Skip to main content

लेख

प्राकृतिक चिकित्सा दिवस : योग, यज्ञ आणि प्राकृतिक चिकित्सा स्वर्णिम युगाकडे वाटचाल

लेखक विवेकपटाईत यांनी शुक्रवार, 19/11/2021 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
माणसाचे शरीर पंच तत्व - माती, पाणी, अग्नि, वायु आणि आकाश (मन) पासून बनलेले आहे. शरीरात या तत्वांचे संतुलन बिघडले की माणूस आजारी पडतो. हे संतुलन प्राकृतिक तत्वांच्या सहाय्याने ठीक करणे म्हणजे प्राकृतिक चिकित्सा. भारतात प्राकृतिक चिकित्सा वैदिक काळापासून आहे. आयुर्वेद चिकित्सा प्रणालीत शरीरातील कफ, पित्त आणि वात या त्रिदोषांचे संतुलन प्राकृतिक तत्वांद्वारे केले जाते. योग, यज्ञ आणि आयुर्वेद ही प्राकृतिक चिकित्सा पद्धतीचा एक भाग आहे. गतकाळात सतत होणार्‍या विदेशी आक्रमण आणि युद्धांमुळे या पद्धती सामान्य जनतेपासून दूर गेल्या.

इतिहासाचे डिटेक्टिव

लेखक केदार भिडे यांनी बुधवार, 17/11/2021 19:25 या दिवशी प्रकाशित केले.
आपण इतिहासात जसजसे मागे जाऊ तसे त्या त्या काळाची कहाणी सांगणारी साधने बदलत जातात. अधिक मागे गेले की एक काळ असा येतो की लिहिलेले असले तरी नेमके काय लिहिले आहे हे वाचता येत नाही किंवा त्यातही काळाच्या ओघात शिल्लक राहिलेले अपुरे असते. अजूनही मागे जावे तर लिखित साधने अगदीच सापडेनाशी होतात. अशावेळी इतिहास जाणून घेताना आपल्याला डिटेक्टिवच्या भूमिकेत शिरावे लागते. अनेक घटना या लिखितपूर्व काळात घडलेल्या असतात आणि एखाद्या गुन्हेगाराप्रमाणे आपला ठसा मागे ठेऊन जातात. गुन्हेगार कधी हाताचे ठसे मागे ठेवतो, बुटाचा ठसा सोडतो, एखादा केस किंवा पार्किंगमध्ये गाडीच्या चाकाचे ठसे मागे ठेऊन जातो.

वाईन - भाग २

लेखक श्रीगणेशा यांनी शुक्रवार, 12/11/2021 21:52 या दिवशी प्रकाशित केले.
(मागच्या वेळी श्री ने मोठ्या शिताफीने वाइनचा प्रसंग वेळ मारून नेला होता. वाईन - भाग १ पण सौ काही हार माननाऱ्यातील नव्हती. पाहुयात पुढे काय घडलं ते...) सौ: मग काय विचार केला आहे तुम्ही? श्री: (गोंधळून) कशाचा विचार? आणि तू असं अचानक कोड्यात काय बोलते आहेस आज? सौ: वाटलंच. माझं मन काही तुम्ही जाणू शकत नाही. आज १६ वर्षे संसार एकटीने चालवला. पहिल्यांदा काहीतरी मागितलं तर तुम्ही चेष्टेवारी नेला विषय. श्री: (डोक्यात प्रकाश पडून) मी तुझी चेष्टा का करेल? आणि तेही वाईन वरून? उलट तूच माझी चेष्टा केली की काय असं मला वाटतंय.

विवेकाच्या वाती

लेखक चंद्रकांत यांनी शनिवार, 06/11/2021 22:06 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य नावाच्या वर्तुळाभोवती प्रदक्षिणा घडत असतात. कोणत्याही जिवांच्या जगण्याची तऱ्हा याहून वेगळी नसते. ते काही नियतीचं देणं नसतं, तर निसर्गाने आखून दिलेला नियत मार्ग असतो. श्वासांची स्पंदने सुरात सुरू असली की, जगण्याचा सूर सापडतो. सूर सापडला की आयुष्याचा नूरही बदलतो. इहतली जीवनयापन करणाऱ्या प्रत्येकाच्या विस्ताराच्या परिभाषा वेगळ्या असतात. परिमाणे निराळे असतात, तसे परिणामही. विस्ताराचे सम्यक अर्थ सगळ्यांना अवगत असतीलच असं नाही. काही गोष्टी आपल्याभोवती संदेहांचं धुकं घेऊन असतात हेच खरं. विचारांतून विस्तारच हरवला असेल तर लांबीरुंदीच्या व्याख्या केवळ पुस्तकापुरत्या उरतात.

