‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794)
नमस्कार!
फ्रेंच राज्यक्रांतीमध्ये अनेक थोर विचारवंत होवून गेले जे मरेपर्यंत आपल्या तत्त्वांना चिकटून राहिले. या राज्यक्रांतीने अनेक नवनवीन विचारांना जन्माला घातले. मुख्य म्हणजे राज्यघटना हा प्रकार जन्माला घातला. हे सगळे असले तरीही ही राज्यक्रांती फ्रान्ससाठी फसलीच म्हणायची... का? ती चर्चा पुस्तकात मनोगतात करण्याचा विचार आहे. राजेशाही नष्ट केली आणि कॅथोलिकांचा प्रभाव कमी केला.
फ्रेंच राज्यक्रांतीत जी काही प्रमूख मंडळी होती त्यात एक होता ‘‘कोन्डोसे - Marquis de Condorcet. (17 September 1743 – 29 March 1794) त्याने नुसता राजकारणात भाग घेतला नाही तर तो एक अत्यंत बुद्धिमान गणिती होता.
मिसळपाव
पहिल्यांदाच मुंबईला पुण्याहून संध्याकाळी जायचं होतं. मग इंद्रायणीचं आरक्षण केलं आणि प्रवासाच्या दिवशी पुणे जंक्शनवर पोहचलो. तपकिरी रंगातलं कल्याणचं WCAM-2 इंजिन आज इंद्रायणीचं सारथ्य करत होतं.
प्रवासाच्या दिवशी पुणे स्टेशनला निघण्यापूर्वी वंदे भारतची पुण्यात येण्याची स्थिती पाहिली होती, तेव्हा गाडी 15 मिनिटं लेट असल्याचं दाखवलं जात होतं. आमचा प्लॅन होता वंदे भारतनं मुंबईत पोहचल्यावर थोडं इकडं-तिकडं फिरून दुपारी 3-4 पर्यंत परतीची बस पकडायची. पण नंतर वंदे भारतनं तसं करणं अशक्य बनवलं होतं.