Skip to main content

लेख

टायपो ( कथा )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 10/04/2017 20:32 या दिवशी प्रकाशित केले.
टायपो ( कथा ) ( काल्पनीक ) घनदाट जंगलांनी व्यापलेला अ‍ॅमॅझॉन खो-याचा विस्तीर्ण आणी तेवढाच दुर्गम भुभाग . या जंगलामधे अनेक नरभक्षक रानटी टोळ्या , जंगली हिंस्त्र श्वापदे यांचा कितीतरी शतकांपासुन वावर आहे . किवागो ही या रानटी टोळ्यांमधली एक शक्तीशाली जमात . किवागो योद्धे हे कायम आपल्या हद्दीच्या रक्षणासाठी विषारी तीरकामठे घेउन पहारा देत असत . कुणा इतर टोळीने येथे प्रवेश करायचा प्रयत्न जरी केला तरी त्यांची खैर नसे . किवागो योद्धयांच्या विषारी बाणांना ते एका क्षणात बळी पडत . दिवस संपुन हळुहळु अंधार पडु लागला होता . नेहमीप्रमाणेच किवागो योद्धे आपल्या हद्दीवर डोळ्यात तेल घालुन पहारा देत होते .

न्यूरेम्बर्ग - भाग २

लेखक अफगाण जलेबी यांनी रविवार, 09/04/2017 22:41 या दिवशी प्रकाशित केले.
न्यूरेम्बर्ग - भाग १ न्यूरेम्बर्ग - भाग २ खटला सुरु होण्याआधी काही गोष्टींचं स्पष्टीकरण अत्यंत आवश्यक होतं. मुख्य मुद्दा म्हणजे हा खटला चालणार कुठे? याचं सगळं कामकाज कसं होणार? कैद्यांना – ज्यांच्यातले काहीजण साक्षीदारही असणार होते – ठेवायचं कुठे? त्यांचं संरक्षण कसं करायचं? ज्या कोर्टरूममध्ये हा खटला चालणार होता ती कशी असेल? या सर्व कामकाजाची नोंद कशी ठेवायची?

शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमध्ये राणा शासनाचे शतक - नेपाळ भाग ८

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 07/04/2017 18:09 या दिवशी प्रकाशित केले.
शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमध्ये राणा शासनाचे शतक - नेपाळ भाग ८ श्री तीन राणाज्यूं को सरकार स्थिरस्थावर झाल्यानंतर नेपाळच्या सामान्यजनांचा बाहेरील जगाशी कमीत कमी संपर्क येईल याची काळजी घेण्यात आली - अपवाद नेपाळी उमराव आणि गोरखा सैन्याचा. सगळ्या नेपाळी सरदार-भारदारांच्या व्यक्तिगत सैन्य तुकड्यांना एका छत्राखाली आणून राणांनी आधी गोरखा सैन्यावर पूर्ण ताबा मिळवला. म्हणून खऱ्या अर्थाने एकजिनसी 'रॉयल नेपाल आर्मी' स्थापण्याचे श्रेय राणा शासकांचे. सुगौलीच्या तहानंतर (वाचा- नेपाळ भाग ५) काठमांडूच्या दरबारात ब्रिटिश प्रतिनिधीची नियुक्ती घडून आली होती.

मोगरा फुलला !!!

लेखक विद्या चिकणे मांढरे यांनी गुरुवार, 06/04/2017 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
ज्या रस्त्यावरून आपण गेली कित्येक वर्ष सायकल किंवा बसने जायचो, त्याच रस्त्यावरून आज चारचाकी गाडीतून जाताना स्वातीला एकदम भारी वाटत होतं. तोच रस्ता, तिच झाडं, अन तिच घरं ,पण आज सगळं कसं छान वाटत होतं. त्यात शिरीषची आठवण होतीच साथ द्यायला. शिरीषच्या आठवणीने अंगभर मोहरत होती आणि स्वतःशीच हसत होती. हळदीने पिवळ्या झालेल्या हातावरच्या मेहंदीमध्ये त्याचच नाव शोधत होती. सकाळी माहेरी यायला निघाली तेव्हाची त्याची साखरमिठी अजून ताजीच तर होती. ती इथे आणि मन तिथे, अशी तिची अवस्था झाली होती. गाडी गावच्या वेशीतून आत शिरली आणि आधीच ठरल्याप्रमाणे ड्राईवरने गाडी शाळेच्या गेटवर थांबवली.

अज्ञानाच्या गोष्टी..

लेखक चिनार यांनी गुरुवार, 06/04/2017 12:26 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेत असतानाची गोष्ट ! म्हणजे कोऱ्या पाटीवर अज्ञानाचे धडे नुकतेच गिरवायला सुरवात केली होती तेंव्हाची! बाईंनी वर्गात प्रश्न विचारला, "जगातील सर्वात थंड पदार्थ कुठला?" माझ्यासहित वर्गातले नव्वद टक्के हात वरती झाले. एरवी माझा हात दिसला नसता, पण आज दिसला. "तू सांग" "बाई....बर्फ !!" "वाटलंच मला..मूर्ख आहेस तू! बर्फ कितीही थंड असला तरी तो आतून उष्ण असतो" माझ्या नजरेसमोर हिमालयातले पर्वत धडाधड कोसळू लागले. माझ्याच काय सर्वांच्याच ! कारण मी एक प्रातिनिधिक मूर्ख होतो.वरती झालेल्या शंभर टक्के हातांच उत्तर तेच होतं. बर्फ आतून उष्ण असतो??? आणि आतून म्हणजे कुठून??

