Skip to main content

लेख

गडगडत्या बाजारातील संधी

लेखक युयुत्सु यांनी मंगळवार, 16/04/2019 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
लोक हो माझ्या "दर महा ८% ते १०% परतावा शक्य आहे का?" या धाग्यावर भवति न भवति होऊन बरीच धूळ उडाली. त्यात एक मत पुन:पुन: व्यक्त केले गेले ते असे की फक्त चढत्या बाजारात असा परतावा मिळु शकेल. गडगडत्या बाजारात असा परतावा मिळणे शक्य नाही, इ० या प्रश्नाचा पुरता छडा लावण्यासाठी अलिकडेच २०१८ मध्ये म्ह० २८ ऑगस्ट २०१८ ते २६ ऑक्टोबर २०१८ या कालावधीमध्ये बाजार गडगडलेला असताना काय चित्र दिसते याचा तपास करायचा ठरवले. या अभ्यासाठी माझ्याकडील ChartAlert या सॉफ्टवेअरची मदत घेतली.

आणीबाणी

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/04/2019 16:42 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे देशात आणीबाणी जाहीर झाली तेव्हा मी पाचवी सहावीत असेल. या वयात आणीबाणीचा मला काहीच फरक पडणार नव्हता. पडला नाही. माझे वडील प्राथमिक‍ शिक्षक होते. आमच्या विरगावपासून पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका लहान गावाला वडिलांची बदली होती. वडील शाळेत पायी जात. तिकडूनही पायी यायचे. त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळेत एसटी नव्हती. पायी जायचं आणि वेळेवर शाळेला पोचायचं. म्हणून वडील पहाटे शाळेला निघत. ‘आणीबाणी असल्याने शाळेला उशीरा जाऊन चालणार नाही’ असं त्यांच्या बोलण्यातून कळत असे. पण आणीबाणी म्हणजे नेमकं काय हे ते समजण्याचं वय नव्हतं. गावात किराणा दुकान होतं.

कथा – लंचटाईम

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 13/04/2019 22:49 या दिवशी प्रकाशित केले.
कथा – लंचटाईम ----------------------------------------------------------------------------------------------------------------- दुपारची वेळ झाली की भूक लागते ... काहीतरी पोटात ढकलावं लागतंच . माझं आणि दिग्याचं जेवण झालं होतं . डबा आवरून ठेवत होतो , तेव्हा दिग्या म्हणाला , “ चल बिडी मारून येऊ “ . इंजिनीरिंगची परीक्षा जवळ आली होती . जशी जशी परीक्षा जवळ येऊ लागते तसं येड्यावानी व्हायला लागतं . उन्हाळ्याचे दिवस . पारा वर - वर चढलेला . नकोशी वाटणारी गर्मी . वातावरणात अस्वस्थ करून टाकणारी तलखी . आम्ही दोघे कॉट बेसिस वर राहतो . कॉलेज चालू असताना रुटीन वेगळं असतं . आता कॉलेज बंद .

मैत्र - १०

लेखक शाली यांनी मंगळवार, 09/04/2019 07:01 या दिवशी प्रकाशित केले.
कोणत्याही गोष्टीची अपुर्वाई ही त्या गोष्टीच्या अभावाखेरीज समजत नाही हे अगदी खरय. दरवर्षीच होळी आणि दरवर्षीच पोळी, त्यात काय मोठे कौतुक आहे असं वाटायला लागले होते. पण कालच्या होळीला आम्हा सगळ्यांच्याच गळ्याला बसु पहाणारा फास आकस्मिक सुटला. तेंव्हा कुठे आम्हाला नव्याने होळीचा आनंद समजला. पुरणपोळी तर बाजुलाच, दत्त्या होळीसमोरच्या नुसत्या गुळ खोबऱ्यावर प्रसन्न झाला. संध्याकाळी धोंडबाने त्याच्या आणि दत्त्याच्याही घरचा पोळीचा नैवेद्य गावात आणला होता, तोही दोन दोन. एक होळीसाठी आणि एक पोवळासाठी. त्यादिवशी खरी होळी झाली पोवळाची. त्याला आम्हा सगळ्यांच्या घरच्या पोळीचा घास भरवला गेला होता.

कथा - माझा बहावा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी शनिवार, 06/04/2019 14:02 या दिवशी प्रकाशित केले.
कथा - माझा बहावा ------------------------------------------------------------------------------------------------------------- वसंत ऋतूपासून बहाव्याची झाडे फुलू लागली आहेत . त्या बहाव्यांना समर्पित . वसंतात फुलावा- मनाचा बहावा , त्याचा बहर -कोणी डोळे भरून पहावा ! ------------------------------------------------------------------------------------------------------------- सर्व वाचकांना गुढी पाडव्याच्या लक्ष शुभेच्छा ! ------------------------------------------------------------------------------------------------------------- --------------------------------------------------------------

