Skip to main content

लेख

पहिला पाऊस- एक आठवण

लेखक एक प्रेमवेडा यांनी रविवार, 25/06/2017 16:13 या दिवशी प्रकाशित केले.
"लगी आज सावन की फिर वो झड़ी है। वही आग सीने में फिर जल पड़ी है। कुछ ऐसे ही दिन थे वो जब हम मिले थे।  चमन में नहीं फूल दिल में खिले थे। े वही तो है मौसम मगर रुत नहीं वो.. मेरे साथ बरसात भी रो पड़ी है।"          पाऊस येतो आठवणी घेऊन तिच्या सोबतीच्या. मनांत फुलवतो पुन्हा एक नाजूकसा धागा प्रितीचा..कुठं असेल बरं ती आज? तिलाही येत असेल का आठवण माझ्यासारखीच?..कदाचित..          पहिला पाऊस तिच्या सोबतीतला!.

कार्टूननामा-०१(1/2)

लेखक औरंगजेब यांनी शुक्रवार, 23/06/2017 16:19 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत वाह्यात , भयंकर वांड अशा शिनोसुके बद्दल मी तुम्हाला सांगणार आहे. ह्याचं वय आहे ५ वर्षे. हा जपानच्या कासुकाबे शहरात राहतो.  ह्याच्या आईच नांव मित्सी(मिसाई) आणी वडलांचे नांव हॕरी(हिरोशी). ह्याला एक धाकटी बहीण पण आहे , तिचं नाव हिमा(हिमावारी). तुम्ही आत्तापर्यंत ओळखलंच असेल की मी आपल्या लाडक्या शिनचॕनबद्दल लिहिलं आहे. ब-याच जणांच्या लहानपणच्या आठवणींचा बराचसा भाग ह्याने व्यापलेला आहे. ह्याच्या व्रात्यपणा मधे हसवण्याची कला दडलेली आहे.

मेन्युकार्ड - लघुकथा

लेखक प्रतिक कुलकर्णी यांनी गुरुवार, 22/06/2017 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
नवीन शहर, नवीन भाषा. सगळं नवीन होतं माझ्यासाठी. चारही बाजूला हजार मैलांपर्यंत कोणीही ओळखीचं नाही. मी रेल्वेमधून उतरलो. गर्दीच गर्दी होती. भरपूर लोक होते. कानावर पडणारी भाषा अगदीच वेगळी. सगळीकडे लिहिलेलं त्या वेगळ्या भाषेतच होतं.

शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १०

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 21/06/2017 17:55 या दिवशी प्रकाशित केले.
याआधीचे भाग येथे वाचता येतील : शेजाऱ्याचा डामाडुमा - नेपाळमधे मर्यादित लोकशाहीचा पहिला प्रयोग - नेपाळ भाग ९ शेजाऱ्याचा डामाडुमा - सद्यस्थिती, उपसंहार आणि काही रंजक-रोचक तथ्ये - नेपाळ भाग १० आशियात इतरत्र अनेक जागी आहे तसा नेपाळच्या लोकशाहीलाही अगदी स्थापनेपासूनच अस्थिरतेचा शाप आहे. १९५१ च्या पहिल्या लोकशाही सरकारपासून ते आज २०१७ पर्यंत काठमांडूमधील सिंघदरबारच्या भिंतींनी तब्बल ४६ वेळा पंतप्रधानपदाचे शपथ ग्रहण बघितले आहे. म्हणजे एका पंतप्रधानांचा कार्यकाळ साधारण १७ महिने!

मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 20/06/2017 22:17 या दिवशी प्रकाशित केले.
मोरनी बागा मा बोले आधी रात मा - कथा ( काल्पनीक ) ---- भाग १ "बाबा , आज शाळेच्या गॅदरींगमधे माझा पहिलाच सोलो परफॉर्मन्स आहे . " "गुड लक बेटा , छान परफॉर्म कर . " "मला खुप टेन्शन आलं आहे बाबा . माझा डान्स चांगला होईल ना ? " "डोन्ट वरी बेटा . तुझ्यावर रानीमांचा आशीर्वाद आहे . तुझा डान्स चांगलाच होईल ." रेल्वेच्या वाढलेल्या खडखडाटाने अचानक मयुराला जाग आली आणी तिचे स्वप्न मधेच तुटले . बहुतेक रेल्वे रुळांवरुन सांधे बदलत होती . तिने खिडकीतुन बाहेर पाहिले . बाहेर थोडे थोडे उजाडु लागले होते . तिचे उतरायचे ठिकाण थोड्याच वेळात येणार होते .

