Skip to main content

कुकुचकू - रुपये १२,०००/- फक्त !

लेखक माम्लेदारचा पन्खा यांनी सोमवार, 08/02/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
थोड्या दिवसांपूर्वी आमच्या ऑफिसमधली ज्येष्ठ (आणि श्रेष्ठ!) पार्शिण बरेच दिवस गायब होती. पारशी लोक हे तसे खुशालचेंडू आणि स्वच्छंदी असल्यामुळे ऑफिसातल्या कोणालाच तसं तिचं नसणं खटकलं नाही. मात्र बरेच दिवस होऊनही ती ऑफिसला न आल्यामुळे तिच्याविषयी थोडी चर्चा हळूहळू सुरु झाली. अखेर एक दिवस बाईसाहेब उगवल्या ती एक चित्तथरारक कहाणी घेऊनच ! तो अख्खा दिवस ती प्रत्येकाला वेगवेगळे गाठून तीच गोष्ट सांगत होती. खास लोकाग्रहास्तव तिने पुन्हा एकदा आम्हा सगळ्यांसाठी ती हकीकत साभिनय करून दाखवली ती अशी : ह्या बाईची एक मुलगी मुंबईत बांद्रा इथे राहते.

जिलबीचं प्रमाण किती असावं ?

लेखक नीलमोहर यांनी मंगळवार, 02/02/2016 13:19 या दिवशी प्रकाशित केले.
पे र णा: http://www.misalpav.com/node/34693 नमस्कार मंडळी, मंडळी, मिसळपाव मोठ्या लज्जतदार लेखांनी खच्चून भरलेलं असतं. वाचकासमोर कोणते लेखन कधी येईल काही सांगता येत नाही. मिपाकर हा वाचनवेडा प्राणी आहे. मिपावरील उत्कृष्ट लेखनात रमणे हा त्याचा जन्मजात हक्क आहे. रोचक, ज्ञानवर्धक, माहितीदायक, प्रेरणादायक, विडंबनात्मक अशा अनेक प्रकारच्या लेखांत त्याचा जीव अडकून असतो. पण कधी कधी मिपावर चांगल्या लेखांशिवायही वाचकाने रहायला शिकलं पाहिजे. कारण कोण कधी बोर्डावरचे उत्तमोत्तम लेख खाली ढकलून तुम्हाला उपाशी सोडून स्वतः जिलब्या टाकत बसेल याची काही गॅरंटी नाही. आणि मग भुकेलं वाटायला लागलं की वाचनभूक शमवण्यासाठी अनेक जिलब्यांचा प्रवास सुरु होतो. अशाच एका मिसळपावात घुसखोरी करणार्‍या एका गोष्टीची गोष्ट. कधी तरी एखादा मिपाकर म्हणतो, 'घे कै होत नै', 'एक तुकडा घे', 'बरं दोनच वेटोळे घे', 'धागा पडला राव तुझा जाऊ दे, चलता है', 'नाही म्हणू नको यार', 'धाग्याची शंभरी झाली लेका, बाकीच्यांचा कसा पापड मोडला असेल बघ' .. इ. इ. आनंद असो, दु:ख असो काही तरी निमित्ताने 'एकच जिलबीची' टाकण्यास सुरुवात होते आणि मग महिन्यातून एकदा, आठवड्यातून एकदा आणि दररोज असा जिलबी टाकण्याचा प्रवास सुरु होतो आणि मग आपल्याला त्याचं व्यसन लागलंय इतकं ते रुटीन होऊन जातं. 'भस्म्या' होऊन पुढे पुढे काय काय होतं हे बर्‍याच लोकांना माहिती आहे. माझा काथ्याकूटाचा विषय 'व्यसन आणि त्याचे दुष्परिणाम' हा नाही. माझा विषय आहे की कधी कधी टाळताच येत नाही अशा गोष्टी असतात, म्हणजे मिसळपाव, इथले मिपाकर, वेगवेगळे अतरंगी आयडी, यात एक जिलबी म्हणा किंवा ईम्रती म्हणा एखाद दुसरा तुकडा घेतला की सपक रूटीन लाईफ एंजॉय होते. माझा प्रश्न आहे की माणसाला किती प्रमाणात जिलबी आरोग्यासाठी चालू शकते ? किती प्रमाण त्याचं असलं पाहिजे? आपण म्हणाल माणसाला झेपेल तेवढी टाकावी पण हे काही माप होऊ शकत नाही. कोणी म्हणेल पण टाकूच नये ना? जागतिक ऑनलाईन आरोग्य संघटना काय म्हणते ? डॉक्टर लोकांचा काय सल्ला असतो ? व्यस्त बँडविडथ, हाथ धुवून मागे लागलेला बॉस, आणि विविध रिकामी कामे सोबत असतांना जिलबीचं प्रमाण किती असलं पाहिजे ? जिलबी खावी की न खावी? गोड / आंबट/ आंबट गोड / अतिगोड / मधुर अशा विविध चवी आणि त्याची माहिती आरोग्याच्या दृष्टीने यावी. आपलं म्हणणं तीन पाच र्‍हस्व प्रतिसादात विविध मुद्द्यांशिवाय आलं तर बरं राहील. उगाच प्रतिसादांच्या जिलब्यांचा रतीब पाडण्यापेक्षा भरकटलेला मुद्दा विदाऊट स्पष्टीकरण आलं, भरल्या ताटी कोणाचं काही प्रबोधन न करता रिकामा टीपी झाला तर त्याचा फायदा अनेक जिलब्यांचे अजीर्ण झालेल्या मित्र मैत्रिणींना होईल म्हणून हा काथ्याकूटाचा प्रपंच. ता.क: मी अशा गोष्टींपासून एक हात दूर(राहू शकत नाही). उगं माझ्याकडे संशयाने पाहिले तरी काही एक बिघडणार नाही. धन्यवाद. खुलासा संपला.

