Skip to main content

लेख

गाजरं

लेखक शिव कन्या यांनी शनिवार, 14/03/2015 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
रोम्यांटिक लोक याला मधाचं बोट म्हणतात. बिचारी छोटी मुले अन बालबुद्धीचे याला चोकलेट म्हणतात. आमच्यासारखी ओबडधोबड माणसं याला गाजरं म्हणतात. अशी गाजरं आपल्या अगलबगलेत, समोर, दूर, डोक्यावर लटकवत ठेवणारे चिक्कारजण असतात. हि गाजरं सर्व प्रकारची, सर्व आकाराची, सर्व प्रतीची असतात. हि गाजरं कधीही दिसत नाहीत. हाती लागणं तर दूरच! या गाजरांच्या मागे धावायला लावणारे तर कोपऱ्याकोपऱ्यात दबा धरून बसलेले असतात! या गाजरांची किमत आपण ठरवत नाही, पण मोजत राहतो. ...... काय काय देऊन? .....

पुण्यनगरी !

लेखक चिनार यांनी गुरुवार, 12/03/2015 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात नवीन होतो तेंव्हाची गोष्ट. मित्रासोबत कोथरूड डेपोपासून चांदणी चौकात जायचे होते. एका गृहस्थाला रस्ता विचारला. ते चांदणी चौकाकडे बोट दाखवून म्हणाले," तुम्ही इथून खाली जा." समोरचा रस्ता बघून मित्राने अतिशय निरागसपणे विचारले, "मामा, रस्ता तर वर चाललाय हो ! खाली कसं जायचं?" ते गृहस्थ चिडून म्हणाले," मला मामा बनवू नको. जायचं असेल तर जा मुकाट्याने" आम्हा दोघांनाही कळत नव्हतं की नेमकं काय चुकलं. प्रश्न की नातं ? काही दिवसांनी आमच्या रूमवर स्वयंपाक करायला येणाऱ्या 'मावशी' जरा उशीरा आल्या.

" The Original Love Story" ( Part 2)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:50 या दिवशी प्रकाशित केले.
" सुची भेटलेली ...... ? पुण्याला ..... ? " थोडावेळ विनू तसाच उभा होता गोंधळलेला , काहीच कळलं नाही त्याला , अचानक एक वीज कडाडली , तसा विनू दचकला . , " बापरे , किती मोठयाने वीज कडाडली , पडली असेल कूठेतरी नक्कीच . " विनू भानावर आला . " आपण फोन घेऊन कशाला उभे आहोत ? खरंच फोन आलेला की भास झाला ? " काहीच समजत नव्हतं. अश्यातच १० मिनिटं गेली , फोन काही वाजला नाही, " आपल्याला भासच झाला असणार ." असं बोलून तो पुन्हा बाल्कनीत आला. थोडयावेळाने पुन्हा फोन वाजला , " hello , ....... अरे आहेस का विनू . " , " हो .....

" The Original Love Story" (Part 1)"

लेखक विनित राजाराम धनावडे. यांनी गुरुवार, 12/03/2015 09:47 या दिवशी प्रकाशित केले.
" अरे .... विनू ?...... अजून घरी नाही गेलास ? ", " हो. निघतोच आहे सर आता.", " OK. पण लवकर घरी जा आणि सांभाळून जा.", "असं .. का सर ?", "अरे , बाहेर बघितलास का ? पाऊस सुरु होणार आहे म्हणून बोललो." "पाऊस ?.... आता ?" " कुठे हरवलेला असतोस कळत नाही. आज तारीख किती आहे माहित नाही वाटते ?", " नाही सर . खरंच नाही माहित ", "अरे माणसा, आज ७ तारीख, ७ जून . आज पावसाची सुरवात होते , एवढं तरी माहित आहे ना ? " त्यावर विनू काही बोललाच नाही. पुढे सर बोलले ," चल निघ लवकर . पाऊस बघ किती धरलाय, कधीही सुरवात होईल . छत्री आहे ना?. " पण विनू कुठेतरी दुसरीकडेच हरवला होता.

शाळा....!!!!

लेखक एक एकटा एकटाच यांनी बुधवार, 11/03/2015 10:25 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी बाल्कनीमध्ये उभा होतो.सहज म्हणून समोरच्या देशपांडेंच्या घरात लक्ष्य गेल.आज त्याच्या घरात बरीच गडबड ऐकू येत होती. काय तर म्हणे छोट्या प्रथमेशचा आज शाळेचा पहिला दिवस होता. घरात त्याच्याच तयारीची लगबग चालु असताना प्रथमेश मात्र अगदी तयार होउन दारात उभा होता. त्या दोन -सव्वा दोन फ़ुटी देहाची भारी गंमत चाललेली दिसत होती.