पहिला पाऊस

लेखक अमलताश यांनी सोमवार, 19/06/2017 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
सूर्य मावळून गेला आहे.. पाखरे घरट्याकडे परतत आहेत.. आजूबाजूचा भवताल दिवसभरात जणू भाजून निघाला आहे.. त्याचा खरपूस वास घेऊन वारा वाहतो आहे.. मी गच्चीवर उभा.. आजूबाजूला यंत्रयुगाची साक्ष देत उभ्या ठाकलेल्या कंपन्यांच्या चिमण्या.. झाडांचा, पर्यावरणाचा गळा घोटून उभं राहत असलेलं लोखंडी जंगल.. जून केव्हाचा सुरु झालाय.. कधी येणार पाऊस? ----------------------------------------------------------------------------------------------------------------- ...सुट्टीचा महिना सरत आला आहे.. लपाछपी च्या सगळ्या जुन्या जागा अन् या उन्हाळ्यात शोधून काढलेल्या नव्या जागा पालथ्या घालून झाल्या आहेत..

गूढ भाग २

लेखक ज्योति अळवणी यांनी सोमवार, 19/06/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ भाग १: http://www.misalpav.com/node/40024 भाग २ रात्री साधारण दहा साडेदहाच्या सुमाराला राजन चंद्र्भानच्या घरी पोहोचला. चंद्रभान त्याचीच वाट बघत होता. "खूप उशीर झाला रे तुला राजू? सध्या कसलं शूटिंग चालू आहे तुझ?" उगाच काहीतरी विचारायचं म्हा णून चंद्रभानने विचारल आणि राजनला बसायला सांगून तो बारच्या दिशेने वळला. "बर ते सांग सावकाश. अगोदर काय घेणार ते बोल. एक मस्त नवीन स्कॉच आणली आहे. नवीनच आहे; उघडतो. काय?" "नको भानू. तू बस बघू माझ्या शेजारी.

आठवणींच्या हिंदोळ्यावर! अर्थात, ये है मुंबई मेरी जान!

लेखक सचिन काळे यांनी रविवार, 18/06/2017 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
माझी बालपणीची पंचवीसएक वर्षे मुंबईत गेली. आता नोकरी आणि वास्तव्य उपनगरात असल्याने वाट वाकडी करून मुंबईत जाणे सहसा होत नाही. बऱ्याच वर्षांनी काल सकाळी काही कामानिमित्त कुर्ला ते कफ परेड येथे बसने दीड दोन तासाचा प्रवास करणे झाले. प्रवास मेनरोडवर सायन, दादर, भायखळा, सीएसटी असा सरळसोट होता. बसचा लांबचा प्रवास असल्याने मी मस्त खिडकितली जागा पटकावली होती. जसे सायन मागे पडले आणि माझ्या ओळखीची मुंबईतली जुनी ठिकाणे जसजशी दृष्टीस पडू लागली, तसतशा माझ्या त्यासंबंधीच्या सर्व जुन्या आठवणी उचंबळून येऊ लागल्या.

शिक्षणाच्या नावाने....चांगभलं!

लेखक चिनार यांनी शनिवार, 17/06/2017 17:51 या दिवशी प्रकाशित केले.
तसे मला बरेच प्रश्न नेहमीच पडतात. त्यातले काही विचारण्यासारखे असतात तर काही नसतात. काहींची उत्तरे असतात पण ती देण्यासारखी नसतात. आणि ज्यांची उत्तरे देण्यासारखी असतात ती मला समजण्यासारखी नसतात. म्हणूनच शेवटी मी आणि माझे प्रश्न आहेत तिथेच राहतात. मनाच्या समजुतीसाठी मी आपला "तुका म्हणे उगी राहावे अन जे जे होईल ते ते पाहावे" आणि "ठेविले अनंते तैसेची राहावे" या ओव्या गुणगुणत असतो. (आता तैसेची राहावे म्हणजे कैसेची राहावे हासुद्धा प्रश्न मला नेहमीच पडतो हा भाग वेगळा!) पण सध्या एक अजब प्रकार सुरु आहे. प्रश्नांचेसुद्धा सिक्वेल येत आहेत.

बकरी ने पैसे का खाल्ले ?

लेखक खट्याळ पाटिल यांनी शुक्रवार, 16/06/2017 17:46 या दिवशी प्रकाशित केले.
नोंद : लेखा चा हेतू फक्त मनोरंजन आणि हसवणूक आहे. लेख हा खऱ्या बातमीवर आधारित असला तरी, पूर्णतः काल्पनिक आहे. याचा कोणत्याही व्यक्ती किंवा घटनेशी काही संबंध नाही. . कृपा करून हि कथा स्वतःच्या नावाने दुसरी कडे छापू नये. copy-right संदर्भ : नुकतीच एक बातमी सर्वे पेपर मध्ये गाजत आहे कि एका बकरी ने शेतकऱ्याच्या ६२ हजारांच्या नोटा खाल्ल्या.