विचार
Alien Contact
The amount of 290 crores INR has been deposited in your account by Tesla Incorporated USA
हा मेसेज माझ्या मोबाईलवर आला आणि मी आनंदाने आश्चर्य मुग्ध झालो. आज तारीख 15 सप्टेंबर 2025. दोन महिन्यापूर्वी मी माझ्या ICOM 500 XR setup वर shortwave FM TV FM DXing करत असताना एक अजब संदेश माझ्या रेडिओवर झळकला. तो संदेश गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून होता. मी माझ्या transceiver कडून ताबडतोब रिप्लाय केला. आपण कोण आहात व माझ्याशी का संपर्क करू इच्छिता? त्यावर उत्तर आले की आम्ही गॅलेक्सी टू वन नाईन एट कडून बोलतोय आम्हाला पृथ्वीवरील जीवनाबद्दल जिज्ञासा आहे पृथ्वीवरील लोकांना मदत करायची आहे.
( )129210... अङ्कानां वामतो गति।।
स्वगतः
१.मला मॉडर्न्स सायन्स/ मॅथेमॅटिक्स मधील संकल्पना आपल्या तत्वज्ञानाशी जोडायला फार आवडते. एस.क्यु.एल मध्ये इंडेक्सिंग हा प्रकार असतो प्रत्येक रो ला एक इंडेक्स लावली की सगळे सॉर्ट, फिल्टर वगैरे ऑपरेशन्स सुपरफास्ट होतात.
किंवा गुगलने सर्वच इंटरर्नेटवर जे केले आहे तसे इंडेक्सिन्ग. म्हणजे कसं की गोष्टी शोधणे सोपे होते.
किंवा अजुन सोपे उदाहरण म्हणजे आता आपल्या पयथॉन मध्ये डिक्शनरी डेटा टाईप असतो ज्यात key : value अशा पेयर असल्याने कोणतेही सर्च ऑपरेशन सोप्पे होउन जाते.
तसे आपल्या तत्वज्ञानाच्या बाबतीत करता आलं तर मजा येईल.
“साहेबांचा ताजमहाल”
ऑफिस चे किस्से
उत्पादन क्षेत्रा मध्ये कामगार, माथाडी अश्या बऱ्याच घटकांचा सहभाग असतो , तसेच कनिष्ठ / वरिष्ठ व्यवस्थापक वर्ग पण खालून वर बढती घेत घेत आलेला असतो , त्यामुळे राहण्या , वागण्या, बोलण्यात थोडा अघळ पघळ पणा दिसतो, IT सारखा अत्याधुनिक कृत्रिम वातावरण नसते .
अश्या वातावरणातून काही अफलातून किस्से घडतात , अशेच काही किस्से सादर करण्याचा मानस आहे.
बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?
"बकरे की माँ कब तक ख़ैर मनाएगी?"
प्रेरणा: मारवा ह्यांच्या 'दावत-ए-ईद पेटा इंडिया चा एक स्तुत्य उपक्रम' ह्या धाग्यावरच्या धर्मराजमुटके ह्यांच्या 'प्रतिसादातील' लिंक वरील "बकरी ईदच्या दिवशी जैन व्यक्तीनं मुस्लीम वेश परिधान करून १२४ बकऱ्या केल्या खरेदी; पण कशासाठी?" हि बातमी वाचत असताना मनात अनुक्रमे 'कौतुक', 'मौज' आणि व्यावहारिक 'चिंता' अशा निरनिराळ्या भावना निर्माण होत गेल्या आणि काही तरुणांच्या समूहाने, एका चांगल्या हेतूने केलेल्या ह्या उदात्त कार्याविषयी जे व्यावहारिक प्रश्न पडले त्यांचा उह
सत्तावीस वजा किती बरोबर शून्य?