हळूच बोल, राजसा

लेखक बहुगुणी यांनी सोमवार, 01/02/2016 10:18 या दिवशी प्रकाशित केले.
आवडलेल्या इंग्लिश गीतांच्या मराठी रुपांतराचा सिलसिला पुढे सुरू ठेवतोय. आज सुटी सत्कारणी लावावी म्हणून फिनिक्स हा जर्मन चित्रपट नेटफ्लिक्सवर पाहिला. आवडला. चित्रपटाच्या अखेरीस असलेलं निना हॉस या कथानायिकेने गायलेलं "Speak low when you speak, love" हे गाणं म्हणजे चित्रपटाचा परमोच्चबिंदू वाटावा इतकं आवडलं.

खाद्ययात्रा कल्याणची!!

लेखक राजेंद्र मेहेंदळे यांनी रविवार, 24/01/2016 13:26 या दिवशी प्रकाशित केले.

बर्‍याच दिवसांनी मागच्या आठवड्यात कल्याणला गेलो होतो. थोडी घरची कामे, नातेवाईकांच्या भेटीगाठी आणि असेच कायकाय मनात होते. सकाळीच पोचलो आणि घरी पोचायच्या आधीच भुकेची जाणीव झाली. आता ईतक्या सकाळी काय बरे खावे? बरं दुपारी एका ठिकाणी जेवायचे आमंत्रण होते, त्यामुळे फार जास्त खाउन चालणार नव्ह्ते. पाय आपोआप पारनाक्यावर ताम्हणकर यांच्या श्री उपहारगृहात वळले. खरेतर तिथे बसायलाही फार जागा नाहिये, पण तिकडे वर्षानुवर्षे मिळणार्‍या एकाच खास चवीच्या ओल्या नारळाच्या कचोर्‍या खाण्यासाठी खवैय्यांची गर्दी असते. 

ऐतिहासिक किल्ले, मंदिरे यांची नवी ओळख ...

लेखक शशिकांत ओक यांनी बुधवार, 20/01/2016 12:28 या दिवशी प्रकाशित केले.

ऐतिहासिक गड किल्ले यांचे संवर्धन

मित्रांनो, गेला काही काळ आपल्याला आपल्या सांस्कृतिक वारसा असलेल्या वास्तूंचे रक्षण व संवर्धन कसे करता येईल यावर काही व्यक्तींशी भेट व चर्चा केली. त्यानंतर सोबतचे PPT पाहून मला अपेक्षित संकल्पना काय व कशी अमलात आणता येईल यावर आपले मत, सुचना व सहकार्य मागायला व आपल्याशी संवाद निर्माण करण्यासाठी हा धागा सादर. सैनिकी पर्यटन (मिलिटरी टुरिझम) संकल्पना ही त्याचा एक भाग आहे.

कॉफी विथ म्हाग्रु: म्हाग्रुंचे महागुरु वसंत काटकर ह्यांची मुलाखत (भाग- १/३७७७११))

लेखक कॅप्टन जॅक स्पॅरो यांनी शुक्रवार, 15/01/2016 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
म्हाग्रु: नमस्कार प्रेक्षकहो. सर्वप्रथम आमच्या कॉफी विथ म्हाग्रु च्या गरगरत्या रंगमंचावर आपलं हार्दिक स्वागत आहे. (उजवा कान डाव्या हाताला आणि डावा कान उजव्या हाताला लावत) आजचा भाग तुमच्यासाठीचं काय तर माझ्या स्वतःसाठीसुद्धा फार म्हणजे फार महत्त्वाचा आहे. माझ्या म्हाग्रु बनण्यामधे ज्यांचा मोलाचा वाटा आहे असे माझे महागुरुवर्य श्री. वसंत काटकर आज आपल्या रंगमंचावर येणार आहेत.

