फोकनाड !
फोकनाड !!
एका सायंदैनिकात मंत्रालयातील पब्लिसिटी खात्याचा एक अधिकारी पार्टटाईम बातमीदारी करायचा. एकदा तो एक फालतू बातमी घेऊन आला. साहेबाच्या हातात त्याने तो कागद दिला. साहेबांचा नजर हातातल्या कागदावरच्या बातमीवरून फिरत होती आणि हा समोर बसून साहेबाच्या चेहर्यावर उमटणाऱ्या प्रतिक्रियेचा अंदाज घेत होता... साहेबानी बातमी वाचून संपवली. कागद बाजूला ठेवला...
याला साहेबाच्या प्रतिक्रियेचा काहीच अंदाज येत नव्हता... शेवटी न राहवून त्याने विचारले, 'साहेब कशीय बातमी?'...
'एकदम फोकनाड'... हसतहसत साहेब म्हणाले.
याला अर्थ कळला नाही, पण साहेब हसत होते, म्हणजे चांगली असणार असे समजून तो आनंदला.
मिसळपाव
“पवारसाहेबांनी राष्ट्रवादीच्या वेबसाइटवर त्यांच्या एका ब्लॉग पोस्टवर कसले सणसणीत आणि परखड विश्लेषण केले आहे दिल्ली विधानसभा निवडणुकांचे!”, बारामतीकर, चावडीवर प्रवेश करत.
“वेबसाइट, ब्लॉग...बरं... बरं... काय म्हणताहेत तुमचे आदरणीय शरदचंद्ररावजी पवारसाहेब?”, नारुतात्या उपहासात्मक सुरात.
“मग, साहेब नवीन तंत्रज्ञानातही आघाडीवर आहेत! असो, सर्वांचीच कानउघाडणी केली आहे त्यांनी!
याच वर्षात दादासाहेब फाळके या भारतातील चित्रपटक्षेत्रातील सर्वोच्च पुरस्काराने पुरस्कृत झालेले हिंदी चित्रसृष्टीच्या गतकाळातील "सुप्रसिद्ध" खलनायक तसेच चरीत्रनायक प्राण सिखंड यांचे वृद्धापकाळाने आणि आजारापणाने निधन झाले आहे.
खलनायक पण ग्रेसफूल असू शकतो हे प्राण यांच्या भुमिका बघताना समजते... मधूमती, कश्मीर की कली, आदी अनेक चित्रपटातील त्यांच्या खलनायक असलेल्या भुमिका गाजल्या असल्या तरी त्यापेक्षा कसौटी आणि जंजीर मधली त्यांची दोन गाणीच अधिक आठवत आहेत...