Skip to main content

लेख

२२ यार्ड

लेखक श्रीगणेशा यांनी शनिवार, 11/12/2021 15:37 या दिवशी प्रकाशित केले.
अगदी नव्वदच्या दशकातही, आमच्या डोंगरपायथ्याला बिलगून असणाऱ्या छोट्याश्या गावात क्रिकेट हा लहान-थोर सर्वांचा आवडता खेळ. त्याचं स्वरूप थोडंसं वेगळं असेलही पण उत्साह मात्र तोच, जो भारतात क्रिकेटसाठी इतरत्र कुठेही दिसेल. फळी (बॅट) विकत आणलेली बॅट त्यावेळी गल्ली क्रिकेटमधे तरी अपवादानेच सापडायची. एखादी लाकडी फळी शक्य असेल त्या पद्धतीने बॅट मधे रूपांतरीत केली जायची. त्या बॅटने खेळायची एवढी सवय व्हायची की कोणीतरी रेडिमेड बॅट आणली की रुळायला वेळ लागायचा. एकदा वाढदिवसाला हट्ट करून मिळालेल्या नवीन बॅटचा इतका आनंद झाला की मी भारतीय संघात खेळतोय अशी स्वप्न पडायला लागली.

रस्ते

लेखक अनुस्वार यांनी शुक्रवार, 10/12/2021 11:24 या दिवशी प्रकाशित केले.
पहिल्यांदा कधी तुडवला आपण हा रस्ता? 'तुडवणारे' आपण कोण म्हणा? रस्ता तुडवायला मोठ्ठं काळीज आणि पाऊल लागत असणार. अखंड पसरलेल्या जमिनीवर नेमक्या जागी पाऊल ठेवून रस्ता रुजवायला हत्तीचं बळ लागतं. तर आता सोपा प्रश्न. पहिल्यांदा कधी वापरलात हा रस्ता? नसेल आठवत. कुणीतरी (किंवा गुगलने) दिशा दाखवली आणि तेव्हापासून अगदी सवयीचा असल्याप्रमाणे यावरून चालणं झालं असेल आजवर. किती जणांच ... कुणास ठाऊक? गंमत तर बघा. रस्त्याच्या दुसऱ्या टोकाला कोणीही उभं नाहीये. हे सांगायला की हा रस्ता आम्हाला किती मदत करतो. तो रस्ता संपला की सगळेजण आपापली दुसरी वाट पकडतात. वळून मागे सुद्धा पाहत नाहीत.

75 वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी...

लेखक पराग१२२६३ यांनी गुरुवार, 09/12/2021 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
ठीक 75 वर्षांपूर्वी 9 डिसेंबरला घटना परिषदेची (Constituent Assembly) स्थापना होऊन स्वतंत्र भारतासाठीच्या राज्यघटनेच्या निर्मितीच्या कार्याचा शुभारंभ झाला होता. भारताच्या इतिहासात प्रथमच असे घडत होते. देशभर झालेल्या निवडणुकांमधून निवडून आलेल्या 299 सदस्यांची ही घटना परिषद होती. घटना परिषदेच्या सिद्धांतांचा भारताच्या स्वातंत्र्यलढ्याशी घनिष्ठ संबंध राहिलेला होता. त्यामुळे तिच्या स्थापनेपूर्वीच्या महत्वाच्या घडामोडींही पाहणे आवश्यक ठरते. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे 17व्या शतकाच्या प्रारंभी भारतात आगमन झाल्यापासूनच भारताचा घटनात्मक विकास सुरू झाला.

[लघुलेख] सोबत

लेखक तर्कवादी यांनी मंगळवार, 07/12/2021 19:20 या दिवशी प्रकाशित केले.
स्माजात वावरताना आपल्या डोळ्यासमोर रोज अनेक गोष्टी घडत असतात. काही महत्वाचे किंवा विशेष प्रसंग दीर्घकाळ लक्षात राहतात पण कधीकधी एखादा छोटासा प्रसंगही लक्ष वेधून घेतो आणि आपला त्या प्रसंगाशी काहीही संबंध नसतानाही मनात घर करून जातो. असाच एक गेल्या काही दिवसापूर्वीचा आमच्या सोसायटीतला एक प्रसंग. सायंकाळच्या वेळी मी सोसायटीमध्ये फिरत असताना माझ्यापासून थोड्या अंतरावर एक कार मोकळ्या जागेतील पार्किंगमध्ये येऊन थांबली. कारमधून पति, पत्नी आणि दहा-बारा वर्षे वयाचा मुलगा असे कुटुंब खाली उतरले ( मी त्यातल्या कुणालाही ओळखत नसलो तरी ते पती-पत्नी व मुलगा असे कुटुंब असावे असे मानायला हरकत नव्हती ).

बोंबललेल्या सुहागरातीची कहाणी (संपूर्ण)

लेखक स्पार्टाकस यांनी सोमवार, 06/12/2021 07:29 या दिवशी प्रकाशित केले.
सृष्टीची रचना झाल्यापासून शेकडो वर्ष पृथ्वीतलावर राहिलेल्यांचा असा दृढ विश्वास आहे की इच्छाधारी साप कोणत्याही क्षणी कोणाचंही रुप धारण करु शकतात. असं माझं मत नाही बरं का, राजकुमार कोहली नामक मल्टीस्टारर सिनेमांचा कारखाना चालवणार्‍या महाभागाच्या एका सिनेमाची सुरवातच या अचाट वाक्याने होते. हा राजकुमार कोहली म्हणजे खंडीभर कलाकार घेऊन तीन तासाच्या सिनेमात त्यांना कोंबून कोंबून बसवण्यात पटाईत माणूस. याचा राजतिलक हा सिनेमा तर एंटीटी-रिलेशनशिप डायग्राम आणि फ्लो चार्ट काढणार्‍यात एक्सपर्ट असलेल्यांचंही डोकं गरगरेल असा प्रचंड कॉम्प्लेक्स प्रकार आहे.