आहात का तुम्ही रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते...

लेखक अक्षय दुधाळ यांनी गुरुवार, 06/04/2017 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
आहात का तुम्ही रेंजमध्ये जेव्हा तुम्हाला रेंज नसते...हल्ली स्मार्टफोन्स मुळे आपलं आयुष्य स्मार्ट झालय. अनेक सोशल नेटवर्किंग साइटस आलेत आपल्या रोजच्या आयुष्यात खळबळ माजवायला. घरातून निघाल्यापासून आपण अपडेट होतोय. आगदी traffic मध्ये अडकलो की 'Sick in traffic' किंवा 'Filling hungry with....''कुठे आहेस' पासून 'कुठे पर्यंत पोचलास' 'तिकिट कांउटर जवळ ये' 'गेटवर थांब ' समोरची व्यक्ती पुढे येऊन थांबे पर्यंत आपलं चालू आसतं.

मोसाद - भाग १४

लेखक बोका-ए-आझम यांनी बुधवार, 05/04/2017 00:29 या दिवशी प्रकाशित केले.
मोसाद - भाग १३ मोसाद भाग १४ १९८० चं दशक हे जागतिक राजकारणात आणि अर्थकारणात मोठी उलथापालथ घडवणारं होतं. सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे सत्तरीच्या दशकातले राजकीय नेते या दशकाच्या सुरुवातीला अंतर्धान पावले. १९७९ मध्ये इराणमध्ये घडून आलेल्या इस्लामिक क्रांतीमुळे आणि ज्या पद्धतीने अमेरिकन सरकारने ते संपूर्ण प्रकरण हाताळलं त्यामुळे जिमी कार्टर यांच्या डेमोक्रॅटिक पक्षाबद्दल अमेरिकेत असंतोष होता. तो जनतेने रोनाल्ड रीगन यांना निवडून देऊन दाखवून दिला. ब्रिटनमध्येही सततचे संप आणि हरताळ यांच्यामुळे लोकांमध्ये असंतोष खदखदत होता.

असावीस पास ....

लेखक अद्द्या यांनी मंगळवार, 04/04/2017 17:41 या दिवशी प्रकाशित केले.
असावीस पास , जसा स्वप्न भास जिवॆ कासावीस झाल्याविना . संदीप खरेंच्या अनेक डोक्याला त्रास देणाऱ्या कवितांपैकी हि एक .आणि किती काही वाटलं तरी प्लेलिस्ट मधून जात नाही हि . रात्री हे गाणं ऐकत पडलो होतो . सुंदर गाणं . तशीच झोप लागली होती सकाळी ५.३० वाजता फोन वाजला . unknown number . इतक्या पहाटे कोण हा XXXX म्हणत फोन उचलून जवळपास ओरडलो. "वेळ काळ काही आहे कि नाही. ९ नंतर फोन कर. माणसं झोपेत असतात या वेळी .. " समोरून आवाज आला . थोडा घाबरलेला. तरी हि खुदखुदत " ए बाबा , तुझी चिडचिड कधी कमी होणारे रे. किती तापटपणा तो . बीपी वाढून फुटशील एक दिवस .

द अंडरटेकर रिटायर्स

लेखक वेल्लाभट यांनी मंगळवार, 04/04/2017 15:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी एकीकडे किशोरी ताईंच्या निधनाची बातमी वाचली आणि दुसरीकडे अंडरटेकर पुन्हा कधीच रिंगमधे येणार नसल्याची. किशोरी ताई निवर्तल्या, अंडरटेकर निवृत्त झाला. एकीकडे सूर, तर दुसरीकडे WWE मधला असुर. इकडे सम, तर तिकडे दम. दोनही गोष्टी 'आता पुन्हा नाहीत' हे मात्र साम्य होतं. कदाचित बरेच जण रेस्लिंग किंवा WWE बघणारे नसतील, पण अंडरटेकर हे नाव तरीही त्यांनी ऐकलेलं असेल. कारण त्याचा करिश्माच तसा होता.

दोघी ( कथा ) ( काल्पनीक )

लेखक सिरुसेरि यांनी सोमवार, 03/04/2017 20:30 या दिवशी प्रकाशित केले.
दोघी ( कथा ) ( काल्पनीक ) चिनु आज खुप खुशीत होती . बरेच दिवसांनंतर ती आपल्या आईबरोबर समुद्र किनारी फिरायला आली होती . संध्याकाळच्या गार हवेत समोरुन येणा-या लाटांचे थेंब अंगावर झेलण्यात दोघींनाही मजा येत होती . समुद्र किनारी फारशी गर्दी नव्हती . त्यामुळे मधेच लहर आली म्हणुन चिनु एखाद्या स्वच्छंद हरणासारखी काठावरच्या वाळुत इकडुन तिकडे धावु लागली . तिच्या मागे पळताना , तिला आवरताना आईची मात्र दमछाक होउ लागली . "चिनु ...थांब .. किती पळतेस?.. जरा हळु... पडशील कुठे तरी .. " आई काळजीने म्हणाली . तेव्हा कुठे चिनु थांबली .