोकांसाठी)

लेखक स्वरुपसुमित यांनी सोमवार, 24/02/2025 या दिवशी प्रकाशित केले.
गुंतवणुक म्हणुन फ्लॅट घेने किती सोयिस्कर? फायदे ,खास करुन नोकर दार लोकान साठी आयकर सुट हक्काचे घर मोड तोड स्वातंत्र्य कीमत वाढु शकते कायम ची गुंतवणुक सारखी घर बदलायचि कट कट नाही नुक्सान नोकरी ची जागा बदलली कि फ्लॅट बदलणे किवा लांब चा प्रवास गुंतवणुक आहे पण लगेच पैसे पाहिजे असल्यास फ्लॅट विकणे वेळ खाउ आहे भाडे हे. होम लोन हप्त्यां पेक्शा स्वस्त आहे शेजारि पाजारि आले कि फ्लॅट बदलता येत नाही, आहे त्यांना सहन करावे लागते