Skip to main content

प्रतिभा

कळ

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 06/01/2018 या दिवशी प्रकाशित केले.
कळ .... तिच्या हसऱ्या फोटोवर एक नजर फिरवली. सगळे प्राण बोटाच्या अग्राशी आणून डिलीटचा ऑप्शन वापरला. मोबाईल बंद केला. एक भला मोठ्ठा दगड मनाच्या दाराशी ठेवला आणि कौशिकदा उठले. Backstage वाले आपापल्या कामात मग्न होते. खिळे, फळकुट, हातोडे, गिरमीट, हा कपडा, तो स्टूल, तो आरसा, ही पिशवी कुठे अडकवायची.... एक ना दोन! शुभारंभाच्या प्रयोगाची तारीख जवळ येत होती. तयारी जोरात चालू होती. कौशिकदा या नाटकाचे दिग्दर्शक. सगळी हयात ‘नाटक’ या एकाच विषयात गेलेली. आपण केलेली नाटकं संख्येत मोजण्यात त्यांना फारशी रुची नव्हती. सतत नाविन्याचा ध्यास. प्रयोग करीत रहायचे.

कमलताल

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 29/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
(ताल = सरोवर) प्रिय कमलताल, मी आता फार फार दूर निघून आलेय. पण जेव्हा वारा स्तब्ध होतो, पानही हलत नाही तेव्हा, मन थेट तुझ्यापाशी जाऊन पोहचते. कितीही चाललो तरी पाय न दुखण्याचा एक काळ असतो. पहाटे उठावे. पाठीवर सॕक टाकावी. मिळेल ते वाहन घ्यावे. फारसे गुगल न करता, उंच उंच हिमालयात गुडूप व्हावे. तो पर्वतराज संपन्न. त्याची अगणित शिखरे. हे पार करेपर्यंत ते, ते पार करे पर्यंत ते, आणखी पुढची, आणखी पुढची शिखरे. प्रत्येक शिखर कोरीव. आकाशाला कातणारे. या शिखरांच्या पायथ्याशी कुठे कुठे माणसांची वस्ती. फार विरळ. अशीच चालून चालून दुपार उलटली. ते चालणे फार लयदार असे. उंच उंच झाडांतून जाणारी नागमोडी वाट.

अरि

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 15/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
अरि ....... त्यावर्षी पहिल्यांदाच एका भारतीय मुलाने शाळेत admission घेतली. अरिंधम त्याचे नाव. पण इतके अवघड नाव काय या अरबी मुलामुलींना घेता येईना. साहजिकच त्याचा अरि झाला. अकरावीत शिकत होता. तो म्हणजे आम्हा सर्व भारतीय शिक्षकांच्या जिव्हाळयाचा विषय! माझ्या जास्त जवळचा. कारण त्याने अकरावीला इंग्लिश साहित्य ठेवले होते, आणि पंजाबी असून महाराष्ट्रात बरीच वर्षे काढल्याने चांगले मराठी यायचे. म्हणजे, आमचे किती गूळपीठ असेल पहा!! तर वार्षिक क्रिडा महोत्सव सुरु झाला. हा जोश, हा उत्साह!!

छायाचित्रणकला स्पर्धा क्र. १८: फूड फोटोग्राफी

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 09/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, यापूर्वीच्या छायाचित्रणकला स्पर्धांना दिलेल्या प्रतिसादाबद्दल अनेक धन्यवाद. काही अवधीनंतर आज याच मालिकेतल्या नव्या स्पर्धेची घोषणा करताना आम्हांला अत्यंत आनंद होत आहे. या वेळचा विषय आहे - 'फूड फोटोग्राफी' किंवा 'खाद्यपदार्थांचे छायाचित्रण'. आकर्षक पद्धतीने सजविलेल्या खाद्यपदार्थाचे नेत्रसुखद छायाचित्र प्रवेशिका म्हणून अपेक्षित आहे.

