Skip to main content

लेख

सेनापती - (कथा)

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 31/08/2015 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
संध्याकाळचे साडेपाच वाजले होते . श्री. रायचंद घाईघाईने मीटींगरुममधुन बाहेर पडले आणी आपल्या केबिनकडे जाउ लागले . दिवसभरातील उरलेली कामे संपवून सहा वाजेपर्यंत घरी निघायचे असा त्यांचा बेत होता . रायचंद हे शहरातील एका नावाजलेल्या जुनीअर कॉलेजमध्ये अ‍ॅडमिनीस्ट्रेशन विभागाचे प्रमुख होते . काही वर्षांपासुन कॉलेजमधील नवीन अ‍ॅडमिशनसची धुराही तेच सांभाळत होते. कॉलेजच्या संचालकांची त्यांच्यावर विशेष मर्जी असल्यामुळे , कॉलेजचे प्राचार्यसुद्धा त्यांच्याशी दबकुन , नरमाईने वागत असत .

अस्तित्व - ( कथा )

लेखक सिरुसेरि यांनी रविवार, 30/08/2015 01:28 या दिवशी प्रकाशित केले.
अमोल नुकताच प्राथमिक शाळेतून माध्यमिक शाळेत जाऊ लागला होता. नवीन शाळा, नवे वातावरण, नवे विषय व या विषयांचा वाढलेला आवाका अशा बदलांना सामोरे गेल्यामुळे अमोलची अभ्यासात बरीच तारांबळ उडत होती. काही महिन्यांतच त्याच्या शिक्षकांच्या दृष्टीने त्याची 'फार हुशार / अभ्यासूही नाही व फार दंगेखोरही नाही' अशा मध्यम विद्यार्थ्यांमध्ये गणना होऊ लागली. अमोलनेही स्वतःची तीच समजूत करून घेतली व तो आला दिवस ढकलू लागला. एकदा त्यांच्या गणिताच्या शिक्षकांनी सर्वांना २० गणिते सोडवायचा गृहपाठ दिला. घरी आल्यावर अमोलने त्यांतली १५ गणिते सोडविली. पुढची ५ गणिते जरा अवघड होती. ती त्याला लगेचच सुटेनात.

अजब महाभारत

लेखक चित्रगुप्त यांनी शनिवार, 29/08/2015 23:57 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, सध्या मिपावर महाभारताविषयी पुन्हा एकदा चर्चा घडून येत आहे. मी गेल्या दोन-तीन वर्षात महाभारतावर जे (सचित्र) लेख लिहिले, त्यांचे दुवे (विशेषतः मिपाच्या नवीन सदस्यांसाठी) देतो आहे. 'अजब महाभारत' हे शीर्षक माझ्या लेखात मांडल्या गेलेल्या आगळ्या-वेगळ्या दृष्टीकोनाला अनुलक्षून दिले आहे. वाचा आणि सांगा तुम्हाला काय वाटले ते. १. कुणी घडवून आणले 'महाभारत'? (महाभारत भाग १) २. मत्स्यगंधेची प्रतिज्ञा ( महाभारत भाग २) ३.

"गाथनी होयेत गेsss?"

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी गुरुवार, 27/08/2015 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
"मला समजलं. तुझ्या डोक्यावरचे केस गेले, तरी तुझा स्वभाव होता तसाच आहे. चल, हातपाय धूवून ये. आपण जेवू या".. इती भाग्यश्री. चेरापुंजीनंतर मला वाटतं कोकणातच इतका पाऊस पडत असावा. कोकणातला पाऊस ज्यांनी पाहिलाय त्यांना मी काय म्हणतो ते कळायला वेळ लागणार नाही. काळाकभिन्न काळोख, काळेकुट्ट ढग, आभाळ आणून दिवस असला तरी घरातले दिवे लावायला भाग पडायचं. त्यातच विजांचा चमचमाट आणि वीज पडल्यावर होणारा कानठळ्य़ा बसणारा कडकडाट. घरातली लहान मुलं तर घाबरून जायची आणि अगदीच लहान असतील तर रडायचीसुद्धा. मला स्वतःला मात्र अशा पावसाच्या दिवसात कोकणात जायला आवडतं.

परीकथा २ - (सव्वा ते दीड वर्ष) (facebook status)

लेखक तुमचा अभिषेक यांनी गुरुवार, 27/08/2015 00:03 या दिवशी प्रकाशित केले.
... परीकथेचे सव्वा वर्ष .. - http://misalpav.com/node/32062 ..... २० जुलै २०१५ लहान मुले खरंच किती निरागस असतात.. जिथे गल्ली क्रिकेटमध्ये सारे जण बॅटींगसाठी मरत असतात, फिल्डींग करतानाही आपली बॅटींग कधी येणार याचीच वाट बघत असतात, अगदी टॉसही जिथे कोणाची बॅटींग पहिली असणार, हे ठरवण्यासाठीच उडवला जातो, तिथे आमची परी बॅट पप्पांच्या हातात देते आणि स्वत: बॉलिंग टाकायला धावते. खरंच., लहान मुले किती निरागस असतात :) . . २२ जुलै २०१५ कधी तिला शांत करणे अशक्य होते, तेव्हा शेवटचा मार्ग म्हणून आम्ही तिला जेली देण्याची लालुच दाखवतो.

