Skip to main content

लेख

पांडूबाबा.

लेखक Deepak Pawar यांनी गुरुवार, 23/03/2023 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
पांडूबाबा आमच्या वाडीतील सगळ्यात जुना माणूस. जुना म्हणजे इतका जुना कि त्याच्यासमोरची लहान लहान मुलं आता म्हातारी झालेली. हाता-पायाची कातडी लोंबू लागलेली, दातांनी तोंडाचा केव्हांच निरोप घेतलेला. त्यामुळे गालाला जिथे खळी पडते, तिथं खड्डा पडलेला. भाकर खाताना सुद्धा त्याला डाळीत कुसकरून खावी लागायची. एकदा मी सहज त्याला विचारलं," बाबा, तुझं वय किती?" माझा प्रश्न ऐकून तो जरा विचारात पडल्यासारखा दिसला.

पर्वतावरचा पाषाण - बालकथा

लेखक चांदणे संदीप यांनी सोमवार, 20/03/2023 15:00 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वी एका पर्वताच्या माथ्यावर एक भलाथोरला पाषाण राहत होता. त्याच्या आजूबाजूला खूप हिरवळ, झाडे आणि वेली असल्यामुळे तिथले वातावरण नेहमीच प्रफुल्लित असायचे. वसंत ऋतूत तर तिथे कोवळ्या रानफुलांच्या ताटव्यांनी बहार यायची. तो पाषाण तिथल्या सर्व झाडवेली आणि फुलांशी मनमोकळ्या गप्पा मारायचा. त्या सर्वांची एकच भाषा होती, स्पर्शाची. असेच दिवस मजेत चालले होते. सर्वजण सुखाने आजूबाजूला नांदत होते. पण एकदा घडले असे की, त्या पर्वताच्या पायथ्याशी असलेल्या एका गावातून काही माणसे पर्वत चढून वर आली आणि त्यांनी त्या पाषाणाला उकरून वर काढला.

माझी आवडती पुस्तके भाग: २

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 19:24 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या सर्वात आवडत्या पाच पुस्तकांबद्दलचा हा माझा दुसरा लेख आहे.. पहिल्या भागात मी दोन पुस्तकांबद्दल लिहिलंय, या भागात उरलेल्या तीन पुस्तकांबद्दल लीहतोय. पहिल्या भागाचा दुवा: माझी आवडती पुस्तके भाग: १ ३. एक होता कार्व्हर: हे पुस्तक व जॉर्ज वाशिंग्टन कार्व्हर यांची करुण व हृदयाला भिडणारी कहाणी अनेकांना वाईट काळात प्रेरणा देते.

माझी आवडती पुस्तके भाग: १

लेखक सुजित जाधव यांनी सोमवार, 13/03/2023 17:17 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, परवा एका प्रश्न आणि उत्तर साईटवर तुमचे सर्वात आवडते पुस्तक कोणते? असा प्रश्न विचारला होता. त्यानिमित्ताने मी हा लेख लिहला होता. त्यामध्ये थोडेफार बदल करून तो मिपावर पोस्ट करतोय. तशी मी भरपूर पुस्तकं वाचली नाहीयेत पण फारच कमी वाचलीयेत असं पण नाही (अजुन बरीच पुस्तके वाचायची आहेत त्यामुळे मला स्वतःला नेहमी वाटत असतं की माझं वाचन अजुन खूपच कमी आहे.) आता त्या सगळ्या पुस्तकांमधून माझं सर्वात आवडत एकच पुस्तक निवडणं खूपच अवघड काम आहे.. खेळण्याच्या दुकानात सगळी आवडती खेळणी समोर पाहिल्यावर एखाद्या लहान मुलाची जी मनःस्थिती होते अगदी तशीच मनःस्थिती सर्वात आवडतं पुस्तक निवडताना माझीही होते.

सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ७: सिंदगी- गाणगापूर- कलबुर्गी (९० किमी)

लेखक मार्गी यांनी सोमवार, 06/03/2023 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
✪ मोहीमेतील महत्त्वाचा टप्पा ✪ हिरव्यागार निसर्गातील रस्ते ✪ भीमा आणि गाणगापूर ✪ अशी राईड = अपूर्व आनंद ✪ अशा प्रवासात आपली स्वत:सोबत होणारी खरी भेट ✪ कलबुर्गीमध्ये श्री बसवराजजींसोबत भेट ✪ ६ दिवसांमध्ये ५३८ किमी सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा १: प्रस्तावना सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा २: कुडाळ ते बिचोली (७२ किमी) सिंगल गेअर सायकलीवर ४ राज्यांमध्ये आनंदयात्रा ३: बिचोली- च

" जू "

लेखक देवू यांनी सोमवार, 06/03/2023 01:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रसंग १ सोसायटीतील एका वयस्कर सदस्याचे निधन झाले होते. पुरुष मंडळी अंत्यसंस्काराची तयारी करत असताना महिलांनी त्याच्या पत्नीला बाहेर आणले. तिची वेणी घातली, त्यात गजरा माळवला, हातात हिरवा चुडा भरून, कुंकू लावले. पतीच्या पार्थिवाच्या पाया पडल्यावर तिला पाटावर बसवले. बायकांमध्ये कुजबूज सुरु झाली. कोणीतरी शेजारील सोसायटीतील " नानींचे " नाव सुचवले. नानी आपले स्थूल शरीर सांभाळत गर्दीतून वाट काढत येत होत्या. त्यांना वाट करून दिली जात होती. नानींना आधार द्यायला दोघी तिघी पुढे सरसावल्या. त्यांना पुढे घेऊन येताना त्यातील एकजण नानींच्या कानात काहीतरी कुजबुजली . नानींनी मान डोलावली.

बंदूक भाग २

लेखक Deepak Pawar यांनी रविवार, 05/03/2023 21:32 या दिवशी प्रकाशित केले.
घरी आलो तर आईनं तोंडाचा पट्टा सुरु केला. " कुठं गेला होतास, तुला घर दार हाय कि नाय, उन्हा-तान्हातून दिवसभर उंडगत असतोस, थांब तुझ्या तंगड्याच तोडून ठेवता, जनमभर पोसायला झालं तरी चालल, डोक्याला ताप तरी राहणार नाय." ती बोलत असलेला एक शब्दही आपल्याला ऐकू येत नाही, अशा अविर्भावात मी हात पाय धुवून जेवायला बसलो. जेवण उरकल्यावर खाटेवर शहाण्या मुलासारखा बसून राहिलो. थोड्या वेळानं आईच लक्ष नसल्याचं पाहून सटकलो. संज्याच घर वाटेत असल्यानं, तो घरी आहे का पाहावं? म्हणून त्याच्याकडे गेलो, तर तो जेवायला बसलेला. ओट्यावर कुणीतरी पायापासून डोक्यापर्यंत अंगावर घेऊन झोपलं होतं.