‘विक्रांत’

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 04/12/2021 16:09 या दिवशी प्रकाशित केले.
आज नौदल दिन. 50 वर्षांपूर्वी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्धात म्हणजेच बांगलादेश मुक्तिसंग्रामात 4 डिसेंबर रोजी भारतीय नौदलाने गाजवलेल्या पराक्रमाच्या पार्श्वभूमीवर दरवर्षी 4 डिसेंबरला भारतात नौदल दिन साजरा केला जातो. त्या युद्धात पराक्रम गाजवलेल्या आणि सेवानिवृत्तीनंतर संग्रहालय म्हणून नावारुपाला आलेल्या, अल्पावधीतच मुंबईतील एक आकर्षण ठरलेल्या, पण आता इतिहासजमा झालेल्या ‘विक्रांत’वरील त्याच संग्रहालयाविषयी... ‘विक्रांत’ने गाजवलेल्या पराक्रमाची भावी पिढीला ओळख व्हावी या हेतूने त्यावर नौदलाने एक तात्पुरते पण आकर्षक संग्रहालय उभारले होते.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) २: सत्गड परिसरातील भ्रमंती

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 02/12/2021 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना २६ ऑक्टोबरचा दिवस! अतिशय थकवणा-या प्रवासानंतर मस्त झोप झाली. अलार्म ऑफ केला असूनही लवकर जाग आली. पूर्ण उजाडलेलं नसताना खोलीच्या बाहेर आलो. अहा हा! समोर एका दृष्टीक्षेपामध्ये अक्षरश: हजारो झाडं आणि घनदाट हिरवा रंग! सत्गडवरून एका दृष्टीक्षेपामध्ये किमान तीन हजार देवदार झाडं सहज दिसत आहेत! आत्ता कुठे जाणीव होते आहे की आम्ही मध्यरात्री कुठे आलो आहोत. आणि ही जाणीवही होते आहे की, आम्ही किती नशीबवान आहोत. ह्या सगळ्या परिसराची व दृश्यांचा आनंद घेताना जाम हुडहुडी भरत होती.

हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना

लेखक मार्गी यांनी मंगळवार, 30/11/2021 12:35 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालय की गोद में... (रोमांचक कुमाऊँ भ्रमंती) १: प्रस्तावना सर्वांना नमस्कार. नुकताच उत्तराखंडमध्ये कुमाऊँ परिसरामध्ये फिरण्याचा योग आला. हा योग असतो आणि तो योग असेल तरच फिरणं होतं. अन्यथा कितीही नियोजन करून फिरणं होत नाही. हिमालयामध्ये फिरण्याची ही दहावी वेळ होती. ह्यावेळी हवामान खूप सुंदर होतं, त्यामुळे दूर दूरचे बर्फ शिखर दिसत होते. अनेक ठिकाणी ट्रेकिंग करता आलं. आणि सर्वांत मोठी गोष्ट म्हणजे दुर्गम अशा मानस सरोवर- कैलास पर्वत यात्रा मार्गावर गूंजी व काला पानी अशा अतिशय दुर्गम जागी‌ जाता आलं. गेल्या वर्षीच २०२० मध्ये इथे जीपचा रस्ता सुरू झाला आहे.

आठवण एका साथीदाराची...

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 27/11/2021 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
27 नोव्हेंबर 2001 ला पहिल्यांदा Voice of Russia ची हिंदी सेवा ऐकण्यासाठी संध्याकाळी साडेसहाच्या काही मिनिटं आधीच कार्यक्रमपत्रिकेवर लिहिल्याप्रमाणे त्या लघुलहरींवर नभोवाणी संचाची (रेडिओ) सुई नेऊन ठेवली होती. ठीक साडेसहा वाजता या नभोवाणी केंद्राची signature tune वाजू लागली आणि पाठोपाठ उद्घोषणाही ऐकू आली - ‘ये रेडिओ रुस है, हम मॉस्को से बोल रहें हैं।’ हे ऐकून खूपच प्रफुल्लित झालो.

उर्दू शायरीमधील "हर्फ गिराना" आणि हिन्दी चित्रपट संगीतावर त्याचा परिणाम

लेखक धष्टपुष्ट यांनी रविवार, 21/11/2021 12:57 या दिवशी प्रकाशित केले.
आतापर्यंत भूलचुकीमुळे काही काव्यशास्त्रविषयक लेख "जे न देखे रवी" मध्ये लिहीत होतो. कालचा लेख इथे पुन्हा प्रकाशित करत आहे. क्षमस्व! --- मराठी वृत्तबद्ध कवितेत एखादे अक्षर लघु आहे का गुरु यामध्ये संदिग्धता नसते, पण त्याचा कधीकधी जाचही होऊ शकतो. उर्दूमध्ये "हर्फ गिराना" या सवलतीमुळे त्यात लवचिकता, कधी कधी संदिग्धता आणि म्हणूनच रोचकता आली आहे. . या लघुलेखात आपण २ गोष्टी पाहणार आहोत १. हर्फ गिराना काय प्रकार आहे २. तो कधी कधी नीट न समजल्यामुळे चित्रपट संगीतात कसा घोटाळा होतो --- या लेखाच्या व्याप्तीच्या बाहेर: १.