दिवाळी विशेष लेख- बोगी-वोगी रेस्टॉरंट

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 04/11/2021 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी काही दिवसांपूर्वीच मुंबईला गेलो असताना तिथे एका नव्या रेस्टॉरंटमध्ये जाऊन पदार्थ चाखण्याचा आनंद घेता आला. यंदाच्या दिवाळीच्या निमित्ताने मुंबईतील त्याच माझ्या वेगळ्या अनुभवाविषयी... छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या 18 क्रमांकाच्या फलाटाच्या बाहेरच्या बाजूला Bogie-Wogie हे अनोखे रेस्टॉरंट ऑन व्हिल्स सुरू झालेले आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुरू झालेले हे मध्य रेल्वेवरील पहिलेच चाकांवरील रेस्टॉरंट आहे. हे रेस्टॉरंट चालवण्याचे कंत्राट Bogie-Wogie या रेस्टॉरंट चालकाला मिळाले आहे.

पुस्तकांचा सुकाळ वाचकांचा दुष्काळ : भाग एक

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/11/2021 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे वाचकांच्या तीन पायर्‍या असतात- जे उपलब्ध होईल ते वाचणारे भाबडे वाचक, अभिरुचिसंपन्न वाचक आणि उच्च अभिरुचिसंपन्न वाचक. पहिल्या पायरीवरील वाचक प्रगती करत तिसर्‍या पायरीवर जाऊ शकतो. पैकी उच्च अभिरुचिसंपन्न वाचक हा, बाहेर कितीही करमणुकीच्या साधनात उत्क्रांती- क्रांती वा स्फोट झाले तरी त्याची वाचनसाधना सोडत नाही. ती त्याची गरज बनलेली असते. त्याला प्रपंचासाठीची नोकरी वा व्यवसाय यांतून वाचण्यासाठी वेळ मिळत नसला तरी वेळ नाही असे त्याला वाटत नाही. तो त्यातल्या त्यात फट काढतोच काढतो व तो वेळ वाचण्यास देतो.

फ्रॅक्टल्स

लेखक केदार भिडे यांनी शनिवार, 30/10/2021 01:22 या दिवशी प्रकाशित केले.
मी चौथीत असताना माझ्याकडे एक पुस्तक होते. त्या पुस्तकाच्या मुखपृष्ठावर एक मुलगा आणि मुलगी हे एक पुस्तक हातात घेतलेले दाखवले होते. त्यांच्या हातात दाखवलेल्या पुस्तकाचे मुखपृष्ठ तसे कोरेच होते. पण मी काहीतरी चित्र काढावे म्हणून त्या मुलांच्या हातातल्या कोऱ्या पुस्तकावर अजून एक मुलगा मुलगी काढले. अर्थात, त्या छोट्या जागेत मावतील असे आणि माझ्या चित्रकलेप्रमाणेच. महत्वाचे म्हणजे त्या मुलांच्या हातात मी पुन्हा तसेच एक पुस्तक दाखवले. तेव्हा मी काही फार पुढे विचार केला नाही.

वाईन

लेखक श्रीगणेशा यांनी गुरुवार, 28/10/2021 14:06 या दिवशी प्रकाशित केले.
(कधीही मद्य प्रकाराच्या वाटेला न गेलेल्या श्री व सौ मधील हा संवाद!) सौ: मला एकदा वाईन घ्यायचीच आहे. आपण दोघे मिळून एकदा एखादी बाटली घेऊच. वाईन मुळे स्किन चांगली राहते असं वाचलं आहे मी. श्री: वाईन? आणि आपण दोघे? काहीही. तुला इथे thums up घेताना चार वेळा ठसका लागतो. तू काय वाईन घेणार? सौ: वाटलच होतं. नकारात्मकता पुरेपूर भरली आहे तुमच्यात. आणि मला तुम्ही नेहमी कमी समजता. श्री: अगं, तसं नाही. आपल्याला अभ्यास करावा लागेल खूप. मद्याचे खूप वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक पेयामधे अल्कोहोलचं प्रमाण वेगळं. प्रत्येकाची चव वेगळी. खूप अभ्यास करून निर्णय घेऊयात.

लॉकडाऊननंतरचा पहिला प्रवास

लेखक पराग१२२६३ यांनी रविवार, 24/10/2021 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
कोयनेचे आरक्षण केल्यावर मी सकाळी लवकरच कोल्हापूरच्या श्री छत्रपती शाहू महाराज टर्मिनसवर पोहचलो. लॉकडाऊनच्या परिस्थितीचा परिणाम रेल्वेच्या प्रत्येक बाबीवरही दिसत होता. स्थानकात प्रत्येकाला तिकीट तपासूनच प्रवेश दिला जात होता. दोन नंबरच्या फलाटावर मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी कोयना उभी होतीच. अजून बाकीच्या गाड्या सुरू झालेल्या नव्हत्या. त्यामुळे एरवी कोयना सुटण्याच्या आधी दिसणारी प्रवाशांची गर्दी आणि लगबग यावेळी दिसत नव्हती. कल्याणचे निळ्या रंगातील दोघे डब्ल्यूडीएम-3 डी कार्यअश्व आमच्या गाडीचे सारथ्य करण्यासाठी सज्ज होते.