फिरकी

लेखक जव्हेरगंज यांनी बुधवार, 26/08/2015 19:56 या दिवशी प्रकाशित केले.
23 मार्च, 1994 रोजी वैद्यकीय तज्ञाने रोनाल्ड चे शरीर पाहिले त्याच्या डोक्यात एक बंदूकीची गोळी आढळली आणि त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा निष्कर्ष काढला. नंतर तपासात आढळून आले की रोनाल्डने आत्महत्येच्या इराद्याने दहा मजली इमारतीवरून उडी मारली होती (त्याने एक चिठ्ठीही तशी सोडली होती ) . तो खाली येत असताना वाटेत 9 मजल्यावर खिडकीतून एका बंदूकीच्या गोळीने त्याच्या डोक्याचा वेध घेतला.

तुलनेचा तराजू

लेखक निमिष सोनार यांनी बुधवार, 26/08/2015 11:55 या दिवशी प्रकाशित केले.
सततची आणि अंधपणे केलेली स्वतःची इतरांशी आणि इतरांच्या जीवनाशी केलेली तुलना द्वेषाचे आणि नाशाचे कारण बनते. आपण इतर दोन व्यक्तींमध्ये केलेली तुलना सुद्धा हेवा आणि लोभाला जन्म देते आणि त्या दोघांचीही अधोगती करवते. तुलनेमुळे स्वतःचे दोष आणि इतरांचे गुण आपल्याला दिसत नाहीत. तुलना केल्याने आपण स्वतःचा वेगळेपणा आणि स्वतंत्र अस्तित्व नकळत नाकारत असतो. तुलना ही नेहेमी हक्काची केली जाते पण कर्तव्याची आणि कर्तृत्वाची केली जात नाही. इतरांपेक्षा मी कसा चांगला होईन, इतरांपेक्षा मी स्वतःच्या स्वभावात जास्त बदल कसा घडवेल अशी तुलना दुर्दैवाने होत नाही.

[स्पर्धेसाठी नाही] - शतशब्दकथा (सिक्वेल) : गणू नाटयस्पर्धा गाजवतो.

लेखक बबन ताम्बे यांनी सोमवार, 24/08/2015 18:45 या दिवशी प्रकाशित केले.
भाग पहीला : गणू "आई, मी शाळेत जाणार नाय" गणू रडत सांगत होता."पोरं मला जाडया जाडया चिडवत्यात. आणखीन मी आन समोरची सरस्वती जोडीनी शाळेत निघालो का पोरं गण्या गणपती ढेर चमकती गण्याची बायकू सरस्वती असं वरडत्यात." "बरं मी सांगते गुर्जींना पोरांना सांगायला." गणूची आई. "पण मीच का जाड? " "ते देवाच्या हातात असतं बाळा.” आईनी गणूची कशीबशी समजूत काढली. संध्याकाळी गणू आनंदाने ओरडतच घरी आला. "आई, पुण्याला बाल नाटय स्पर्धा हाये. गुर्जी म्हंटले आपल्याला तब्येतवान राजा पायजे. आख्ख्या वर्गात माझीच निवड झाली.” "अरे वा!

समाप्त...

लेखक अर्थहीन यांनी सोमवार, 24/08/2015 13:26 या दिवशी प्रकाशित केले.
---------------------समाप्त----------------------- दोघं नव्वीत गेलेत. ती त्याच्याच शाळेत जाते. तो सायकलवर- ती चालत. तिचे वडील साखर कारखान्याच्या गव्हानीत जीव धोक्यात घालून कोयत्याने ऊसाच्या मोळया तोडायचं काम करतात. दिवसाला 50 रुपये. ---म्हणून ती शाळेत चालत जाते. त्याचे वडील त्याच कारखान्यात अकाउंट ऑफिसमधे बऱ्याच पगारावर आहेत. ---म्हणून तो शाळेत सायकलवर जाऊ शकतो. ही पूर्ण गोष्ट -म्हटलं तर खुप टिपिकल आहे. म्हटलं तर घायाळी. तिला तो कमाल आवडतो. पण तिचा चेहरा खुप तेलकट आहे. काळ्या रंगावरचा तेलकट चेहरा खुप विचित्र दिसतो. चिपचिपा.

दस रुपय

लेखक सिध्दार्थ यांनी रविवार, 23/08/2015 16:38 या दिवशी प्रकाशित केले.
शतशब्दकथा स्पर्धेत मी देखील एक कथा दिली होती. त्या कथेचा पुढचा भाग शतशब्दकथा रुपात न देता संपूर्ण कथा हिते देत आहे. >>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>>> सन 1975 च्या आसपासचा काळ संध्याकाळची ७ वाजेच्या आसपासची वेळ होती. अंधार पडू लागला होता. तिने गुरांना गावाकडे नेण्यास सुरुवात केली.