Skip to main content

लेख

रसायनांचा धुमाकूळ आणि कर्करोगाचा भस्मासुर

लेखक हेमंतकुमार यांनी रविवार, 03/12/2017 10:14 या दिवशी प्रकाशित केले.
ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू असतोच हे तर मूलभूत सत्य. पण हा मृत्यू निरोगी अवस्थेत शांत झोपेत किती जणांच्या वाट्याला येतो? फारच थोड्या. आयुष्यात मानवी शरीर हे कुठल्या ना कुठल्या रोगाची शिकार बनतेच. मग हा रोग शरीर पोखरत रुग्णास मृत्यूस नेतो. आज विविध रोगांमुळे होणाऱ्या मृत्युंमध्ये हृदयविकार हे आघाडीवर आहेत आणि त्याखालोखाल स्थान आहे ते कर्करोगाचे. सध्या जगभरात कर्करोगाने जवळपास ८० लाख लोक दरवर्षी मरण पावतात. हा आकडा दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. चालू शतक संपेपर्यंत बहुधा कर्करोग हा हृदयविकाराला मागे टाकून ते अव्वल स्थान पटकावेल अशी चिन्हे दिसताहेत. आपल्याला कर्करोग का होतो?

रोज रोज

लेखक सिरुसेरि यांनी शनिवार, 02/12/2017 23:11 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज -- कथा ( काल्पनीक ) "रोज़ रोज़ आँखोंतले एक ही सपना चले रात भर काजल जले .." हे गीत ऐकु आले आणी काहि वेळासाठी तिचे मन भुतकाळात हरवुन गेले . तिला तिचे कॉलेजचे सोनेरी दिवस डोळ्यांसमोर दिसु लागले . कॉलेजमधील मनमोकळे वातावरण , मित्र मैत्रिणींचा नवा जमलेला ग्रुप , रोजच्या रंगलेल्या गप्पा टप्पा , ग्रुपबरोबर त्या दिवसांत केलेली धमाल तिला परत एकदा आठवु लागली . या ग्रुपमधेच तिची त्याच्याशी पहिली ओळख झाली . ती एका साध्या , मध्यमवर्गातील घरातली . तर तो शहरातील एका श्रीमंत बिझनेसमनचा एकुलता एक मुलगा .

आजारी पडणे मना आहे!

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शुक्रवार, 01/12/2017 17:21 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे कोणत्याही माणसाला कोर्ट, पोलिस स्टेशन आणि रूग्णालयाची पायरी चढावी लागू नये, असे म्हटले जाते. जनमानसात अशा भितीदायक प्रतिमा तयार व्हायला त्या त्या क्षेत्रातली कठोर वागणूक जबाबदार असते. एखादा आजार उद्‍भवला तर रूग्णालयात जायचे म्हणून अशिक्षित लोकांच्याच नव्हे तर उच्चशिक्षित- सुशिक्षित लोकांच्याही अंगावर सर्रकन काटा येतो. आजाराचे निदान चुकीचे होईल वा आपण अतोनात लुबाडले जाऊ, हा समज या मागचे कारण असते. म्हणून अनेक लोक आपले दुखणे एकतर अंगावर काढतात वा स्वत:च डॉक्टर असल्यासारखे मेडिकल स्टोअर्समधून त्या त्या आजाराच्या गोळ्या मागवून घरी बरे होण्याचा प्रयत्न करतात.

न्याय झाला, पण...!

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी बुधवार, 29/11/2017 16:39 या दिवशी प्रकाशित केले.
न्याय झाला, पण..! मानवी क्रौर्याची परिसमा ओलांडणाऱ्या कोपर्डी बलात्कार आणि खून प्रकरणातील तिन्ही दोषींना आज न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे. कोपर्डी घटनेतील घृणास्पद विकृती आणि विक्षिप्तपणा बघितला तर या प्रकरणात फाशीशिवाय दुसरी शिक्षा योग्य नव्हती. अत्यंत निर्घृणपणे पीडित तरुणीवर बलात्कार करून तिची हत्या करण्यात आली होती. कोपर्डी अत्याचार प्रकरणानंतर संपूर्ण महाराष्ट्र पेटून उठला. कोपर्डीतील पिढीतला न्याय मिळावा यासाठी लाखो करोडो जनसंख्येचे महामोर्चे निघाले. दोषींना फासावर लटकविण्याची मागणी सर्व स्तरातून करण्यात आली.