सलगीराह मुबारक हो गुलाम अली साहब

लेखक स्वलिखित यांनी मंगळवार, 05/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
गुलाम अली साहब... सालगीराह मुबारक हो , तुमच्या बद्दल सर्व काही माहित असूनही काय लिहावं हेच कळत नाही, कारण तुम्हाला आजपर्यंत जे काही ओळखले ते फक्त संगीतामध्ये आणि गाण्यामध्ये..

'सिद्धार्थ' आणि शशी कपूर

लेखक शिव कन्या यांनी मंगळवार, 05/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
'सिद्धार्थ' आणि शशी कपूर (आपला आवडता अभिनेता दिवंगत झाला कि च त्याच्या आठवणीत काही लिहावे हे वाईट आहे! पण तसं होतंय खरं. ) मला त्याचा आवडून गेलेला चित्रपट म्हणजे 'सिद्धार्थ'. नोबेल परितोषिक विजेत्या Hermann Hesse या जर्मन लेखकाच्या 'Siddhartha' या कादंबरीवर आधारित हा सिनेमा Conrad Rooks ने निर्माण केला. तरुण सिद्धार्थ आत्मशोध घेण्यासाठी घराबाहेर पडतो....

जिव्हाळघरटी

लेखक समयांत यांनी शनिवार, 02/12/2017 या दिवशी प्रकाशित केले.
मनाच्या काचेवर कापरासारखे आपले बालपण ठेवले तर ते भुर्र उडून जाते, ते उडूच नये असे वाटते, हसरे मन लेऊन जन्मतो आपण प्रत्येक जण मात्र इथूनच ते हरवून द्यायला.. पण नेहमी रडतोसुद्धा आपण तरी दिवसेंदिवस लागतात आपले हसू विरायला, पहिला दिवस खळाळून जातो हसण्या-रडण्यात, नंतर नंतर तर हसण्याला स्मृतीभ्रंश होतो आणि रडण्याला पेव फुटते. नातं व्हावं कसं..

राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ.

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 18/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
राणी एलिझाबेथ, साधी एलिझाबेथ. [ही एक रूपककथा. लावू तितके अर्थ. करू तसा विचार.] एक होती राणी एलिझाबेथ. दुसरी होती साधी एलिझाबेथ. दोघींचाही आपापल्या मामांवर भारी जीव होता. मामांचाही त्यांच्यावर. एके दिवशी घरात अचानक गर्दी दिसू लागली. गर्दीतच मामा झोपलेला दिसला. शेलाट्या अंग काठीचा मामा एकदम जाडसर दिसू लागला. त्याच्या अंगा खांद्यावर कसली कसली हारफुलं घातली जाऊ लागली. साधी एलिझाबेथ मामाजवळ जायचा हट्ट धरते. राणी एलिझाबेथ सगळे प्रोटोकॉल्स सांभाळत, मूक अश्रू गाळीत उभी राहते. जराशाने आपले कोणच ऐकत नाही म्हटल्यावर, साधी एलिझाबेथ रडून रडून हलकल्लोळ माजवते.

infinity

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली. सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही. चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश. बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती.

!! श्रद्धांजली !!

लेखक जागु यांनी सोमवार, 13/11/2017 या दिवशी प्रकाशित केले.
एखादी व्यक्ती जन्माला येते ती अनेक गुणांचे पुंजके घेऊनच. आयुष्याच्या वेगवेगळ्या वाटेवर त्यांचे विविध पैलू विखुरले जात असतात. अशीच एक विविध पैलूंनी आपले आयुष्य जगून गेलेली व्यक्ती म्हणजे माझे वडील कै. शशिकांत गणपत घरत उर्फ अण्णा. अण्णांचा जन्म रायगड जिल्ह्यातील उरण येथील फुंडे गावचा. आई,वडील चार भाऊ आणि पाच बहिणी असा आग्री समाजातील भला मोठा परिवार. अण्णा भावांमध्ये शेंडेफळ. अण्णांचे वडील रेल्वेमध्ये कामाला होते. घरी शेती व मिठागरे होती. अण्णांचे वडील म्हणजे माझे आजोबा शिस्तीने कडक व शिक्षण प्रिय असल्याने सगळ्या मुलांना सक्तीने शाळेत घातलेले.