भर दुपारची वेळ.उन्हाची काहिली. मी माझ्या आवडत्या खिडकीपाशी, माझ्या आवडत्या कोचावर बसले होते. समोरच्या टीपाॅयवर पाय पसरून. अगदी आरामात. एसी लावून. आणि थोड्याच वेळात लक्षात आलं अचानक खोलीत काळोख पसरलाय. बाहेरही काळोख झालाय. उन्हं लपून गुडूप झालीत. आकाश काळ्याभोर ढगांनी घेरलंय. ओहो, क्षणातच एक एक टपोरा थेंब जमिनीवर पडायला लागला. मी एसी बंद केला. मला आता कृत्रिम खोट्या गारव्याची गरज नव्हती.
मला नैसर्गिक,खरा, आतून शांत करणारा थंडावा मिळणार होता.
पावसाला सुरुवात झाली. धरती आणि पावसाचं लग्न लागलं. आसपासची झाडं सळसळत,आनंदानं डोलत अक्षता टाकत होती.
तांडव (ऐसी अक्षरे -१८)
तांडव-पुस्तक परिचय
लेखक-महाबळेश्वर सैल
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.
पंधराव्या शतकाच्या सुरुवातीला कोचीमध्ये पोर्तुगीजांनी पाऊल टाकले. लवकरच दहा वर्षात गोव्याला मुख्य ठाण केलं. आदिलशाहीविरूद्ध अनेक दशके सुरू असतानाच आपला मुख्य हेतू धर्म परिवर्तनाचा पसारा संपूर्ण गोवा पाटणात पसरवला.जल्लोष (निवडणूक निकाल स्पेशल)
निवडणूक मग ती विधानसभेची असो की लोकसभेची, मी खूप उत्सुक, उत्साही आणि अधीर होते. मतदानाचा दिनांक जाहीर होतो आणि तो माझ्या पक्का लक्षात राहतो.
ती तारीख जवळ येत चालली की माझा उतावीळपणा वाढत जातो.
"आपली नावं आहेत ना मतदारयादीत? चेक करा. तुम्ही खात्री करून घेतली आहे ना? मतदान केंद्र नेहमीचंच ना? सकाळी लवकर जावून मतदान करुन येऊया हं! उशीर नको. आपला पहिला नंबर हवा. पहिला चहा, ब्रेकफास्ट मतदानानंतर करायचा." .. अशी कटकट मी घरच्यांच्या कानाशी सुरु करते आणि तेही होकार देऊन देऊन बेजार होतात.
बाजारगप्पा-भाग-२
तर मागील भागात आपण बघितलं की काही सार्वकालिक सत्ये आह्ते बाजाराविषयीची त्याच चर्चेला थोडं पुढे नेत पुढील महत्वाचे सत्य बघु या.
३-ट्रेडींगमध्ये दिर्घकाळ सातत्याने यशस्वी होण्यासाठी पामुख्याने तीन घटकांची आवश्यकता असते.1-money management 2-mindset 3-method.
सर्वसाधारणपणे तुम्ही कुठल्याही दिर्घकाळ सातत्याने यशस्वी ट्रेडर्स ची पुस्तके किंवा मुलाखती बघितल्या वा चर्चा केल्यास वरील तीनही घटकांच्या आवश्यकतेबाबत सर्वामध्येच एकमत असते आणि ते खरेच आहे. यात प्रत्येक घटकाचे योगदान किती टक्के असते यावर वेगवेगळ्या ट्रेडर्स मध्ये मतभेद आढळतील.
तात्या ......... !
तात्या वारला !
चंद्रशेखर अभ्यंकर असं भारदस्त नाव धारण केलेला हा आडमाप माणूस - वयाने आणि आकाराने माझ्यापेक्षा बराच मोठा होता. मोठा असूनही त्याला कधी अहोजाहो केलं नाही. तो वारला हे भिडेखातर लिहितोय - तात्या मेला अस लिहिलं पाहिजे.
काही वर्षापूर्वी भारतात होतो तेव्हा तात्याच्या अनेक भेटी व्हायच्या. सोशल मीडियातून मला भरगच्च मित्र मिळाले. पुढे वेगवेगळ्या कारणांनी सगळेच दुरावले - त्यातला तात्या प्रमुख ! फेसबुक आणि ऑर्कुट लोकप्रिय व्हायच्या आधी - मिसळ पाव हा नव्या मराठी लेखकांचा अड्डा होता. तात्या त्यातला मुख्य माणूस.
मिसळपाव