आप्पा

लेखक चुकलामाकला यांनी बुधवार, 29/11/2017 14:42 या दिवशी प्रकाशित केले.
हुश्श करीत सगळ्यांनी एकदाची आप्पांची तिरडी खाली ठेवली. बबन्या लाकडं रचायला लागला. गावात धड रास्ता नव्हता. एवढ्या लांब कुणाकुणाच्या परड्यातून, कुणाच्या गडग्यावरून तिरडीसकट चढउतार केल्याने सगळेच वैतागले होते. खरंतर बाळ्याच्या वावरातून आणलं असतं तर एवढा लांबचा पल्ला पडला नसता. पण सांगणार कोण ? बापूची जीभ चांगलीच वळवळत होती. "तरी बरा, आप्पा वजनानं हलको व्हतो. भाऊ तू आसतस तर आमचा काय खरा नव्हता." अवाढव्य आकाराच्या भाऊकडे बघत बापू बोलला आणि सगळे चेकाळले. मग कुणाकुणाच्या मयताच्या गजाली चालू झाल्या. बबन्या मात्र गपगुमान लाकडं रचत होता.

शेजाऱ्याचा डामाडुमा - हायो धुआ सलाम - मालदीव भाग २

लेखक अनिंद्य यांनी बुधवार, 29/11/2017 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
या आधीचा भाग येथे वाचता येईल : http://www.misalpav.com/node/41427 भारताच्या दक्षिण-पश्चिम दिशेला श्रीलंकेजवळ ११९० मोजलेल्या आणि बाकी काही उथळ आणि आकाराने फारच लहान असल्यामुळे मोजता न येऊ शकणाऱ्या अश्या काही प्रवाळ (कोरल) बेटांचा समूह म्हणजे मालदीव हा आपला शेजारी देश. अलौकिक निसर्गसौंदर्याचे दान भरभरून मिळालेला.

आर्य की याम्नाया-पशुपालक ?

लेखक माहितगार यांनी मंगळवार, 21/11/2017 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
धागा लेखास कारण sciencenews.org या वेबसाईटवर, 'भटक्या आशियायी पशुपालकांचा ताम्रयुगीन (ब्राँझ एज) सांस्कृतीक घडणीवर प्रभाव कसा पडला असावा ?' अशा अर्थाचा एक लेख आला आहे. लेखास त्यांनी जनुकीय, पुरातत्वीय अनुवंशशास्त्र असा टॅग लावल्याचे दिसते.

विसंगत धोरणं; शिक्षण व्यवस्थेच्या मुळावर?

लेखक अँड. हरिदास उंबरकर यांनी मंगळवार, 21/11/2017 09:29 या दिवशी प्रकाशित केले.
प्राथामिक शिक्षणाच्या दर्जाबाबत यापूवी विविध माध्यमातून बरीच चर्चा झाली आहे. शिक्षणाच्या पारंपरिक ढाच्यात सुधारणा करण्यासाठी आजवर अनेक नवनवीन धोरणे राबविण्यात आली. निश्चितच काही सकारात्मक बदल यामुळे शिक्षण क्षेत्रात दिसून येत आहेत. मात्र सततची बदलणारी धोरणे. आणि, उद्देश आणि अंलबजावणी यात झालेली विसंगती, यामुळे सुधारणांपेक्षा संभ्रमाचेचं वातावरण शिक्षण क्षेत्रात अधिक दिसून येते. बदली, बढती, निवृत्ती याबाबत नेहमी बदलणाऱ्या निर्णयांमुळे शिक्षक व्यथित आहे. तर, गुणवत्ता वाढीसाठी केल्या जाणाऱ्या निरनिराळ्या प्रयोगामुळे विध्यार्थी गोंधळात..बरं, धोरण ठरविणारं शिक्षण खातं ही ठाम आहे, असं दिसत नाही.

बॉलीवूडचे तारे - संजय मिश्रा

लेखक यश पालकर यांनी सोमवार, 20/11/2017 13:41 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलीवूडच्या चमचमत्या दुनियेत सुंदर दिसणे खूप जास्त महत्वाचे मानले जाते . गेल्या काही वर्षात मात्र हे सारी समीकरण बदलत चालली आहेत . आलिशान बंगले ,इंपोर्टेड गाड्या , सुटमधे झोपणारे अभिनेते हे फक्त काही निवडक निर्मात्यांच्या चित्रपटामधूनच दिसत आहे . सिनेमा अधिकाधिक सत्य जीवनाच्या जवळ चालला आहे आणि ह्यामुळेच तुमच्या आमच्या सारखे दिसणारे , वावरणारे अभिनेते पडद्यावर ठळकपणे उठून दिसत आहेत .