Skip to main content

लेख

.(नेत्रपटलावरील चित्रांवेगळे)

लेखक राजेश घासकडवी यांनी बुधवार, 16/11/2011 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
शब्द म्हणजे चिह्न - जगाचं ज्ञान करून घेण्यासाठी वापरलं जाणारं. ते कधी पांढऱ्यावर काळ्या रेषा म्हणून येतं, तर हवेत उमटणाऱ्या ध्वनिलहरींतून जाणवतं. पण जग जाणण्यासाठी आपण केवळ शब्दच वापरत नाही. चित्रंही वापरतो. कोणीतरी म्हटलं आहे की एक चित्र हजारो शब्दांइतकं महत्त्वाचं असतं. आपण प्रत्येकच अशी चित्रं वापरतो. ती वारंवार आपल्या नेत्रपटलावर उमटत असतात. म्हणून मी यशवंत कुलकर्णी यांच्या लेखात 'शब्द' या शब्दाच्या जागी 'नेत्रपटलावरील चित्र' वापरून हा लेख लिहिलेला आहे. खरं तर त्यांचाच सल्ला वापरून मी त्यांचा लेख अधिक व्यापक केला आहे असं म्हणता येईल.

बी.रघुनाथ- एक काव्यप्रवास

लेखक विनीता देशपांडे यांनी सोमवार, 07/11/2011 13:43 या दिवशी प्रकाशित केले.
बी.रघुनाथ-एक काव्यप्रवास आधुनिक काव्यप्रवाहातील एक अभिनव कवि म्हणजे बी.रघुनाथ. कथा,काव्य आणि कादंबरी हे तीनही साहित्यप्रकार त्यांनी समर्थपणे हाताळलेत. बी.रघुनाथ यांनी सन १९३० पासून अर्थात वयाच्या सतराव्या वर्षापासून साहित्य लेखनास प्रारंभ केला.त्यांची पहिली कविता हैद्राबाद येथिल "राजहंस" या मासिकात फुलारी या टोपण नावाने प्रसिध्द झाली.

देवगंधर्व पं. भास्करबुवा बखले - एक कृतज्ञता

लेखक gaikiakash यांनी शनिवार, 05/11/2011 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी- १४२ वर्षापूर्वी संगीताताल चमत्कार गायनाचार्य भास्करबुवा बखले ह्यांचा जन्म झाला. त्यानिमित्ताने त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी एक लेख लॉस एन्जेलिस येथील साहित्यिक श्री. शशिकांत पानट ह्यांनी लिहिला तो आपल्याला वाचायला आवडेल असे वाटले म्हणून पाठवित आहे. त्यांची पूर्व-परवानगी घेउन हा लेख "मिसळपाव" वर प्रकाशित करीत आहे.

सात अब्ज

लेखक विकास यांनी बुधवार, 02/11/2011 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
१८०० च्या दशकात जगाची लोकसंख्या प्रथमच एक अब्जापर्यंत पोचली. १९२७ साली म्हणजे उण्यापुर्‍या शतका मधे ती दुप्पट अर्थात २ अब्ज झाली, साधारण सत्तर वर्षात, १९९८ साली ती सहा अब्ज इतकी झाली तर केवळ १३ वर्षांमध्ये ती आता ७ अब्ज इतकी झाली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या औपचारीक अंदाजाप्रमाणे कालच्या एकतीस ऑटोबरला जागतीक लोकसंख्या ही ७ अब्ज झाली! पण अमेरीकन लोकसंख्या मोजणी आयोगाप्रमाणे सात बिलीयन्स होण्यासाठी अजून चार-पाच महीन्यांचा अवधी आहे.

