Skip to main content

लेख

पाभेचा चहा

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 24/09/2019 22:42 या दिवशी प्रकाशित केले.
चहा पिणे अन पाजणे हे काही आपल्याकडे पुर्वी नव्हते. पुर्वी चहा नव्हताच. लोक गुळपाणी देवून स्वागत करायचे. नंतर कधीतरी बोस्टन टी पार्टी झाली. अमेरीका स्वातंत्र्य झाली. ब्रिटीश भारतात आले. चीन मधल्या चहाला शह देण्यासाठी त्यांनी चहाची भारतात लागवड केली अन त्यानंतर चहा भारतात उत्पादीत होत गेला. चीन नंतर भारत चहा उत्पादनात दोन क्रमांकावर गेला. दुसर्‍या महायुद्धाच्या काळात रेल्वेस्थानकांवर चहा विकला जावू लागला. चहाची विक्री जाहीरात करून केली गेली. चहा पिणे कसे चांगले हे जाहिरात करून सांगितले जायचे. नंतर लोक चहाचे चाहते झाले.

आमार कोलकाता - भाग २

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 24/09/2019 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचा पहिला भाग येथे वाचता येईल :- http://www.misalpav.com/node/45320 आमार कोलकाता - भाग २ झाशीची राणी, तात्या टोपे, बहादुरशहा जफर, मंगल पांडे..... ही मंडळी म्हणजे १८५७ सालच्या उठावाचे नायक! इंग्रजांची सत्ता उलथून टाकण्याचा एत्तद्देशीयांनी एकत्र येऊन केलेला हा जोरकस-जबर प्रयत्न १८५७ साली झाला हे आपल्यापैकी बहुतेकांनी शालेय इतिहासाच्या पुस्तकात वाचले आहे. पण त्याआधी बरोबर १०० वर्षे म्हणजे १७५७ साली एक फार महत्वाची लढाई बंगालच्या भूमीवर घडली, ती म्हणजे प्लासीची पहिली लढाई.

प्रभातरंग (आमची रविवार सकाळ)

लेखक अमर विश्वास यांनी सोमवार, 23/09/2019 15:17 या दिवशी प्रकाशित केले.
प्रभातरंग (आमची रविवार सकाळ) काल सकाळी प्रभातरंग कार्यक्रम पहिला / ऐकला. (प्रभातरंग सकाळीच असतो याची नोंद घ्यावी) कार्यक्रमाची वेळ होती सकाळी साडेसहाची.. रविवार पहाट ... आत्तापर्यंत च्या अनुभवावरून बरोब्बर ७. १० ला पोचलो.. पोचल्याबरोरबर कुठे जागा रिकामी आहे यावर एक सराईत नजर फिरवत असतानाच कानावर शब्द पडले कार्यक्रमाची सुरवात करतो .... वेळेवर आल्याबद्दल स्वतःचीच पाठ थोपटली (इथे पुन्हा तीच स्वतःची पाठ थोपटणारी बाहुली (स्मायली)अपेक्षित आहे .. पण सापडत नाहीये) साबीरभाई स्वतः च बोलत होते .. उस्ताद साबीर ख़ान साहेबांची सारंगी .. साथीला प्रशांत पांडव. पटकन एक खुर्ची पकडली.

युगांतर - आरंभ अंताचा! भाग ४०

लेखक मृणालिनी यांनी शनिवार, 21/09/2019 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
गुरु द्रोणांनी केलेला अपमान आणि अर्जुनाचे बाण द्रुपद राजाचे मन घायाळ करून गेले होते. जखम काही केल्या भरत नव्हती. अर्ध राज्य गेल्याचे जितके दु:ख त्याला नव्हते तितके दु:ख अपमानाचे वाटत होते. त्याने यज्ञकुंडातील लाकडांच्या काटक्यांवर आग पेटवली..... त्याच्या हृदयात आधीपासून लागलेली! आणि अखंड यज्ञ सुरू केला. अग्निच्या ज्वाळा त्याच्या अपमानाइतक्या तिव्र झाल्या. 'याच! अश्याच धगधगत्या ज्वाळांमध्ये द्रोणाला जळताना पाहायचे आहे मला.....' तहान भूक हरपून द्रुपद यज्ञासमोर बसला होता. त्याला केवळ अपमानाचा बदला हवा होता. वेळ, पद, योग्य-अयोग्य.... कशाचीही पर्वा त्याला नव्हती.

