Skip to main content

लेख

सुपरनॅचरल - भाग 3

लेखक nishapari यांनी गुरुवार, 11/07/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 जॉनची पत्नी मेरीला अझाझेल या डेमनने मारलं . त्याचा बदला घेण्याचा जॉनने निश्चय केला . त्यातून तो अमानवी अस्तित्वांना शोधून संपवणारा हंटर बनला ..असे अनेक हंटर त्याच्याआधीही होते पण जॉन मात्र अमानवी अस्तित्वांबाबत पूर्ण अनभिज्ञ होता . मेरीच्या मृत्यूनंतर शोध घेता घेता त्याचा इतर हंटर्सशी परिचय झाला .. त्यांच्या मदतीने आणि स्वतः अनुभव घेत तो लवकरच एक कुशल एक्स्पर्ट हंटर बनला .

चॉकलेट काका

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी गुरुवार, 11/07/2019 04:59 या दिवशी प्रकाशित केले.
देशपांडे काका ४-५ दिवस बेड वर आजारी असल्याने पडून होते जरा बरे वाटले म्हणून व पाय मोकळे करावे ह्या हेतून त्यांनी सारस बागेत जायचं ठरवलं ते उठले बेसिन जवळ जाऊन वोश घेतला आरशात पहाताना त्यांना जाणवलं दाढी खूप वाढली आहे पण दाढीचा कंटाळा आल्याने तोंड पुसले केस विंचरले पायजमा शर्ट घातला काकांना लहान मुले प्रिय होते त्यांची एक पिशवी होती त्यात गोळ्या चॉकलेट असायचे सोसायटीच्या मुलांना ते कायम देत असत त्यांना मुले चॉकलेट काका म्हणायचे सारसबाग सोसायटी पासून हाकेच्या अंतरावर होते पिशवी घेऊन ते सारस बागेत गेले थोडे पाय मोकळे झाल्यावर ते बाजूच्या बाकावर बसले समोर लहान मुले ६-७ वर्षांची असतील ख

पासवर्ड

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 09/07/2019 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
हर्षद हताशपणे आपल्या केबीन बसला होता... त्याचा कोंपिटीटर चिन्मय जोशी अत्यंत बुद्धिमान होता... चिन्मय ने त्याची साईट हॅक करुन पासवर्ड क्र्याक केला होता अन महत्वाची माहिति पळवली होति.. हर्षद चिन्मय चा पासवर्ड काढण्याचा प्रयत्न करत होता पण त्याला जमत नव्हते.. * चिन्मय च्या बुद्धिमत्तेस तोडीस तोड असलेली एकच व्यक्ति ऑफिस मधे होति... मानसी पटवर्धन....मागे पण चिन्मय ने असा प्रकार केला असता मानसी ने तो हाणुन पाडला होता... * अचानक त्याच्या गळ्यात नाजुक बाहुंचा विळखा पडला.. ए.सी च्या थंड वातावरणात ही तो शहारला.. त्याच्या गालाचे नाजुक पणे चुंबन घेत मानसी म्हणाली... "का काळजी करतोस?

देशमुख काका ,

लेखक Sanjay Uwach यांनी रविवार, 07/07/2019 21:00 या दिवशी प्रकाशित केले.
रोज सकाळी पहाटे फिरायला जाणे,हा माझ्या जीवनातील एक आनंददाई भाग आहे .या वेळी आपण नेहमीच्या आयुष्य पेक्षा , कांहीतरी वेगळ्या वातावरणात ,वेगळ्या जगात गेल्याचा भास, आपल्याला नेहमीच होत असतो . मस्त पैकी स्पोर्ट्स शूस घालून ,स्पोर्ट्स ड्रेस घालून त्या अंधुक प्रकाशात चालत जाणे व परत येताना घरा शेजारी असणाऱ्या बागेतील बाकड्यावर कांही काळ विसावणे,हा माझा नित्यनियमचा अनेक वर्षाचा कार्यक्रम आहे ,इतर वेळी मुंग्या प्रमाणे पळणारी हि माणसे ,कर्कश आवाज करीत ,धूळ उडवीत जाणारी अनियंत्रित वाहने, या पासून जीवाला थोडी सुटका मिळते .

