Skip to main content

लेख

दिवाळी अंक

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 10/11/2019 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
मी नवीन दिवाळी अंक वाचत नाही आमच्या रद्दी च्या दुकानात जुने दिवाळी अंक मिळतात किंमत १० रु यास एक काल १० अंकविकत आणले आता चकली चिवड्या सोबाबत जुन्या अंकाचे वाचन २०० रु एक नवा अंक परवडत नाही आणि खर म्हणजे वर्थ पण नसतो साहित्यिक दृष्टीने जुने अंक वाचून झाले की त्याला परत देतो तो एका अंकास एक रुपया दराने परतावा देतो

फ्युएल, सिग्नेचर आणि नरकासुराचा वध

लेखक लाल गेंडा यांनी शुक्रवार, 08/11/2019 13:18 या दिवशी प्रकाशित केले.
(सत्य घटनेवर आधारित) तारीख : 2 नोव्हेंबर माणसं : एकूण आठ अवस्था : प्रचंड दमलेली व्यवस्था : एक क्वार्टर फ्युएल, दोन बाटल्या सिग्नेचर तयारी : वेफर्स, शेंगदाणे, थोडसं चिकन, थोडे मासे, (गरीब शाकाहारी माणसांसाठी) थोडंस पनीर, चार ग्लास, कोल्ड्रिंक्स वेळ : रात्रीचे अकरा वाजून तीस मिनिटे अंक 1 : सुरुवात एका ओळीत ठेवलेले चार ग्लास एकात 10 मिली आणि दुसर्यात 30 मिली फ्युएल तिसर्यात आणि चौथ्यात 30 मिली सिग्नेचर प्रत्येकी कोल्ड्रिंक्स स्वादानुसार "" चांगभलं "" चर्चा : दमलेल्या आई बापाची कहाणी अंक 2 : दुसरं वळण ( सेकंड राउंड) 20 मिली फ्युएल बाकी आणि सिग्नेचर अर्धा खंबा डाऊन चर्चा पुढे चालू .......

या जन्मावर या जगण्यावर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी गुरुवार, 07/11/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
बाळकृष्ण वारजे आणि सुमती वारजे हे दांपत्य आज जीवन हॉस्पिटलमध्ये आले होते. आज सुमती वारजे यांच्या चेकअपचा रिपोर्ट येणार होता. नर्सने बोलावलं तेव्हा ते दोघं डॉक्टरांच्या केबीनमध्ये गेले. "नमस्कार. बसा." डॉक्टरांनी त्यांना बसावयास सांगितले. "डॉक्टर रिपोर्टस् चं काय झालं??" बाळकृष्ण यांनी विचारलं "थोडं मन घट्ट करा सर." डॉक्टर म्हणाले. "काही प्रॉब्लेम आहे का??" सुमती वारजे म्हणाल्या. "तुम्हाला ब्रेन ट्युमर आहे. त्यामुळेच तुम्हाला सारखी चक्कर येते. हे बघा एक्सरेमध्ये पण गाठ दाखवत आहे." डॉक्टरांनी एक्सरे दाखवला. त्यात एक गाठ दिसत होती. "टेन्शन नका घेऊ आपण ऑपरेशन करून ती काढून टाकू.

आमार कोलकाता - भाग ९ (अंतिम) - बंगभोज

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 06/11/2019 15:55 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 भाग ५ - http://www.misalpav.com/node/45533 भाग ६ -

"आप्पा कुलकर्णी"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 05/11/2019 18:35 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्या सोसायटीत रहातो तिथे "आप्पा कुलकर्णी" नावाचा एक सदस्य रहातो..आमचे ३५-४० वर्षाचे संबंध आहेत आप्पा व त्याचे मित्र गेली अनेक वर्षे एक उपक्रम दिवाळीत राबवतात.. तो म्हणजे स्मशानात काम करणारे जे कर्मचारी आहेत त्याना "दिवाळी फराळ" वाटप मृत्यु काळ वेळ दिवाळी दसरा पहात नाहि.. कर्मचा-याना ना दिवाळी ना दसरा... आप्पा व मित्र हे काम वर्षानु वर्षे करत आहेत.. ना गवगवा ना चमकेगीरी... सलाम

अभी न जाओ छोडकर..