'तंबोरा' एक जीवलग - ६

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 20/09/2019 20:31 या दिवशी प्रकाशित केले.
कोणतेही शास्त्रशुद्ध शिक्षण सोपे नसते. जे शास्त्र शिकायचे ती कला असेल तर ते आणखीन कठीण होते. त्यातही गाणे असेल तर महाकठीण. आईची तारेवरची कसरत पहात माझे असेच मत झाले होते. पुढे माझे गाण्याचे शिक्षण सुरू झाले तसे माझे हे मत दृढ होत गेले. आज तर त्यात काहीच संशय नाही. गानकला शिकून तिचा व्यवसाय करण्यासाठी काही गोष्टी आपल्याकडे जन्मजात असाव्या लागतात, काही आपल्या नशिबात असाव्या लागतात तर काही कष्ट करून मिळवाव्या लागतात. पैकी कंठात सूर आणि विद्या ग्रहण करण्याइतपत बुद्धी हे भांडवल जन्मतः असावे लागते.

आमार कोलकाता - भाग १

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 18/09/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
प्रास्ताविक आणि मनोगत :- 'शेजाऱ्याचा डामाडुमा' ह्या मी लिहिलेल्या सुदीर्घ लेखमालिकेला मिपाकरांनी उत्साहवर्धक प्रतिसाद दिला. गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये लिहिलेल्या 'बोनेदी बारीर पूजो' ह्या लेखात मी कोलकात्यातील जुन्या जमीनदार कुटुंबातील दुर्गापूजेबद्दल लिहिले, त्यालाही भरभरून कौतुक मिळाले.

भिकार्‍याची संपत्ती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/09/2019 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्‍याने आपल्या भिकारीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (नोकरी हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता.

तंबोरा' एक जीवलग - ५

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शनिवार, 14/09/2019 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
न केलेल्या अभिनयाची गोष्टः अभिनय ही एक स्वतंत्र कला आहे. एखाद्याला गाता येतं म्हणजे अभिनयही येईलच असं नाही. ़़़जसे गाणे मुळात असायला लागते तसेच अभिनयाचेही आहे. तो रक्तात असावा लागतो. प्रत्यक्षात मात्र अनेक गायक गायिकांनी संगीत रंगभूमीवर अभिनय केला. यशही मिळवलं. परंतु त्यांना प्रारंभी नाटक कंपन्यांमध्ये अभिनयाचे धडे गिरवायला लागलेच. कंपन्यांच्या पदरी अभिनय शिकविण्यासाठी माणसे नेमलेली असत. एखाद्या गायक गायिकेला अभिनयात तयार करून घेण्याची त्यांची जबाबदारी. या शिवाय बुजुर्ग नट अशा गायकांना अभिनयाचे धडे देत.

अज्ञान (Ig) - नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 14/09/2019 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे. आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात !

भीतीच्या आरपार (कथा)

लेखक vaibhav deshmukh यांनी शुक्रवार, 13/09/2019 13:09 या दिवशी प्रकाशित केले.
पुन्हा एकदा आलेली खोकल्याची उबळ त्याने महत्प्रयासाने दाबली. त्या खोकल्याचा आवाज रात्रीच्या त्या भयानक वातावरणात घुमला की, अघोरी शक्ति पाहून एखादे घुबड चित्कारले आहे का? असा भास होत होता. तोंडावरचा हात त्याने बाजूला केला. बिड्या ओढून ओढून छातीचा पिंजरा झालेला होता. जुना पंखा सुरू केला की जशी घरघर होते, तशी घरघर त्या छातीच्या पिंजर्‍यातून सारखी बाहेर यायची. अधून मधून खोकल्याची उबळ उफाळून वर यायची. एरव्ही तो मनसोक्तपणे खोकलला असता. पण या वेळची परिस्थिती वेगळी होती. या अशा काळ्याकभिन्न परिसरात तो एकटाच चालत होता. सोबतीला या काळोखाशिवाय चिटपाखरूही नव्हते.