संक्रांत आणि पतंगबाज

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 14/01/2016 13:42 या दिवशी प्रकाशित केले.
निरभ्र आकाश, थंडगार झुळझुळ वाहणारे वारे, आणखीन काय पाहिजे पतंग उडविण्यासाठी. देशातल्या इतर भागांप्रमाणे महाराष्ट्रात हि संक्रांतीच्या दिवशी पतंग उडविल्या जातात. आम्हा दिल्लीकरांचे मात्र सर्वच इतरांपेक्षा वेगळे असते. इथे उन्हाळ्याच्या सुट्या आणि पावसाळा म्हणजे पतंग उडविण्याचा मौसम. या मौसमात अधिकांश वेळ आकाशात ढग असतात. कधीही अचानक पाऊस सुरु होतो, पतंग आणि मांजा दोन्ही खराब होतात. तर कधी अचानक सुसाट वारे वाहू लागतात. अश्या वेळी उस्ताद पतंगबाज्यांच्या मोठ्या-मोठ्या पतांगाही आकाशात तग धरू शकत नाही, जमिनीवर निष्प्राण होऊन पाडतात. कधी-कधी एकदम घुम्म मौसम.

गोधडीची चोरी

लेखक दिनु गवळी यांनी गुरुवार, 14/01/2016 12:00 या दिवशी प्रकाशित केले.
गावात सगळी कडे निरव शांतता होती. रात्रीचे बहुतेक ११ वाजले होते. दिनुला घरी येऊन दोन दिवसच झाले होते. (एस वाय . बि एस सी ) चे पेपर संपल्यामुळे तो सुट्टयात घरी आला होता. बाहेर अंगणात खाटेवर दिनु गाढ झोपेत होता . अचानक त्याला एक भयानक स्वप्न दिसले आणि तो दचकुन जागा झाला . आजुबाजुला बघतो तर काळा भिन्न अंधार होता. समोरचे पिंपळाचे झाड हवेच्या झोताने हलत होते. ईतक्यात समोरुन कुणी तरी पळत जात असल्याचा आवाज दिनुला आला तो चपलांचा आवाज दिनुने ऐकला. तो सावध पणे ऐकु लागला तर तो आवाज थोड्याच वेळात येईनासा झाला.

छायाचित्रणकला स्पर्धा क्र.१५: कृषि: निकाल

लेखक साहित्य संपादक यांनी सोमवार, 11/01/2016 22:43 या दिवशी प्रकाशित केले.

नमस्कार मंडळी,

छायाचित्रणकला स्पर्धेच्या १५व्या भागाला दिलेल्या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक धन्यवाद. यंदा प्रथमच प्रवेशिकांबरोबर स्पर्धकांची नावे प्रकाशित केली गेली नाहीत. नव्या पद्धतीला सर्व स्पर्धकांचे उत्तम सहकार्य लाभले. त्याकरिता सर्व स्पर्धकांना विशेष धन्यवाद. तसेच ज्यांच्या सहभागाशिवाय स्पर्धा अपूर्ण आहे त्या मतदात्यांनाही अनेक धन्यवाद.

ऑर्फिअस, जी. ए आणि मी (भाग ४)

लेखक Anand More यांनी बुधवार, 06/01/2016 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
भाग १ भाग २ भाग ३ ______________________________________________________________________________________ जेंव्हा जेंव्हा मी जी एंची ऑर्फिअस वाचतो, तेंव्हा तेंव्हा मला त्यातून काहीतरी नवीन सापडल्यासारखे वाटते. आता वाचत असताना जाणवले की आपण सगळे ऑर्फिअस आणि युरीडीसीचे अवतार आहोत. आणि थोड्या फार प्रमाणात प्लुटो व पर्सिफोनचे देखील. इथे एक लक्षात ठेवायचे की कुणीही कायमचा एक अवतार म्हणून जन्माला येत नाही. आपण ह्या सगळ्या भूमिका आपल्याच नकळत आलटून पालटून घेत असतो. किंवा अजून सोप्या शब्दात सांगायचं म्हणजे आपण झाड असतो आणि वेगवेगळ्या वेळी ऑर्फिअस, युरीडीसी, प्लुटो आणि पर्सिफोनचे गुणावगुण आपल्याला पकडत असतात, आपल्या अंगात येतात, आपल्याला पछाडून टाकतात.