सहज सुचलं म्हणून
सहज सुचलं म्हणून
( राजकारणसोडून छोट्या चर्चांसाठी)
इतिहास, पुस्तकं, पाककला आणि इतर विषयांची चर्चा खरडफळ्यावर होते आणि मोठमोठे माहितीपर प्रतिसाद खरडफळा साफ झाल्यावर गायब होतात. तर तसे होऊ नये म्हणून हा धागा सुरू करत आहे.
* आमच्या इथे एक पेपर आणि मासिके वाचनाचा एक मिनी ज्येष्ठ नागरिक कट्टा ( म्हणजे दोन बाकडी , कडाप्पा फरशी टाकून) सुरू झाला होता. परवा तिकडे एक पाटी वाचली आणि पुण्यात असल्यासारखं वाटलं. 'ज्येष्ठ नागरिक कट्टा' पाटीखाली 'राजकारण चर्चेसाठी नाही' असं लिहिलं होतं. हसू आलं. तर हा आपला धागाही राजकारण चर्चेसाठी नकोच असं ठरवलं. बघू असा चालतो.
मिसळपाव
बालपण आणि किशोर अवस्था ही नंदाघरी गोकुळात गेले.
कृष्ण जीवनातील गोपीकृष्ण हा जसा टीकेचा विषय असतो तसा तो मधुराभक्तीचा प्राण आहे. महाभारतात या लीलांचा उल्लेख नाही.गोपीकृष्ण बद्दल अनेक प्रकारचे विचार आपल्याला वाचायला मिळतात.
एक दिवस अवखळ कृष्णाला यशोदेने एका उखळीला बांधले. ती कामासाठी इतरत्र निघून गेली. छोटासा कृष्ण उखळीसह अंगणात आला. अंगणातच यमलार्जुन नावाचे दोन वृक्ष होते. कृष्ण उखळीसह त्यामधून पुढे निघाला, आकाराने छोटी उखळ झाडाच्या खोडांनाच अडकली.
कृष्ण जन्माच्या आधी एक साम्राज्यवादी नेता होता त्याचे नाव जरासंध व मगधचा राजा.