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी सोमवार, 04/11/2019 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी जाग आल्या आल्या पुन्हा तिने फेसबुक, व्हॉट्सअप चालू केलं. फेसबुकवर त्याचं नाव शोधलं पण ते दिसत नव्हतं म्हणजे अजूनही ब्लॉक लिस्ट मधेच आहे मी. तिने विचार केला आणि हसली मनात. काही मोठा इश्यू किंवा मोठं भांडण नव्हतं झालं. तरीपण त्याने तिला ब्लॉक केलं होतं. खुप रागवला होता तिच्यावर कारण पण तसंच होतं तिने मेसेज केला नव्हता त्याला. आता मेसेज नाही केला म्हणून इतकं काय रागवायचं? इतकंच कारण होतं. पण त्याचा रागच असा होता. तिने त्याला खुपदा समजून सांगितलं की मोबाईल बिघडला होता. वरून पडून त्याचा डिस्प्ले गेला होता. खुप समजावून सांगितलं. मोबाईल नीट करून आणलेलं बीलही दाखवलं. त्याला पटलंच नाही.

जन्मांतरीचे प्रेम

लेखक शुभांगी दिक्षीत यांनी शनिवार, 02/11/2019 03:14 या दिवशी प्रकाशित केले.
आज बँकमध्ये खुप गर्दी होती. महीन्यातला शेवटचा आठवडा असला की गर्दी ठरलेलीच. मिताली विंडोवर बसून आपलं काम करत होती. स्लिपवर लिहलेली रक्कम मोजून समोरच्या ग्राहकांना देणं आणि घेणं मोठं जोखमीचं काम. म्हणजेच विड्रॉवल आणि डिपॉझिट दोन्ही मितालीकडेच होतं. त्यामुळे मान वर करून इकडे तिकडे बघणं अशक्य. दोन नंतर जेव्हा गर्दी कमी झाली तेव्हा मिताली लंचसाठी गेली. आल्यावर काम होतंच. चारला बँक बंद होत असे. आज लंच करून आल्यावर ती कॅश मोजत होती. तेवढ्यात कोणीतरी तिच्या विंडोवर आलं. "बसा" तिने वर न बघताच सांगितलं तेव्हा ती व्यक्ती चेअर घेऊन बसली. कॅश मोजून झाल्यानंतर. ती त्या व्यक्तीला म्हणाली, "बोला".

मला भेटलेले रुग्ण - २०

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 01/11/2019 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळीच पहीला फोन आला तो मोठ्या भावाचा , नुकताच श्रीलंका दौरा आटोपून आला होता आणि घरी परत आल्यावर कळलं की गेल्या चार दिवसांपासून कामानीमित्त ज्या व्यक्तीच्या संपर्कात होता त्याला टिबी झाल्याचं कळलं होतं !! हा मुळापासून हादरला होता .... मी सगळं ऐकून घेतलं आणि समजावलं की टिबी होण्याची शक्यता जरी असली तरी टिबी होईलच असं नाही ... कारण तुझी प्रतिकारशक्ती पुरेशी आहे जेणेकरून काळजीचं कारण नाही !! तरीसुद्धा पुढले काही महीने चांगला प्रथिनेयुक्त आहार व पुरेशी झोप एवढंच सांभाळलं तरी झालं ....

बोलीभाषा: समज आणि आक्षेप

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/11/2019 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे अनेक लोकांचे बोलीभाषेबद्दल काही समज आहेत. काही अपसमज आहेत. समाजात फक्ते प्रमाणभाषा असाव्यात. बोलीभाषा नकोत. भाषा जेवढ्या कमी असतील तेवढे दळणवळण सुलभ होईल असा त्यांचा भाबडा समज असतो. ‘एक देश एक भाषा’ असा नाराही एकेकाळी गाजला आहे. (आणि आताही तसा प्रयत्न होऊ पहात आहे.) आपली भाषा सोडून इतर भाषा वा बोलींबद्दल असं मत मांडणं, अशा एखाद्या तथाकथित अभ्यासकाला शोभून दिसेल, ज्या अभ्यासकाचा एखादी बोली बोलणार्याा लोकांशी कधी कोणताही संबंध येत नाही. त्या बोलीतले अपरिहार्य लोकजीवन त्याला मा‍हीत नसतं.