सप्तपदीतलं वचन

लेखक चंद्र.शेखर यांनी शुक्रवार, 05/07/2019 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
सुरुवात कात्री शोधण्यापासून झाली होती, नेहमीच्या जागेवर मिळाली नाही, तिला विचारलं तर तिने आणून दिली. नेहमीची जागा बदलली होती तिने. नेलकटरचं पण तेच झालं. आणि मग लक्षात आलं खुप काही बदललयं. लग्न समारंभाचे धावपळीचे दिवस संपले आणि हळूहळू घर तिच्या सुरात गावू लागलं. आधी फक्त माझी सवय असलेल्या घरात ‘ती’ चा प्रवेश झाला होता. लग्नापुर्वी निदान वर्षभर तरी त्याच फ्लॅट मधे एकटा रहात होतो मी, त्यामुळे दैनंदिनी माझ्या मनाप्रमाणे चाले, मला हवं तेव्हा घरी पोहचणं असो, हवी तेव्हा बाथरूम टॉयलेट रिकामी असणं असो किंवा आणि काही, सब अपना राज.

बालसाहित्य - काळा वाघ

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 04/07/2019 23:26 या दिवशी प्रकाशित केले.
काळा वाघ ------------------------------------------------------------------ क्रिकेट ची मॅच अगदी रंगात आली होती . सिया अगदी मन लावून पाहत होती . विराटनं एक मस्त षट्कार मारला . ते पाहून सिया आनंदानं टाळ्या वाजवू लागली . टाळ्या वाजवतच ती ओरडली , " रिया "... त्यावर अगदी एखाद्या दांडग्या कुत्र्याच्या आवाजात रिया ' भॉ .... ' करून भुंकली . तो आवाज ऐकून सिया दचकलीच . ही रिया ना .... वेडी ! मॅच आवडत नाही म्हणून असं भुंकायचं ? तेवढ्यात तिच्या मानेला रियानं चाटलंसुद्धा . छे ! हे अति होतंय , सियाला वाटलं.

सहज उडण्याचा भ्रम

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 01/07/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे काही वेळा खूप एकटं वाटतं. असुरक्षित वाटतं. आपल्या पाठीमागे कोणीही उभं नाही असं वाटतं. जवळचं असं आजूबाजूला कोणीही नसल्याची भावना बळ धरू लागते. आपण उपरे आहोत. आपण चुकून या जगात जन्माला आलोत. अवेळी आपलं काही बरं वाईट झालं तर? झोपेत. रस्त्यात. एकटे असताना. कोण कोणाला कळवेल? आयुष्य म्हणजे काय? आपण कशासाठी जगत आहोत? जन्माला आलोत आणि आतापर्यंत कर्मधर्मसंयोगाने वाचलोत म्हणून फक्तह जगायचं का? या जगण्यामागे आपला उद्देश काय? पोटापाण्यापुरतं कमवण्यासाठी नोकरी करत रहायची. पुस्तकं वाचायची. आणि अधूनमधून काही लिहिण्यासारखं वाटलं तर लिहायचं. बस.

बिरादरीची माणसं - जगन काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी सोमवार, 01/07/2019 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो.

बालकथा -उन्नूचा मोरपिसारा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 26/06/2019 23:27 या दिवशी प्रकाशित केले.
उन्नूचा मोरपिसारा ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- जंगलात राहणारा उन्नू उंदीर नेहमी आईच्या मागे भुणभुण करत फिरायचा .कधी त्याला पक्ष्यांसारखं उडावंसं वाटायचं , तर कधी सशासारख्या उड्या माराव्याशा वाटायच्या. एकदा उन्नू म्हणाला , "आई , काय हा माझा काळा रंग ! मी बदकांसारखा गोरा गोरा हवा होतो ." त्या वेळी तिथून एक परी चालली होती . तिनं ते ऐकलं . आणि त्याची गंमत पाहण्यासाठी ती एका झाडाच्या मागं लपून बसली . आई म्हणाली , "एक काम कर .

बिरादरीची माणसं - गोविंद काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी बुधवार, 26/06/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
बाबांच्या अथक प्रयत्नानंतर महाराष्ट्र शासनाने भामरागड़ येथील त्रिवेणी संगमाच्या ३ किलोमीटर अलीकडे, हेमलकसा गावी काही जमीन लोक बिरादरी प्रकल्पाच्या निर्मितीकरिता दिली. प्रकल्प निर्मितीच्या सुरुवातीला, दुर्दम्य जिद्दीच्या बाबांसोबत काही १५-२० लोकं १९७३ साली घनदाट अशा दंडकारण्यामध्ये आली. सुरुवातीला बाबांसह या सर्वांनी काही राहण्यायोग्य झोपड्या आणि शेतजमिनी तयार केल्या आणि लोक बिरादरीच्या कार्याचा आरंभ झाला. या कार्यकर्त्यांमधीलच एक नाव जे बिरादरीमधे आजही आपसुक तोंडावर येते ते म्हणजे आमचे "गोविंद काका".