येद्या मुग्या

लेखक भास्कर केन्डे यांनी मंगळवार, 01/11/2011 23:01 या दिवशी प्रकाशित केले.
लोकमान्य टिळकांच्या झंझावाताने देश प्रेरीत झाल्याचा तो काळ होता. १९१७-१९१९ याकाळात कधितरी लोकमांन्यांचा मराठवाड्याचा दौरा होता. त्यात काही दिवस त्यांनी बीड जिल्ह्याला दिले. बीडजवळील महुज या गावी लोकांना मार्गदर्शन करुन टिळक लोकांशी संवाद साधत होते. त्या दरम्यात भारावलेले दोन तरुण त्यांच्या जवळ जाऊन त्यांच्याशी. त्या तरुणांची नावे येदू/यदुनाथ (आडणाव, बहुतेक खाडे) व मुग्या (याचे नाव खूप जणांना विचारले पण कुणी सांगू शकले नाही; आडनाव बहुतेक थोरात असावे). असे म्हणतात की भेटीत टिळकांनी या दोन रांगड्या तरुणांना शोषित-पिडीत समाजासाठी कार्य करायचा सल्ला दिला.

होमी जहांगीर भाभा

लेखक नरेंद्र गोळे यांनी रविवार, 30/10/2011 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
आज, ३० ऑक्टोंबर रोजी, होर्मसजी जहांगीर भाभा यांचा जन्मदिवस आहे. टाटा इन्स्टिट्यूट ऑफ फंडामेंटल रिसर्च आणि भाभा ऍटोमिक रिसर्च सेंटर यांसारख्या भारतातील अग्रगण्य संशोधन संस्थांचे ते संस्थापक होते. त्या संस्थांमध्ये आजही हा दिवस ’फाऊंडर्स डे’ म्हणून साजरा करण्याची प्रथा आहे. भाभांना भारतीय अणुऊर्जेचे जनक मानले जाते.

बंड्याची दिवाळी

लेखक अरुंधती यांनी शनिवार, 29/10/2011 17:56 या दिवशी प्रकाशित केले.
आजही नाक्यावर बंडू नेहमीसारखाच चकाट्या पिटत उभा होता. बंडोपंत उर्फ बंडूला मी तो नाकातला शेंबूड शर्टाच्या बाहीला पुसत गल्लीत लगोरी किंवा विटीदांडू खेळायचा तेव्हापासून ओळखते. गेल्या पाच - सहा वर्षांमध्ये बंडू खूप बदलला आहे. एका चांगल्या कंपनीत उत्तम पगाराची नोकरी, त्याच्या इतकेच शिकलेली व नोकरी करणारी बायको, नोकरीनिमित्ताने परदेशाची वारी, कंपनीच्या खर्चाने वेगवेगळ्या शहरांत व हॉलिडे होम्समध्ये घालवलेल्या सुट्ट्या यांनंतर ''हाच का तो आपला (जुना) बंडू'' असे म्हणण्याइतपत त्याने जोरदार मुसंडी मारली आहे. मात्र नाक्यावर उभे राहून टंगळमंगळ करत चकाट्या पिटायची त्याची जुनी खोड अद्याप गेलेली नाही.

गणपती.. एक असाही!

लेखक प्राजु यांनी शुक्रवार, 28/10/2011 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
तेव्हा आम्ही इचलकरंजीमध्ये दि. डेक्कन को-ऑप स्पिनिंग मिल इथे रहात होतो. बाबा तेव्हा दि. डेक्कन स्पिनिंग मिल मध्ये नोकरीला होते. डेक्कन मिल चा उल्लेख तेव्हा इचलकरंजीमध्ये 'डेक्कन' असाच व्हायचा. म्हणजे, 'तू कुठे राहतेस?' असं विचारलं की, 'डेक्कनला' इतकंच उत्तर पुरे व्हायचा. डेक्कन हा सीटीबस चा स्टॉप होता. तमाम टांगेवाल्यांसाठी घोडातळ(वाहनतळ तसं घोडा तळ) होता. म्हणजे डेक्कनला लोकं घेऊन आलेला टांगेवाला तिथे घोडा सोडून, त्याला चारापाणी वगैरे करायचा. तर असं हे डेक्कन. तेव्हा माझे तीन मामा इचलकरंजीतच रहात होते. काकाही गावभागात रहायचा. पण ही चुलत, मामे भावंडं 'उद्या डेक्कन ला येतो आम्ही' असं म्हणायची.