मैत्र - ९

लेखक शाली यांनी गुरुवार, 04/04/2019 06:08 या दिवशी प्रकाशित केले.
सकाळी सकाळी शब्दकोडे सोडवत बसलो होतो. बाबांनी पुण्याहुन येताना हे पुस्तक आणले होते. त्याच्या प्रत्येक पानावर अगदी पानभरुन शब्दकोडे होते. या कोड्यांसाठी रविवारच्या वर्तमानपत्राची वाट पहायला लागायची पण आता पुर्ण पुस्तकभरुन कोडी समोर असताना मला पेन हातातुन सोडवत नव्हता. आईने पाठीमागुन हात धरुन हातावर दिड रुपया ठेवला. कोड्याच्या नादात पहिल्यांदा माझ्या लक्षात आले नाही. पण मग हातातला दिड रुपया पहाताच माझी ट्युब पेटली. मी पैसे खाली ठेवत म्हणालो “मी अजिबात नाही जाणार हां दळण घेऊन आता. मी कोडी सोडवतोय.” “असं रे काय करतो? हे पण बाहेर गेलेत नाहीतर त्यांना सांगितले असते.

यात्रा

लेखक अमरेंद्र बाहुबली यांनी बुधवार, 03/04/2019 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
मिपा शशक स्पर्धेने प्रेरित होऊन मी देखील काही खरडलय. " पप्पा आज नक्की यात्रेला जायचं ना? आज शेवटचा दिवस." "हो बेटा. आज नक्की" "ताई, बाबा आज हो म्हणाले, तू काय घेणार? मी ढोल घेईन बाजूच्या बाळ्याने घेतलाय ना तसा" "बाळ्या, आज आम्ही यात्रेला जाणार" "आजी तू पण येशील ना?" "नाही रे, मला चालवत नाही" "बरं, तुझ्यासाठी पण काहीतरी आणीन" घडाळ्यात रात्रीचे दहा वाजलेले. "घे आज पण आला तुझा बाप ढोसून, झोप नाहीतर आज बी दिल तो फटके." - आई. आजीची सहानुभूतीची नजर चोरून त्याने चादर तोंडावर ओढली.

मैत्र - ८ (किन्नरव्यथा)

लेखक शाली यांनी मंगळवार, 02/04/2019 18:40 या दिवशी प्रकाशित केले.
महामार्ग सोडून उजवीकडे वळले की दुरुनच आमच्या गावची वेस दिसते. दुरुन नुसती काळ्या चौकोनी इमारती सारखी दिसणारी ही वेस जसजसं जवळ जाऊ तसतसं आपलं सौंदर्य दाखवायला सुरवात करते. नविन माणूस जवळ आला की वेशीची भव्यता पाहून चकित होतो. सगळ्यात वरती नगारखाण्यासारखी जागा. त्याखाली बंदूकींसाठी असलेली तिरकी भोके, म्हणजे जंग्यांची रांग. दोन्ही बाजूला कोरलेली अलंकारीक फुले. मधोमध सोंड उंचाऊन चित्कारणारा हत्ती. भव्य दारांपैकी एकच शिल्लक असलेले दार. त्या दाराकडे पाहूनच वेस किती मजबूत असणार याचा अंदाज येतो. हत्ती सहज जाऊ शकेल इतक्या उंचीच्या दारावर हत्तीने धडक मारू नये म्हणून ठोकलेले खिळे काढून टाकले आहेत.

दगड - कथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी रविवार, 31/03/2019 23:49 या दिवशी प्रकाशित केले.
दगड ---------------------------------------------------------------------------------- उजाडलं होतं, माणसांची वर्दळ सुरू झाली होती. ती भिकारीण पडल्या जागेवर उठून बसली . तिने आजूबाजूला नजर फिरवली.तिच्याही पोटात आग पडली होती. रात्रीपासून खायला काहीच मिळालं नव्हतं ते एक गाव होतं. लोक शेतावर निघाले होते. गुराखी गुरं घेऊन चरायला निघाले होते. कोणी दुधाचे कॅन मोटर सायकलला अडकवून डेअरीवर निघाले होते. म्हातारी माणसं पारावर बसून तंबाखू चोळत गावच्या राजकरणावर चर्चा करत होती. भाविक देवळाकडे निघाले होते. पोरं-सोरं दप्तरं अडकवून टिवल्या-बावल्या करत शाळेला निघाली होती.

अनोळखी शिक्षक

लेखक chittmanthan.OOO यांनी शुक्रवार, 29/03/2019 17:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज अंक्याची mains असल्याने सकाळी साडेआठलाच हडपसरला गेलो होतो.त्याला केंद्रावर सोडून लगेचच परत यायला निघालो. PMTटँडवर वेळ सकाळची असूनसुद्धा गर्दी होतीच.कोथरुड डेपोची बस पकडायला मी गेलो तर माझ्या आधी १०- १५ मंडळी बसच्या पुढच्या दारातून आत घुसण्याचा प्रयत्न करत होती. बसायला जागा मिळणार नाही असच वाटत होत पण हार मानिन तो मी कसला?? त्याच गर्डीमधून धक्के देत, मोबाईल आणि पकिटकडे लक्ष्य देत मी बसमध्ये शिरलो.नक्कीच काहीतरी achieve केल्याची फिलिंग होती....!!! बसमध्ये पहिली windo seat मिळाली होती. शेजारची सीट अजूनही रिकामी होती..