Skip to main content

लेख

पुस्तक परिचयः एक होता कार्व्हर-- विणा गवाणकर

लेखक सुजित जाधव यांनी मंगळवार, 12/07/2022 16:14 या दिवशी प्रकाशित केले.
एक होता कार्व्हर ही लेखिका विणा गवाणकर यांची १९८१ साली प्रकाशित झालेली पहिलीच कादंबरी.. अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय शास्त्रज्ञ जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांची ही जीवनगाथा... आपल्या आईवडिलांचे नीट तोंडही पाहू न शकलेल्या कार्व्हर यांची जीवनकहाणी जितकी आपल्याला भावनिक करते तितकीच ती प्रेरणा देऊन जाते. या पुस्तकात लेखिकेने कार्व्हर यांचे हलाखीचे बालपण, त्यांनी जगण्यासाठी व यशस्वी होण्यासाठी केलेली धडपड अतिशय सुरेख रित्या शब्दबद्ध केलेली आहे.. अमेरिकेतील मिझुरी राज्यातील 'डायमंड ग्रोव्ह' पाड्यावर मोझेस कार्व्हर नावाचा एक शेतकरी आपली पत्नी सुझन कार्व्हर सोबत रहायचा.

आठवणींच्या जंगलात

लेखक कर्नलतपस्वी यांनी शनिवार, 02/07/2022 15:15 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वरंग त्रेचाळीस वर्षापुर्वीची आठवण व अंतरजालावर उपलब्ध आसलेली माहीती एकत्र गुंफून धागा विणायचा प्रयत्न त्यामुळे कुठे कुठे विषयांतर झाले आहे.

मैत्री स्वत:शी- मैत्री सर्वांशी

लेखक मार्गी यांनी रविवार, 26/06/2022 20:11 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मैत्री संस्थेतल्या मित्रांसोबत भेट ✪ मैत्री = सामाजिक कामासाठी काही करणा-या मित्रांचा गट ✪ मैत्रीच्या उत्तराखंड पूराच्या वेळेच्या कामाच्या आठवणी ✪ मैत्री एक इनोव्हेटीव्ह मॉडेल ✪ दोन करामती आजींचं इनोव्हेशन ✪ सामाजिक कार्य म्हणजे त्याग- परिश्रम असंच असलं पाहिजे असं नाही ✪ आपण काय करू शकतो? सर्वांना नमस्कार. पुण्यामध्ये केंद्र असलेल्या "मैत्री" संस्थेच्या कामाला २५ वर्षं पूर्ण झाली. त्या निमित्ताने झालेल्या एका मेळाव्याला जाण्याचा योग आला. मैत्रीमधल्या जुन्या मित्रांना भेटता आलं. मैत्रीचं काम आणखी थोडं समजून घेता आलं.

विंबल्डनचे सेंटर कोर्ट

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 25/06/2022 19:44 या दिवशी प्रकाशित केले.
टेनिसविश्वातील सर्वांत मानाची ग्रँड स्लॅम स्पर्धा, विंबल्डन टेनिस स्पर्धा सालाबादप्रमाणे 27 जूनपासून सुरू होत आहे. लंडनजवळील ही विंबल्डननगरी टेनिसपटूंची पंढरी म्हणून ओळखले जाते. म्हणूनच या स्पर्धेत मानाच्या सेंटर कोर्टवर खेळण्याचे आणि अर्थातच विजयी होण्याचे प्रत्येक टेनिसपटूचे स्वप्न असते. या सेंटर कोर्टच्या उभारणीला 2022 मध्ये 100 वर्षे पूर्ण झाली आहेत. म्हणूनच यंदाच्या स्पर्धेच्या निमित्ताने या सेंटर कोर्टविषयी. विंबल्डन सुरू झाल्यावर काही वर्षांमध्येच स्पर्धेचा लौकीक वाढत गेला आणि त्यात सहभागी होणाऱ्या टेनिस स्पर्धकांची संख्याही वाढू लागली.

दिनेश कार्तिकची फिनिक्स भरारी...

लेखक सुजित जाधव यांनी गुरुवार, 23/06/2022 16:48 या दिवशी प्रकाशित केले.
फिनिक्स हा काल्पनिक पक्षी असला तरी त्याच्याप्रमाणे राखेतून नवी भरारी घेणारे काही लोक प्रत्यक्षात असतात. दिनेश कार्तिक हा क्रिकेट जगतातील नवा फिनिक्स आहे. १ डिसेंबर २००६… जोहान्सबर्गमध्ये भारत विरुद्व दक्षिण आफ्रिका टी-२० सामना सुरु होता. हा आंतराष्ट्रीय क्रिकेट मधील भारताचा पहिला टी-२० सामना होता. सचिन, सेहवाग, झहीर, आगरकर, हरभजन असे खेळाडू त्या संघात होते. आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर २० षटकांत १२७ धावांचे लक्ष्य ठेवले. चांगली सुरवात मिळूनही मधल्या षटकांत भारताचा डाव ढासळला. दिनेश मोंगिया आणि दिनेश कार्तिकने चांगली फलंदाजी करून भारताला तो सामना जिंकवून दिला.

