भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग २ - आत्मविचार आणि शरणागती: प्रकरण ५ - आत्मविचार (साधना संहिता)
या प्रकरणात आपण आत्मविचाराची साधना संहिता पाहणार आहोत.
डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे:
भगवान रमण महर्षी आत्मविचार साधनापद्धतीच्या पहिल्या इयत्तेतल्या विद्यार्थ्यांना आपले सारे अवधान अंतर्यामी असलेल्या 'मी' या जाणीवेवर केंद्रित करण्याचा आणि शक्य तितका वेळ त्या जाणीवेला पकडून ठेवण्याचा सल्ला देत असत. ते पुढे असे सांगत असत की आत्मविचार करत असताना अन्य विचारांमुळे चित्त विचलीत होणे साहजिक असले, तरी आपले चित्त विचलीत झाले आहे हे लक्षात आल्यावर अवधान पुन्हा एकदा 'मी' या जाणीवेवर केंद्रित करणे आवश्यक आहे.
मिसळपाव