Skip to main content

लेख

निरोधला विरोध!!!

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी बुधवार, 10/08/2011 16:18 या दिवशी प्रकाशित केले.
निरोधला विरोध! पुरुष उवाच या तरुणाईच्या डोक्याला खुराक देणाऱ्या २००९च्या दिवाळी अंकात ‘निरोधला विरोध’ कोठे कोठे अन् कसा कसा होतो याचे मोठे अभ्यासपूर्ण रेखाटन केलेले होते. एका नामांकित लेखकाने एड्सग्रस्तांसाठी सामाजिक कार्य करतांना अनावधानानेच या विषयाला तोंड फोडले आहे. निरोधच्या वापराला विरोध जसा सुशिक्षितांकडून होतो त्याच प्रमाणात अशिक्षितांकडूनही होत असतो. यामागील कारणमिमांसा शोधण्याचा लेखकाने प्रयत्न केला व त्याचे निरीक्षण किंवा परीक्षण म्हणजे हा लेख होय. प्रथम त्याने ग्रामीण भागातील लोकांची मते जाणून घेतली. तेव्हा असे निष्कर्ष समोर आले की गावातील प्रत्येकाला प्रत्येकजण नावानिशी ओळखत असतो.

भविष्य वर्तवणार्‍यांना आव्हान....इत्यादि...इत्यादि

लेखक जयंत कुलकर्णी यांनी मंगळवार, 09/08/2011 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आपल्या येथील एका सदस्यांनी त्यांची सतत हेटाळणी होत आहे या समजामुळे ज्योतिष्यशास्त्रासाठी आव्हान स्विकारले आहे. त्यासाठी त्यांनी काही फीही आकारायची ठरवले आहे व ती परत मिळणार नाही असेही जाहीर केले आहे. त्याचे कारण त्यांनी त्यांना या सगळ्यासाठी कष्ट करावे लागणार आहेत त्यासाठी ते पैसे त्यांना मिळाले पाहिजेत असे जाहीर केले गेले आहे. एक गोष्ट त्यांनी लक्षात घेतलेली दिसत नाही ती ही की हे कार्य कोणाच्या घरचे नसून या शास्त्राचा खरेखोटेपणा सिद्ध करण्यासाठी आहे. त्यात त्यांच्या विरूद्ध दंड थोपटून उभे रहायचे कोणाला वैयक्तिक कारण असेल असे मला वाटत नाही.

सौंदर्याचा बाजार

लेखक डॉ.श्रीराम दिवटे यांनी मंगळवार, 09/08/2011 09:54 या दिवशी प्रकाशित केले.
नटांच्या सिक्स पॅकअॅब्जचे प्रदर्शन असू द्या किंवा नट्यांच्या पुष्ट उरोजांचे अर्धावृत्त दर्शन आजच्या चित्रपटातील हा मसाला भलताच चटकदार बनविला जातोय. याची चटक डोळ्यांना अशी लागते की कुठून कुठून लौल्यस्राव सुरु होतील याचा नेम नाही. सेन्सार मंडळच नेमके आतपर्यंत कोरडे ठणठणीत पडलेय की काय याची शंका येते. अशा उत्तान दृश्याला ते कात्री लावण्याच्या भानगडीत पडत नाहीत की त्यांच्या अनेक भानगडींतून त्यांना वेळ मिळत नाही याचा शोध घ्यावा लागेल. आजच्या चित्रपटसृष्टीला अश्लीलतेचे एवढे मोठे खग्रास ग्रहण लागलेय की ते सुटता सुटण्याची शक्यता मावळलीय.

महिमा अंगठीचा

लेखक चेतन सुभाष गुगळे यांनी शुक्रवार, 05/08/2011 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
मला ओळखणार्‍या मंडळींना लेखाचे शीर्षक वाचून नक्कीच आश्चर्य वाटले असणार. म्हणजे मी काही कोणी फार प्रसिद्ध व्यक्ति आहे आणि अनेक लोक मला ओळखतात असा काही माझा दावा नाही पण माझ्या वर्तूळातले जे काही थोडे फार (किंवा खरं तर फार थोडे) लोक मला ओळखतात, माझे विचार जाणून आहेत त्या सर्वांना हे चांगलेच ठाऊक आहे की मी नास्तिक आहे. त्यामुळे अंगठीच्या वापराने भाग्य उजळेल असं तर मी निश्चितच सांगणार नाहीय. त्याशिवाय दागिन्यांच्या वापराला देखील माझा नेहमीच विरोध असतो व तो मी वेळोवेळी खासगीत तसेच जाहीरपणेदेखील प्रदर्शित केलाय.

टिळकांचे स्मरण.... एका वेगळ्या पद्धतीने..

लेखक जयंत कुलकर्णी यांनी सोमवार, 01/08/2011 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रांनो, अल्बर्ट स्पिअर जरा बाजूला ठेवून....................... टिळकांच्या निधनानंतर "इंदूप्रकाश" ने एक खास टिळक गौरव अंक काढला होता. ९० वर्षे जूना..तो माझ्याकडे आहे. आता जवळजवळ जीर्ण झाला आहे. त्यातील काही पानांचे फोटो आपल्यासाठी देत आहे. प्रकाशकाचे दोन शब्द जरूर वाचावेत व वादातील दुष्मनी कशी निभवावी हे पण शिकावे म्हणून हा प्रपंच केला आहे तसेच मराठाच्या एका अंकाचे मूखपृष्ठाचे पण देत आहे.