पहिला पाऊस

लेखक VRINDA MOGHE यांनी गुरुवार, 09/06/2022 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
*पहिला पाऊस* नेहमीच्या दिमाखात तो अवतरलाच. किती दिवस हुलकावण्या देत होता. संध्याकाळी आकाशात पसरलेल्या संधिप्रकाशानेच तो येतोय हे कळवलं, हलक्या वा-यांच्या गार झुळूकांनीच हळुच कानात सांगितलं 'तो येतोच आहे लवकरच'.हळुहळू मेघ दाटून आले, वारा सुसाट झाला. आणि..आणि...*तो आला*. ढगांनी आता जोरात नगारे वाजवायला सुरूवात केली, विजांनीही टाळ्यांचा कडकडाट करत त्याचं स्वागत केलं..आणि भुईवरची माती तर..आनंदाने त्याच्या टपोरल्या थेंबांच्या गंधाने मोहभरीत होऊन..त्याचा गंध चहुकडे उधळीत सुटली, दिसेल त्याला त्या गंधाने वेडं करून टाकलं तिने.. अहाहा! सगळेच त्या मृद् गंधाने वेडावून गेले..धुंद झाले.

असे देश, अशी नावे !

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 06/06/2022 07:19 या दिवशी प्रकाशित केले.
संपूर्ण जगाचा नकाशा न्याहाळणे हा एक छान विरंगुळा असतो. आज अखेरीस जगभरात एकूण १९६ देश असून याव्यतिरिक्त ‘देशा’चा दर्जा न मिळालेली अनेक बेटे किंवा भूभाग आहेत. (देशांच्या एकूण संख्येबाबत १९५ ते २४९ असे विविध अंक जालावर वाचायला मिळतात; तूर्त तो विषय नाही). नकाशातून जगातले एखादे अपरिचित शहर शोधण्याचा खेळ शालेय जीवनात बऱ्यापैकी खेळला जातो. गेले काही महिने https://worldle.teuteuf.fr/ या संकेतस्थळावर ‘नकाशावरून देश ओळखा’ हा दैनंदिन खेळ सादर केला जातो. तो नियमित खेळत असताना बऱ्याच अपरिचित देशांचा परिचय झाला. त्यातल्या काहींची नावे कुतुहल चाळवणारी निघाली.

‘पंजाब मेल’

लेखक पराग१२२६३ यांनी शनिवार, 04/06/2022 09:20 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतील ‘छत्रपती शिवाजी महाराज (ट)’ आणि पंजाबमधील फिरोजपूर कँट यादरम्यान धावणारी ‘पंजाब मेल’ गेल्या 1 जूनला 110 वर्षांची झाली आहे. मुंबईहून ‘पंजाब मेल’ सुरू झाली त्या दिवसाची नक्की तारीख माहीत नाही. पण रेल्वेने ती तारीख 1 जून 1912 असेल असे गृहीत धरले आहे. स्वातंत्र्यपूर्व काळात ब्रिटनमधून भारतात आलेले अधिकारी आणि अन्य युरोपियन प्रवाशांसाठी ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती. त्यावेळी ती गाडी तत्कालीन ‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ (सध्याचे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस) ते अखंड भारताच्या वायव्य सीमांत प्रांताची राजधानी असलेल्या पेशावरपर्यंत धावत होती.

आम्ही स्टँडच्या पोरी

लेखक विजुभाऊ यांनी शुक्रवार, 03/06/2022 12:22 या दिवशी प्रकाशित केले.
पाच सहा वर्षे झाली असतील. सातार्‍याहून मुंबै ला यायचे होते. सातारा मुंबई थेट बस होती . रात्री साडे दहा ची वेळ असेल. दहा वाजताच बसस्टँडवर जाऊन पोहोचलो. बसच्या स्टँडच्या शेडमधे तुरळकच उतारू होते. अचानक तेथे एक बाई आली. वय वर्षे तीशीच्या आतच असेल.केस विस्कटलेले ,साडी अंगावर कोट. थंडी फारशी नव्हती तरीही तीने अंगावर ब्लेझर कोट घातला होता तीच्या कडे काही सामानही दिसत नव्हते. तीच्याकडे कोणाचे लक्ष्यही नव्हते. अचानक काहितरी गलबला ऐकू आला म्हणून चमकून पाहिले. तर ती बाइ मोठमोठ्याने कोणावर तरी भांडत ओरडत होती. काय समजलास काय रे स्वतःला. ह्या इथे दादागिरी नाय खपवून घेणार. मोठा असशील तर घरी.