दोन कंडक्टर्स

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 11/03/2015 10:02 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईच्या आयुष्यात लोकल्स, बेस्टच्या बसेस, रिक्षा हा अविभाज्य घटक आहे. पब्लिक ट्रान्सपोर्ट इतका चांगला असल्यामुळेच मुंबईला दिवस रात्र काम करता येतं. कधी न झोपणारे शहर अशी बिरुदावली मिरवता येते. या सोयींच्या भरोशावरच मुंबई, ठाणे, रायगड अशा तीन जिल्ह्यांना व्यापणाऱ्या पट्ट्यात लोक घर आणि व्यवसाय निवडतात, रोज ये जा करतात. या सगळ्या सेवा पुरवणार्यांमध्ये सर्वात कठीण परिस्थिती असते ती बेस्टच्या कर्मचाऱ्यांची. कारण ट्राफिक जामचा सामना त्यांनाच रोज करावा लागतो. रिक्षावाल्यांना जसं हवं तेव्हा, हवं तेवढंच काम करण्याचं स्वातंत्र्य असतं, तसं त्यांना मिळत नाही.

वसाहत ते महाबलाढ्य राष्ट्र - ४

लेखक श्रीरंग_जोशी यांनी सोमवार, 09/03/2015 01:38 या दिवशी प्रकाशित केले.
यापूर्वीचे भाग - , , व्यवसायाने पूर्णवेळ सैनिक नसणाऱ्या बंडखोरांनी ब्रिटिश सत्तेविरुद्ध युद्ध सुरू तर केले होते पण ते जिंकणे फारच अवघड होते कारण त्या काळात ब्रिटिश सैन्य जगात सर्वोच्च स्थानावर होते. तरी पण काही घटकांमुळे ब्रिटिश सैन्याला तोंड देता येईल असे सामर्थ्य निर्माण झाले होते, हिंमत, नेतृत्व, लढताना आजवर न वापरल्या गेलेल्या रणनीती अन नव्याने बनलेली अमेरिकन अस्मिता.

गुटेनबर्ग

लेखक स्वाती दिनेश यांनी शनिवार, 07/03/2015 17:31 या दिवशी प्रकाशित केले.
. पुस्तकं वाचायला सर्वांनाच आवडतात पण आपल्याला ही पुस्तके कोणामुळे वाचता येणे शक्य झाले आहे हे मात्र बर्याच जणांना माहित नसते. त्याच कलंदर अवलियाची ही ओळख! १५व्या शतकाचा सुरुवातीचा काळ! र्‍हाइन आणि माइन नद्यांच्या संगमावर वसलेलं छोटंसं टुमदार गाव, 'माइन्झ'! फ्रिडरिश ( फ्रिलं) ग्लेन्सफ्लाइश आणि एल्स वायरीश हे सोनारकाम करणारे दांपत्य तिथं सुखानं नांदत होते. त्यांना तीन मुले फ्रिलं (ज्यु), एल्स (ज्यु) आणि सगळ्यात धाकटा योहानेस (योहान)!

दिगंबर - फसलेला संन्याशी अन थकलेला संसारी

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 06/03/2015 22:24 या दिवशी प्रकाशित केले.
'स्वामी दया करा. आता या वयात हे करायला सांगू नकात. कळत नव्हतं, तेव्हापासून तुमच्या पंखाखाली घेतलंत मला! चार चांगल्या गोष्टी शिकवल्या! ब्राह्मण नव्हतो तरी, संध्या शिकावलीत. येत नव्हतं तरी, घासून पुसून संस्कृत शिकवलेत. चार घरी अनवाणी पायांनी भिक्षा मागायला शिकवलीत. प्रसंगी, स्वतः रांधून एकटच जेवायला शिकवलंत. स्वामी, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलंत, पण आता हे करायला सांगू नकात! तुम्ही युगांडात म्हणालात, मी युगांडात गेलो. तुम्ही रवांडात म्हणालात, मी रवांडात गेलो. तुम्ही टांझानियात म्हणालात, मी तिथेही गेलो. तुम्ही पोरांना शिकव म्हणालात, मी शिकवलं. तुम्ही आजार्यांची सेवा कर म्हणालात, मी केली. तुम्ही '

धुळवड

लेखक bharatm यांनी गुरुवार, 05/03/2015 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
गणेशचतुर्थी प्रमाणेच कोकणातील आणखी एक मोठा आणि जल्लोषात साजरा होणारा सण म्हणजे 'होळी'. थंडीचे दिवस संपत आल्यावर कोकणी माणसाला शिमग्याची ओढ लागते. 'होळी' या शहरी शब्दापेक्षा 'शिमगा' हा शब्दच कोकणच्या मातीला जुळून जातो. एकंदरीत कोकणापेक्षा तळकोकणातील शिमग्याची प्रथा थोडीशी वेगळी आहे. फाल्गुन पोर्णिमेपासून चालू होणारा हा सण तळकोकणामध्ये साधारणता ५, ७ किंवा ९ दिवस चालतो. पोर्णिमे दिवशी घरोघरी गोड जेवण बनवले जाते. पुरण पोळ्या किंवा शिरवाळे आणि गोड रस हे जेवणाचे पदार्थ असतात. म्हणूनच त्याला 'होळी रे होळी पुरणाची पोळी' असेही म्हटले जाते. शहरामध्ये रंगपंचमी असते तर कोकणातल्या लोकांची 'धुळवड' असते.